Friday, 1 June 2007

सर्ग 121-133Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग तिसरा: काम
सर्ग १२१ दूर असलेल्या प्रियेसाठी सुस्कारे

तो
१२०१
केवल स्मरणानेही प्रेम अनंत आनंद देते, अतिमधुर वाटते. प्रेम हे मदिरेपेक्षा मधुर आहे.


१२०२
प्रियेची मूर्ती अंतश्चक्षूंसमोर आणताच माझे शमते. खरोखरच प्रेम हे सर्वतोपरी आनंददायी असते.

ती
१२०३
शिंक येणार होती, परंतु गेली. तो बहुधा माझी आठवण काढणार होता, परंतु काढली नसावी.


१२०४
माझ्या हृदयात्तो कायमचा आहे; परंतु त्याच्या हृदयात मला स्थान आहे का?


१२०५
तो असूयेने, ईर्ष्येने स्वतःच्या हृदयातून मला दूर करतो; मग माझ्या हृदयात आपले रूप सदैव दाखवायला त्याला लाज कशी वाटत नाही?


१२०६
आमच्या मीलनाची स्मृती मला जिवंत ठेवीत आहे; माझ्या जीवनाला अन्य आधार नाही. (सखी म्हणते, 'त्याचे स्मरणच करू नको' त्याला हे उत्तर आहे.)


१२०७
माझ्या स्मृतीत तो भरून राहिला आहे तरीही तो मला दग्ध करीत आहे; मग मी जर त्याला विसरेन तर तो माझी काय दशा करील?


१२०८
माझ्या प्रियकराला मी मनात सारखे आठवीत बसले तरी त्याला राग येत नाही. त्याची किती ही कृपा माझ्यावर!


१२०९
"आपण दोन नसून एक आहोत" असे म्हणणान्या त्या प्रियकरच्या निष्ठुरपणाचा जेव्हा मी विचार करू लागते, तेव्हा माझे जीवनच खरोखर समाप् होतो.


१२१०
माझ्या हृदयात सतत असूनही तो दूर गेला आहे; तेव्हा माझे जीवनच खरोखर समाप् होते.

सर्ग १२२ स्वप्नस्थितीची स्तुती

ती
१२११
प्रियकराचा संदेश घेऊन येणान्या या स्वप्नाला मी कोणते बक्षीस देऊ?
१२१२
डोळयांना जर झोपण्याविषयी वळवता आले तर स्वप्नात मी एकदम प्रियकराडे उठून जाईन नि अजून मी जिवंत कशी राहिले याची सारी कहाणी सांगेन.


१२१३
जागेपणी तो दिसत नसला तरी स्वप्नात ती त्याला पाहू शकते; आणि म्हणून तर हे प्राण अजून गाहिले आहेत.


१२१४
स्वप्नात मी सारे प्रेमसुख अनुभवतो; जागृतीर दया दाखवायला तयार नसलेल्या त्या प्रियकराला मझे स्वप् खेचून घेऊन येते.


१२१५
स्वप्नसृष्टीत प्रियकर दृष्टीसमोर असेपर्यत सारे आनंदमय असते; मग जागृतीत जर तो जवळ असेल तर त्या आनंदाचे वर्णन कसे करता येईल?


१२१६
ही जागृतावस्था नसतीच तर? कारण मग  स्वप् भंगले नसरे नि माझा प्रियकर माझ्याजवळून गेला नसता.


१२१७
मी जागै असता जो माझ्यावर दया करीत नाही, तो निष्ठुर स्वप्नात तरी का बरे सारखा सारखा येते?


१२१८
मी झोपत असताना तो मला मीठी मारतो; परंतु जागी होताच तो चटकन माझ्या हृदयात शिरतो.


१२१९
माझा प्रियकर मला भेटतो हे त्यांना माहीत नाही; म्हणून त्याला 'निष्ठुर निष्ठुर' असे ते म्हणतात. परंतु माझ्या स्वप्नात तो मला येऊन भेटतो, हे त्यांना कसे दिसणार?


१२२०
तो मला सोडून गेला, असे हे सारे म्हणतात. तो स्वप्नात मला भेटतो हे त्यांना माहीत नाही, म्हणून ते असे म्हणत असतील, नाही?

 
सर्ग १२३ तिन्हई सांजा झाल्पावर सुस्कारे

ती
१२२१
हे सायंसंध्ये, हे देवी, तुला नमस्कार असो! परंतु तुला सायंदेवी कोण म्हणेल? विवाहितांचे जीवन खाणारी तू राक्षसीण आहेस.


१२२२
हे सायंसंध्ये, तूही खिन्न नि पांडुर दिसत आहेस. गडे, तुझा वल्लभही माझ्या बल्लभाप्रमाणेच निर्दय आहे का?


१२२३
दवबिंदूंनी न्हालेली ही सायंसंध्या पूर्वी भीत भीत, कापत कापत माझ्यासमोर येत असे; परंतु आता घट्टपणे पुढे येते नि माझ्या हृदयात दुःख-निराशांचे साम्राज्य पसरते.


१२२४
फाशीच्या जागेकडे मांग जातो, त्याप्रमाणे प्रियकर दूर असला म्हणजे ही सायंसंध्या माझ्याकडे येते.


१२२५
मी प्रात:संध्येवर काय एवढे उपकार केले आहेत नि या सयंसंध्येचे काय एवढे घोडे मारले आहे?


१२२६
प्रियकर जो पर्यत जवळ होता तोपर्यत सायंसंध्येची, खरे सांगते; नांगी मी कधीच अनुभवली नाही.


१२२७
हे विरहदुःख प्रातःकाळी कळीप्रमाणे असते; हळूहळू ते एकेक पाहळी उघडून सायंकाल झाल्यावर संपूर्णपण फुलते.


१२२८
गुराख्याची बासरी गोड असते असे म्हणतात. परंतु मला मारणारे ते तीक्षण हत्यार आहे. कारण सायंकाल झाली, असे ती बासरी घोषतीत असते.


१२२९
या सायंकाळने मला वेडे केले आहे. सायंकाल अशीच लांबेल तर हा सारा गाव दुःखात बुडेल (कारण मी मरेन)


१२३०
माझा प्रियकर धनासाठी दूर गेला आहे. ही सायंसंध्या त्याची मला आठावण करून देते नि अशाने जे काही थोडेसे जीवन शिल्लक राहिले आहे तेही कदाचित लवकर समाप् होईल.

सर्ग १२४ सुंदर शरीराची कृशता

ती
१२३१
तुझे सुख वाढविण्यासाठीच मी जात आहे, असे म्हणून तो गेला. हे शोळे सारखा त्याचा विचार करीत असतात. फुलांसमुर जायला त्यांना आता लाज वाटते.


१२३२
माझ्या हया निस्तेज डोळयांतून सारखे अश्रू गाळत आहेत. प्रिय कराचा निष्ठुरपणा ते उघड करतील की काय?


१२३३
विवाहाच्या प्रसंगी जे बाहू आमंदाने फुगले होते, तेच आज त्याचे सोडून हाणे जगाला जाहीर करतील अशी भीती वाटते.


१२३४
प्रियकराचा विरहाने ज्यांचे सौंदर्य आधीच नाहीसे झाले होते, ते माझे बाहू आता इतके कृश झाले आहेत की काकणे फ़ळून पडतात.


१२३५
या हातांनी आपली रमणीयताही गमावली नि काकणेही गमावली. त्या निष्ठुराची निष्ठुरता हे जगाला जाहीर करीत आहेत.


१२३६
मी माझ्या बाहूंना कृश होण्याबद्दल, काकणे गळू देण्याबद्दल रागे भरते; कारण लोक त्याला नेर्दय म्हणून नावे ठेवतात.


१२३७
हे हृदया, तुला शाबासकी हवी आहे का? तर मग त्या कठोराकडे जा; आणि माझ्या बाहूंच्या कृशत्वामुळेगावात कोण बोभाटा माजला आहे, ते त्याचा कानांवर घाल.

तो
१२३८
एक दिवस आम्ही एकमेकांस आलिंगन देत होतो. मी माझे बाहू जरा ठिले करताच त्या मुग्धेचा भालप्रदेश पांढरा फटफटीत झाला.


१२३९
आमच्या दृढालिंगनात्श्वासोच्छवासाचा जरासा वारा शिरताच वर्षाकालीन मेघाप्रमाणे काळेभोर असणान्या तिच्या डोळयांतील तेज नि अनुराग निघून जात.


१२४०
डोळे तोंडावरील पांडुरता पाहून निस्तेज नसत होत; तर रडू लागत.

सर्ग १२५ हृदयाला उद्देशून

ती
१२४१
हृदया, माझा बरा होणारा हा जो रोग, त्याच्यावर तू उपाय नाही का शेघून काढणार? नाही का मला तो सांगणार?


१२४२
हे हृदय, शांत राहा. त्याला जर तुझ्याविषयी प्रेम नाही तर तू त्याच्यासाठी वेडयाप्रमाणे का रडतोस?


१२४३
हे हृदया येथे बसून त्याला आठवून झुरण्यात काय अर्थ? ज्याने आपणांस दुःख दिले, त्याला आपली आठवणही नाही.


१२४४
हे मना, तू त्याच्याकडे जाणार असलास, तर हे डोळेही जा ना बरोबर घेऊन; त्याला पाहण्याची त्यांना फार उत्कंठा लागली आहे. मला ते भंडावून सोडतात.


१२४५
आपण जरी त्याला चिकटून राहिलो तरी तो आपणांस लाथाडतो. हे हृदया, त्याला शत्रू समजून आपण टाकू शकू का?


१२४६
हे हृदया, तो प्रियकर लाडिगोडी करण्यात मोठा चतुर आहे; त्याला पाहताच सारी रात्र विसरून, सारी धुसफूस बाजूला ठेवून. तू त्याच्या बाहुपाशात घुसशील. आताचा तुझा हा सारा राग वरपंगी आहे, अशी मला शंका येते.


१२४७
मना, प्रेम तरी सोडा किंवा लाज तरी सोघ एकाच वेळी दोन्ही मला सहन नाही होत, बाबा!


१२४८
मनात करुणा येऊन तो तुझ्याकडे काही येत नाही. मना, तरी तू सुस्कारे सोडीत बसतोस. तो मुद्दाम तुला सोडून गेला तरीही त्याचा शोध करायला तू उत्सुक आहेस. खरोच, स्वाभिमान ही वस्तूच तुला माहीत नाही.


१२४९
हे हृदया, तो प्रियकर तुझ्यामध्येच वस्ती करून वाहिला आहे, हे तुला माहीत आहे. आता तू कोणाला भेटू इच्छितोस?


१२५०
जो सोडून गेला त्याला हृदयात खेळविणे म्हणजे आणखी कृश होणे होय.

सर्ग १२६ मनाचा तोल नि संयम ढासळण्याची मीती

ती
१२५१
विनयाच्या अडसराने दरवाजा जरी केलेला असला, तरी प्रबल प्रेमाचुआ कुन्हाडीसमोर त्याचे काहीएक चालाणार नाही.


१२५२
प्रेम ही एक निर्दय वस्तू आहे; मध्यारात्रीही ते माझ्या हृदयाला जाळतील असते.


१२५३
मी माझ्या प्रेमाला हृदय-पंजरात कोंडू इच्छिते; परंतु एकदम येणान्या शिंकेप्रमाणे ते अगाऊ सूचना देता प्रकट होते.


१२५४
माझे वंतन मर्यादशील विनयशील होते, असा मला अभिमान होता; परंतु काय करू? सारे पडदे दूर फेकून हे प्रेम जगासमोर उघड होत आहे.


१२५५
कठोरपणाने जे सोडून गेला, त्याच्या शोघास जाण्याचा स्वाभिमान प्रेमदेडया सुंदरीजवळ कोठून असणार?


१२५६
हे दुःखा, तुझे माःयावर फार प्रेम आहे एकूण; ज्याने निर्दयपणाने माझा त्याग केला, त्याच्याच जायला तू मला लावीत आहोस.


१२५७
प्रियकराने पुन्हा प्रेमकृपा करताच, आपण सान्या अधया एकदम विसरून जातो.


१२५८
नाना प्रकारच्या धूर्त गोष्टी करण्यात तो हुशार आहे; नारीजनोचित विनयाला सोडायला जर मला कोणी भाग पाडीत असेल, तर ती त्याची संयमी वाणी.


१२५९
मला रागावून, रुसून दूर व्हायचे होते, परंतु मी जाऊन त्याला मिठी मारली. कारण माझे हृदय आधीच त्याला जाऊन भेटलेले मला दिसले.


१२६०
विस्तवात चरबी वितळते, त्याप्रमाणे ज्यांची हृदये वितळतात, ते एकमेकांपासून भांडून दूर राहण्याचे स्वप्नात तरी मनात आणतील का?

सर्ग १२७ प्रेमी जीवांची भेटण्यासाठी ओढ

ती
१२६१
प्रेमी डोळयांतील तेज लेपून ते मंद झाले. भिंतीचर खुणा केलेले दिवस रोज मोजून मोजून ही माझी बोटे झिजून गली.


१२६२
सखी, त्याला आता मी विसरले म्हणून काय झाले? माझे सौंदर्य मला आधीच सोडून गेले आहे आणि ही काकणेही गळून पडली आहेत.


१२६३
तो परत यावा या इच्छेने मी जर जिवंत राहीले, तरच विजयेच्छेने मला सोडून जणान्या त्याचा विजय.


१२६४
माझ्या भावना मातीमोल समजून मला सोडूनतो गेला तो गेला; परंतु तो लवकरच परत येईल, या विचारानेसुद्धा माझे हृदय थयथय नाचू लागते.


१२६५
हे डोळे एकदा त्याला पुन्हा पोटभर पाहू देत; लगेच या माझ्या कृश बाहूंवरील पांडुरता पळून जाईल.


१२६६
प्रियकराला घरी येऊ दे; लगेच त्याचे दर्शनामृत सेवून हा शरीर्मारक विरहरोग मी नष् करीन.


१२६७
माझ्या या डोळयांप्रमाणे मला प्रिय असणारा तो प्रियकर घरी येताच, तो फार दिवस दूर राहिला म्हणून मी रुसेन, रागावेन की त्याला मीठी मारीन? की हे सारे प्रकार करीन?

तो
१२६८
लढाई आता एकदम सुरू होऊ दे नी राजाला जय मिळू दे! मला लवकर सायंकाळी घरी जाऊ दे नि प्रियेसह आनंदभोजन करू दे.


१२६९
ज्या दिवस मोजीत असतात, प्रियकर कधी परत येईल म्हणुन झुरत असतात, त्यांना एकेक दिवस युगासारखा वाटतो.


१२७०
मी जाऊन भेटण्यापूर्वीच प्रियेचे हृदय जर दुभंगून गेले असेल, तर मी जाऊन काय उपयोग?

सर्ग १२८ अप्रकट विचार समजणे

तो
१२७१
प्रिये, तू कितीही स्वतःचे विचार छपविण्याचा प्रयत्न केलास तरी या डोळयांवर तुझी सत्ता दिसत नाही; तुझ्या हृदयात काहीतरी चमत्कारिक विचार आहेत ही गोष् तुझे डोळे मला सांगत आहेत.


१२७२
(ती बोलत नाही. तो तिला उद्देशून म्हणतो) जिचे सौंदर्य माझ्या डोळयांत भरून राहिले आहे, जिचे बाहू कळकीप्रमाणे सरळ नि बारीक आहेत, अशा या मुग्धेच्या ठिकाणी स्त्र्रियांना शोभण्याइतका मनाचा कुठेपणा का?


१२७३
स्फटिकाच्या मण्यांमधून घागा दिसतो, त्याप्रमाणे तिच्या हृदयातील विचार मला स्पष्टपणे दिसत आहेत. (पती पुन्हा जाईल की काय असा विचार)


१२७४
कळीत अप्रकट सुगंध साठवलेला असतो. त्याप्रमाणे या मुग्धेच्या अर्धस्मितात अर्थ भरून राहिला आहे.


१२७५
ज्या चतुराईने मनातील विचार तिने लपवले, त्याच चतुराईने प्रकट केले. ते सारे पाहून माझ्या मनाची चिंता दूर झाली.

ती
१२७६
तो फार केवळ्या मनाचा नि गोड स्वभावचा आहे. त्याच्या मनात काहीतरी आहे; परंरु ते त्याला लपविता येत नव्हते. तो पुन्हा सोडून जाईल की काय?


१२७७
त्याचा निष्ठुरपणा मला कळला त्यापेक्षा कितीतरी आधी हातांतील या कंकणांना कळला.


१२७८
प्रियकर काल गेला; परंतु शरीराची टवटवी आठवडयापूर्वीच सोडून गेली आहे.


१२७९
(प्रियेची सखी प्रियकराला एकटयालाच म्हणते) तिने स्वतःच्या कंकणांडे पाहिले नि आपल्या कृश कोमल बाहूंकडे पाहिले; नंतर आपल्या पायांकडे पाहिले.


१२८०
(तो सखीला म्हणतो) तिने मला विरहदुःखे निवेदिली. तुम्है पुन्हा जाणार असाल तर मलाही बरोबर न्या, असे तिने प्रार्थिले; परंतु हे सारे शब्दांनी सांगता तिने आपल्या डोळयांची सांगून विनयाच्या बाबतीत सान्या स्त्रियांना लाजविले.

सर्ग १२९ मीलनोत्कंठा

ती
१२८१
मनात नुसता विचार येताच अपार आनंद होणे, दर्शन होताच सुखसागर उसळणे, या गोष्टी मदिरेत नाहीत; या फक् प्रेमतच असू शकतात.


१२८२
विरहाने शिंदीच्या अणुकुचीदार टोकांवर बसण्याहूनही अधिक विव्हल होत असले तरीही त्याच्यावर थोडेसुद्धा रागावण्याची मनात इच्छा नाही.


१२८३
त्याला जरी माझी पर्वा नसली तो वाटेल तसे वर्तन करीत असला, तरी त्याला पाहिल्याशिवाय माझ्या डोळयांचे समाधान होणार नाही.


१२८४
सखी, खरोखरच मला त्याच्यावर रागवावयाचे होते, परंतु हृदयाला या गोष्टीचा विसर पडला नि ते त्याला भेटयाला धावले.


१२८५
शलाकेने डोळयांत अंजन घालीत असताना, शलाकेचे अंजन ज्याप्रमाणे डोळयांना दिसत नाही, त्याप्रमाणे प्रियकर जवळ असला म्हणजे त्याचे दिष मला दिसत नाहीत.


१२८६
तो समोय असला म्हणजे तो निर्दोष वाटतो; दूर गेला म्हणजे तो केवळ दोषमूर्ती दिसतो.


१२८७
प्रवाहात वाहून नेणारा एक अंतःप्रवाह आहे, हे माहीत असताना त्यात कोण उडी घेईल? तो जवळ असल्यावर माझा राग उरत नाही हे जर मला माहीत आहे, तर त्याच्यावर उगाच कशाला राग करू?


१२८८
लाजेने खाली मान घालायला लावीत असली तरी मदिरा पाहून मद्याप्याला दुःख का होते? त्याप्रमाणे, हे लबाडा, तुझे हृदय मला आहे.

तो
१२८९
फुलाहूनही प्रेम सुकुमार आहे. फारच ठोडयांना हे समजते नि तदनुरूप ते वागतात. (ती कोमलता तुला समजत नाही म्हणून तू रागावून मला व्यथित करतेस, हा भाव.)


१२९०
जेव्हा तिने मला पाहिले तेव्हा तिच्या डोळयांत राग होता. परंतु मी जवळ जाताच मी तिच्या बाहुपाशात जाण्याऐवजी तीच त्वरेने माझ्या बाहूंत घुसली.

सर्ग १३० हृदयाची कानउघाडणीती
१२९१
त्याचे हृदय त्याचा इच्छेप्रमाणे कसे वागते, हे तू बघतोस; मग माझ्या हृदया, तूही माझे का रे ऐकत नाहीस?


१२९२
हे हृदय, तो माझी कशी उपेक्षा करतो, ते तू पाहतोस. तरीही त्याला मित्र समजूनच तू त्याच्याकडे जातोस.


१२९३
हे हृदया, तू आपल्या गोड इच्छेने नि आनंदाने त्याच्या पाठोपाठ जातोस. जे दुर्दैवी असतात त्यांना मित्र नसतात, हेच तू मला शिकवीत आहेस, होय ना? (कारण तूही माझ्या सोबतीका राहत नाहीस)


१२९४
त्याच्या संगतीत आनंद होतो हे दाखविता प्रेमकलहात सामील होण्याची, हे मना, तुझी इच्छा नाही; ठीक! असल्या गोष्टीत मी पुनश् तुला विश्वासात घेणार नाही.


१२९५
त्याची भेट होणार नाही म्हणून आधी झुरते; भेटल्यावर पुन्हा वियोग होईल या विचाराने मी झुरते; माझ्या हृदयदेवनांना अंत नाही.


१२९६
माझ्या हृदयाचा मला उपयोग तरी काय? मी एकटी विचार करीत बसते तेव्हा माझे हऋदय मलाच खाऊ लागते.


१२९७
त्याची आठावण विसरून आपला स्वभिमान सांभाळणे, ही गोष् या हृदयाला माहीतच नाही. अशा या हृदयाच्या संगतीत राहून मीही माझी धीरता गमावून बसले आहे.


१२९८
ज्याच्यावर आपण प्रेम केले, त्याची बाजू कमी ठरू नये, असे या हृदयाला वाटते; म्हणून ते नेहमी त्याची बाजू घेते.

तो
१२९९
दुःखी मनुष्याला त्याचा दुःखात कोण बरे आधार देईल? प्रियेचे हृदय जर धावून येणार नसेल तर दुसरे कोण आहे?


१३००
माझे मनुष्याला जर माझी बाजू घेत नसेल, तर दुसन्यांना माझी पर्वा वाटत नाही यात काय आश्चर्य? (दुसरे म्हणजे प्रिया)

सर्ग १३१ प्रेमकलह


१३०१
(सखी प्रियला) गडे, त्याला आलिंगन नको देऊस, रागावल्याप्रमणे कर, मग त्याची कशी दुर्दशा होते ती बघ! जरा गमत तरी कर.


१३०२
प्रेमकलह म्हणजे प्रीतीचे सर्वस्व आहे; प्रीतीतील ते मीठे आहे. परंतु हा कलह फार लांबविणे म्हणजे अन्नात अधिक मीठ घातल्याप्रमाणे होईल.


१३०३
(पत्नी मत्सराने पतीला) जिला तू रुसवून आला आहेस. तिला आलिंगन दिल्याशिवाय येशील तर आधीच जखमी झालेत्याला अधिक जखमी करण्याप्रमाणे आहे.


१३०४
जी रागाने आठया बसली आहे, तिची समजूत घालता येणे म्हणजे वाळत जाणान्या रोपटयाची मुलेही कापून टाकण्याप्रमाणे आहे.


१३०५
(पती मनातच) जे लोक अत्यंत निर्दोष असतात, अशांनाही प्रियेबरोबर प्रेमकलह करण्यात एकप्रकारची मोहक मधुर आकर्षकता वाटते.


१३०६
प्रिया कधीच रुसणार नसेल, कपाळाला आठया घालणार नसेल, तर प्रेमाची मधुर फळे मिळणार नाहीत; त्याण्ची अर्धा गोडी निघून जाईल.


१३०७
प्रेमकलहात एकप्रकारचे दुःख असते. प्रत्येक क्षणी आपण मनात म्हणत असतो, आमची लवकर गोडी होईल की अजून बराच वेळ लागेल?


१३०८
(पती स्वतःशीच) परंतु पत्नीला ऐकू जाईल अशा रीतीने) मी किती दुःखी आहे, हे पाहायला जर प्रिया जवळ नसेल तर या दुःखाचा काय उपयोग?


१३०९
थंडगार बागेत पाणी सुंदर दिसते; त्याप्रमाणे अत्यंत प्रेम करणान्या व्यक्तीच्या ठिकाणीच राग शोभून दिसतो.


१३१०
जी माझे सांत्वन करीत नाही, तिच्यासाठी माझे हृदय जर अजून झुरत असेल, तर केवळ मूर्खपणाच्या इच्छेचे हे फळ आहे.

सर्ग १३२ प्रेमकलहातील सूक्ष्मता

ती
१३११
हे लबाडा, हेनारीप्रिया, जेवढया म्हणून स्त्रिया आहेत, त्या सान्या आपल्या डोळयांनी तुला जणू खाऊनपिऊन टाकतात; मला नको जा तुझे आलिंगनफिलिंगन


१३१२
मी रागावलेली होते नि नेमकी त्याच वेळेस शिंक आली. "माझ्या प्रियाला शतायुषी कर" असे मी म्हणेन असे त्याला वाटले.

तो
१३१३
मी तिच्या गळयात हार घातला तरी "तुला दुसन्या तरुणीच्या डोळयांकडे बघायचे आहे" असे म्हणून ती फणकान्याने निघून जाते.


१३१४
मी जर तिला म्हटले की, "सर्वांपेक्षा तुझ्यावरच मी अधिक प्रेम करतो", तरी ती लगेच उसळून विचारते, "सर्वांपेक्षा म्हणजे कोणाकोणापेक्षा?"


१३१५
मी तिला जरी म्हटले, "आपण पुन्हा या जन्मी तरी विमुक् होणार नाही", तरी तिचे डोळे भरून आले. (पुढच्या जन्मीच्या वियोगाच्या शंकेने)


१३१६
मी तिला म्हटले, "दूर होतो तेव्हा तुला मनात आठवीत असे". मला बाहुपाशात घेणारी ती एकदम रागाने दूर होऊन म्हणाली, "मल; विसरला होतात एकूण! म्हणून आठवण करावी लागली!"


१३१७
मला शिंक आली तिने शुभ चिंतिले. परंतु आपला आशीर्वाद मागे घेऊन डोळयांत पाणी आणून तिने विचारले. "तुम्हांला शिंक आली. कोणी बरे तुमची आठवण काढली?


१३१८
मी माझी शिंक दाबली; तरीही ती साश्रू नयनांनी म्हणाली, "कोणती तरी तुझी दुसरी मौत्रीण तुझी आठवण करीत आहे, अशी शंका मला येऊ नये म्हणून ना शिंक दाबलीस?"
१३१९
तिचे सांत्वन करण्यासाठी मी नाना उपाय करावे; परंतु तिचा राग अधिकच वाढावा. कपाळाला आठया घालून तिने म्हणावे, "तुम्ही दुसन्या कोणाजवळ प्रेमकलह करताना बन्याच युक्त्या शिकलात एकूण!"


१३२०
तिच्या सौंदर्याने वेडावून उन्मत होऊन तिच्याकडे मी पाहू लागताच ती मला म्हणते, "माझ्या सौंदर्याशी कुणाच्या सौंदर्याची मनात तुलना करीत आहात?"

सर्ग १३३ प्रेमकलहातील गोडी

ती
१२२१
त्याचा काही दोष नसला तरी प्रेमकलहात तो जेव्हा माझी समजूत घालू लागतो तेव्हा तो फारच सुंदर दिसतो. असे सौंदर्य एरवी समजून आले नसते.


१३२२
प्रियकराच्या कोमल भावनांना जरी थांबावे लागले तरी या प्रेमकलहात एकमेमांना जे बारीक चिमटे आम्ही घेतले, त्यांतली गोडी निराळीच होती.


१३२३
प्रियकर आपण मनाने जर खरोखर एकरूप असू तर ज्या जमिनीवरून पाणी वाहते, त्या जमिनीची नि पाण्याची जशी समरसता असते तशीच आपलीही असेल. आणि असे असल्यावर प्रेमकलहासारखा स्वर्ग नाही


१३२४
प्रियकराजवळ माझे जे भांडण होते, त्यानेच माझ्या हृदयातील बळकट किल्लेकोट ढासळतात.

तो
१३२५
जरी आपण निर्दोष असलो तरी प्रियेने रागावून मिठी सोडून बाहू दूर घेणे यात एकप्रकारच आनंद असतो.


१३२६
भोजनापेक्षा पचन अधिक गोड आहे; त्याप्रमाणेच आलिंगनापेक्षा प्रेमकलहच अधिक मधुर आहे.


१३२७
प्रेमाच्या कलहात जो प्रथम शरण जातो तोच गिकतो. गोडीगुलावी जेव्हा होते तेव्हायाचा प्रत्यय येतो.


१३२८
थोडा वेळ क्रोधाचा आविर्भाव अणून आमच्या आलिंगनाच्या आनंदाला ती चव आणते.


१३२९
तिच्या आठया, तिचे रागावून बोलणे, मला आणखी थोडे अतुभवू दे; फक् एकच प्रार्थना की या रात्रीने जरा दीर्ध व्हावे.


१३३०
प्रेमकलह म्हणजे प्रेमातील गोडी, प्रेमातील शोभा आणि त्या आनंदातील परमानंद म्हणजे त्या गोडीतील परम गोडी म्हणजे मागून मिळणारे आलिंगन होय.

No comments:

Post a Comment