Friday, 1 June 2007

सर्ग 101-108Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग दुसरा: अर्थ
सर्ग १०१ संपत्तीचा उपयोग करणे


१००१
संपत्ती साठवून तिचा उपभोग घेणारा मृतवत समजावा.


१००२
राशिवेरी द्रव्य जमवून यत्किंचितही उपयोग करणारा कवडीचुंबक कृपण मनुष्य पुढील जन्मी भूत होईल.


१००३
जे नेहमी संचयच करतात, कीर्तीची ज्यांना स्पृहा नाही, त्यांचे जगणे पृथ्वीला भारभूत होय.


१००४
शेजान्यांचा लोभ, प्रेम, स्नेह मिळविण्याविषयी बेफिकीर असलेला आपल्या मागे ठेवील तरी काय?


१००५
जे दुस्न्यांस देत नाहीत, स्वतःही उपभोगत नाहीत, त्यांची कोटी कोटी संपत्ती असली तरी काय उपयोग?


१००६
जो दुसन्यास देत नाही, स्वतः भोगत नाही, तो संपत्तीला मिळालेला शाप होय.


१००७
जवळ असूनही गरजू माणसास देत नाही, तो एकटी राहून आपले तारूण्य व्यर्थ दवडणान्या तरुणीप्रमाणे आहे.


१००८
ज्याच्यावर लोकांचे प्रेम नाही, त्याचे वैभव गावाच्या मध्यभागी वैभवाने शोभणान्या विषवृक्षाप्रमाणे आहे.


१००९
जो मनात कधीही धर्मविचार करीत नाही, केवल धनाच्या राशी जोडीत असतो, तो स्वतःचे नि मन दोघांना अपाशी ठेवतो. त्याचे द्रव्य दुसन्यांचे धन होते.


१०१०
उपकार करण्यात ज्याने सारे गमावले, त्याला आलेली कष्टदशा रिकाम्या झालेल्या पावसाळी ढगाप्रमाणे समजावी; ती फार वेळ राहणार नाही.

सर्ग १०२ लज्जेची जाणीच


१०११
स्वतःला शोभणारे कर्म करायला सज्जन लोक लाजतात. त्यांची ही लज्जा स्त्रियांच्या लज्जाशीलतेहून निराळी असते.


१०१२
अन्न, वस्त्र, संतती या गोष्टी अर्वांना सारख्याच असतात. माणसाचे वैशिष्ट्य वरील लज्जाशीलतेत आहे.


१०१३
प्राण शरीरात असतो; थोरपणा पवित्र लजाशीलतेत असतो.


१०१४
सलज्जता हा थोरांचा अलंकार होय; निर्लज्जपणे बडबडणारा दोळयांपुढे नको असे वाटते.


१०१५
दुसन्याचा अपमान स्वतःचा समजून जे खाली मान घालतात, ते कोमल मधुर भावनांचे माहेर होत.


१०१६
ज्या साधनांचा उपयोग केल्याने मान खाली घालावी लागणार नाही, अशा साधनांहून भिन्न साधनांनी थोर लोक राज्य मिळविण्याचाही प्रयत् करणार नाहीत.


१०१७
ज्यांची स्वाभिमान-भावना उती हळुवार आहे, ते अपकीर्ती व्हावी म्हणून प्राणही फेकतील; प्राण वाचावेत म्हणून ते लाज उगाळून पिणार नाहीत.


१०१८
ज्या गोष्टींमुळे दुसन्यास लाज वाटते, त्या गोष्टींनी ज्यांना लाज वाटत नसेल, त्यांच्याबद्दल धर्माला लाज वाटते.

१०१९
परंपरागत कुलाचार पाळल्याने मनुष्य कदाचित कुटुंबाला मुकेल; परंतु तो लाजच सोडील तर त्याला सान्याच हितमंगलाला मुकाबे लागेल.
१०२०
ज्यांना लाज नाही, ते जिवंत असून मेलेलेच समजावे; कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे ते जीवनाचे नाटक करतात झाले!

सर्ग १०३ कुटुंबाला कळा चढवा


१०२१
हातांनी काम करयला मी दमणर नाही, अशा निश्चयासारखे कुटुंबाची भरभराट करणारे दुसरे साधन नाही.


१०२२
पुरुषार्थशाली श्रम, भरपूर काम, उत्कृष् व्यवहारज्ञान, हे गुण ज्या कुटुंबात आहेत ते वर चढलेच समजा.


१०२३
मी माझ्या घरण्याला चांगले दिवस आणीन, अशा निश्चयाने जो बाहेर पडतो, व्याच्यासाठी देवसुद्धा कमर कसून कामाला पुढे होतात.


१०२४
कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा म्हणून जे श्रमांत कधी खंड पडू देत नाहीत त्यांनी मनात जरी मोठेमोठे मनसुबे केलेले नसले, तरीही त्यांची भरभराट होईल.


१०२५
असत्याचरण करता जो आपल्या घरणाल्या ऊर्जित दशा आणतो; त्य्चे सारे जग मित्र होते.


१०२६
ज्या घराण्यात आपण जन्मलो, त्या घरण्याचा मान वाढविणे, त्याची कीर्ती वाडःअविणे, यात खरा पुरुषार्थ आहे.


१०२७
रणांगणात जो शूरवीर असतो, त्याच्यावर सारा भार येऊन पडतो; त्याप्रमाणेकुटुंबाचा भारसुद्धाजो सहन करील, त्याच्यावरच येऊन पडतो.


१०२८
आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षाची ज्याला इच्छा आहे, त्याने वेळ वाया दवडू नये. तो जर मौजा मारीत बएल, आपण मोठे आहोत अशा ऐटीत राहील, तर घरण्याला अवकळा येईल.


१०२९
येणान्या प्रत्येक आघातापासून जो घराचे रक्षण करतो, त्य्चे शरीर श्रमासाठी, कष्टासाठीच केवळ असावे ना?


१०३०
ज्या घरण्याला आधार द्यायला समर्थ पुरुष नाही, त्या घराण्याची पाळेमुळे संकटे खणून टाकतील.

सर्ग १०४ कृषी; शेती
१०३१
कोठेही गेलात तरी शेचटी अन्नासाठी नांगराच्या पाठीमागे उभे राहावे लागणारच. किती कष् पडले तरी शेवटी कृषी हाच सर्वोत्तम धंदा होय, प्रमुख धंदा होय.


१०३२
समाजावे आधारस्तंभ शेतकरी होत; शेत नांगरण्याची शक्ती नसल्यामुळे जे इतर धंदे करतात, त्यांचाही शेतकरीच आधार असतो.


१०३३
जमीन कसून जे राहतात, तेच खरोखर जगतात. बाकी सारी दुनिया त्याच्या पाठोपाठ येते नि मिंधेपणाची भाकर खाते.


१०३४
ज्या राजाच्या राज्यात भरदार कणसांच्या छायेत शेते विसावा घेत असतात, त्या राजाच्या छत्रासमोर जगातील इतर राजांची छत्रे लवलेली दिसतील.


१०३५
शेती कर्य़्न जे भाकर खातात, ते स्वतःच्या पोटासाठी कधी याचना नाहीच करणार; उलट भिक्षा मागणान्याला कधीही नाही म्हणता भिल्षा घातलील.


१०३६
शेतकरी हात जोडून बसेल तर सर्व इच्छांचा त्याग करणान्या निरिच्छ लोकांसही जगणे जड जाईल.


१०३७
जमीन नांगरून आत सूर्याची उष्णाता जाऊन एक शेर मातीचे वजन जर तॊ पावशेर करशील तर मूठभर खत घालताही अपरंपार पीक येईल.


१०३८
नांगरण्यापेक्षा खताने जास्त फायदा होतो; आणि नीट तण काढाल तर पाटबंधान्यापेक्षाही अधिक फायदा होईल.


१०३९
शेतांकडे जाता मनुष्य जर घरीच बसेल तर त्याही शेते पत्नी रागावते त्याप्रमाणे रुसतील, रागावतील.


१०४०
"मला काही खायला नाही" असे जेव्हा आळशी म्हणतो, तेव्हा ही स्स्यश्यामल वसुंधरा, ही धरणीमाता स्वतःजवळ हसते.

 
सर्ग १०५ दारिद्र्य


१०४१
दारिद्रयाहून अधिक दुःखप्रद काय, असे विचारशील तर दारिद्रयाहून अधिक दुःख[रद दारिद्रयच, हे नीट ध्यानात धर.


१०४२
या लोकी वा परलोकी दारिद्रयामुळे सुख नाही, आनंद नाही.


१०४३
दारिद्रयामुळे स्वाभिमान मरतो, वाणीतील सुसंस्कृतता जाते.


१०४४
दारिद्रयामुळे थोरामोठायांनही आपला मोठेपणा विसरण्याची पाळी येते आणि दास्याची नीच भाषा तेही बोलू लागतात.


१०४५
दारिद्रयाच्या एका शापात असंख्य मानहानिप्रद प्रसंग असतात.


१०४६
दरिद्री लोकांनी मोठमोठी तत्त्वज्ञाने अपार्बुद्धिवैभवाने विशद करून सांगितली तरी त्यांच्या शब्दाला मान मिळणार नाही.


१०४७
गुणाहीन दारिद्रय अतिशापरूप आहे. मायलेकरांचीही ते ताटातूट करते.


१०४८
आजही दारिद्रय मझा सोबती आहेच का? काल त्याने मरणान्तिक दुःख दिलेच होते!


१०४९
रसरशीत निखान्यांचीही मी सुखशाय्या करीन; परंतु दारिद्रयात क्षणभरही दोळा लगणे कठीण.


१०५०
दरिद्री लोकांना एकच मार्ग मोकळा आहे. तो म्हणजे मरणाचा. ते असे करतील तर मिठाला नि पेजेला मरण आहे. (भीक मागून जगतील, ते अन्न व्यर्थ गेल्याप्रमाणे)

सर्ग १०६ भिक्षा मागणे


१०५१
ज्यांच्याजवळ द्यायला आहे आणि देतील अए तुला वाटते, त्यांच्याजवळ याचना कर. तरीही आमच्याजवळ काही नाही, असे ते म्हणाले तर तो त्यांच्या दोष.


१०५२
कोणत्याही प्रकारचा पाणउतारा होता जे मागिलतेस ते गर तुला मिळाले तर ते मागणेही आनंद देईल.


१०५३
जे कर्तव्य जाणतात, देण्याची आपली ऐपत नाही, असे जे खोटेपणाने दाखवीत नाहीत, अशांजवळ मागण्यातही एकप्रकारची शोभा असते.


१०५४
स्वप्नातही जो नकार देत नाही, अशाजवळ मागणे म्हणजे देण्याप्रमाणेच सन्मानाचे आहे.


१०५५
लोक निःशंकपणे याचकाचा पेशा स्वीकारतात; कारण आपखुशीने भिक्षा घालणारे असतात.


१०५६
दया दाखविण्याचा दुर्गुण ज्याच्याजवळ नाही, अशाच्या दर्शनानेच दरिद्री माणसाचे दुख दूर होते.


१०५७
रागवता, बोलता, जो भिकान्याला देतो, त्याला पाहून भिकान्याचे हृदयही आनंदते.


१०५८
जगात भिक्षामागणारे नसते तर जगाला अर्थच य्रला नसता. सारा स्वार्थी खाबूनंदांचा पसारा दिसला असता.


१०५९
याचकच नसते, तर दातृत्वाचा मोठेपणा कसा दिसता?


१०६०
खरोखरच माझ्याजवळ द्यायला काही नाही, असे जेव्हा काकुळतीने कोणी म्हणतो तेव्हा मागणान्याने रुष् होऊ नये. आपल्याचसारखा दुसरा असणे शक्य आहे हे वास्तविक कळायला हवे.

सर्ग १०७ भीक मागणे नको


१०६१
प्रेमाने जरी मगणान्याला मिळाले, तरी अशा भीक मागणान्यापेक्षा भीक मागणारा शतपट होय.


१०६२
अन्नासाठी दारोदर भीक मागण्याची पाळी आली असताही माणसाने जगावे अशी जर विद्यात्याची इच्छा असेल, तर त्याने जगभर भीक मागत भटकावे नि मरून जावे.


१०६३
भीक मगून मी माझे दारिद्रय दूर करीन , असे म्हणाण्यात जे धाडस आहे त्याहून अन्य मोठे धाडस नाही.


१०६४
अत्यंत दारिद्रय आले, असताही जो मानी पुरुष याचना करीत नाही, त्याचा मोठेपणा या त्रिभुवनात मावणार नाही.


१०६५
स्वतःच्या हातांनी कष् करून मिळवलेले अन्न-मग ती पाण्यांसारखी कांजी का असेना- त्याची चग काही औरच असते.


१०६६
तोंडाने भिकेची प्रार्थना करणे याहून मानहानिकारक मिंधे या जगात काही नाही.


१०६७
भीक मागणान्यांजवळ मी एक भीक मागतो:- "भीक मागायचीच असेल तर जे द्यायला तयार असतील, त्याच्याजवळच मागा!"


१०६८
भिकेचे गलबत सुरक्षित नाही. दुसन्याने नाही म्हणतात ते फुटते.


१०६९
भिलान्याची गोष् मनात येताच हृदय द्रवते; परंतु त्याला मारणान्या गचांडया, त्याचे होणारे अपमान, त्याला मिळण्यान्या शिव्या, यांचा विचार मनात येतात हृदय मरूनच जाते.


१०७०
याचकाला पाहताच जो तोंड फिरवितो त्याचे प्राण असतात तरी कोठे? कारण त्याला हिडिसफिडीस करण्याने त्या याचकाचे प्राण जात असतात.

सर्ग १०८ अधःपतित जीवन


१०७१
अधःपतित लोक दिसायला अगदी इतर माणसांप्रमाणेच असतात; परंतु जीवनात केवढा फरक!


१०७२
सदसद्विवेकबुद्धीला मानणान्यांपेक्शा हे पापी लोक किती सुखी! यांना हृदयाची टोचणी नाही, मनाची बोचणी नाही.


१०७३
पृथ्वीवरचे दुष्, नीच लोक म्हणजे जणू देव; कारण स्वतःचा कायदा ते स्वतःच करतात.


१०७४
त्या पाप्याहून मी किती अधिक पापी, असे मनात येऊन पापशिरोमणी स्वतःला धन्य मानील.


१०७५
अधःपतित लोक भीतीमुळे आणि लालसेमुळे सारे करीत असतात. परंतु भीतीचाच हेतू प्रभावी असतो.


१०७६
नीच लोक वाद्याच्या नादाप्रमाणे असतात. त्याच्याजवळ गुप् म्हणून काही सांगाल, तर लगेच जगभर त्यांचा ते डांगोरा पिटतील.


१०७७
नीच लिक त्यांचे थोबाड फोडणान्यांसमोरच वाकतील. बाकी कोणला ते हाताला लागलेली शितेही देणार नाहीत.


१०७८
शहाण्याला शब्दाच्या एका इशान्याने सांगता येते; परंतु नीचाला उसाप्रमाणे चिरडावे लागते.


१०७९
शेजान्याला नीट खायला, प्यायला आहे असे पाहताच नीच लोक त्याची कुटाळकी करायला, त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तयार होतात.


१०८०
आपत्ती आली असता नीच मनुष्य एकच गोष् करतो: तो लगेच स्वतःला दुसन्याचा गुलाम म्हणून विकतो.

No comments:

Post a Comment