Friday, 1 June 2007

सर्ग 11-20Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल 
भाग पहिला: धर्म
 सर्ग ११: कृतज्ञता
९०९
जगाचे उपकार नसताही जगावर उपकार करणे, त्याची फेड स्वर्गपृथ्वी दिल्यानेही होणार नाही.
९०२
वेळेवर केलेला उपकार नि दाखविलेली दया, ही लहान असली तरीही त्यांचे वजन या सान्या पृथ्वीहूनही जास्त आहे.
९०३
प्रत्युपकाराची अपेक्षा य़्हेवता केलेल्या उपकारासमोर हा महान समुद्रही क्षुद्र आहे, तुच्छ आहे
९०४
तुम्हाला मिळालेली मदत मोहरीच्या दाण्याएवढी असली, तरी श्रेष्ठांच्या मते ती वटवृक्षाहूनही थोर आहे.
९०५
दिलेल्या साहाय्याचा मापाने कृतज्ञतेचे मोजमाप करावयाचे नसते. ज्याने साहाय्याचा स्वीकार केला, त्याच्या मनाचा मोठेपणा हे कृतज्ञतेचे माप असते.
९०६
विशुद्ध ची मैत्री कधी विसरू नको. आपत्तीत ज्यांनी तुला आधार दिला, त्यांना सोडू नको.
९०७
जे खरे तोर आहेत, ते वेळेवर मदत करणान्यांची सात जन्मही कृतज्ञतेने आठवण करतील.
९०८
दाखविलेली दया विसरणे हा अनुदारपणा आहे; परंतु केलेला अपमान तत्काल विसरणे, हे मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे.
९०९
शत्रूने केलेला एखादा उपकार जर आठवला, तर त्याने केलेली असह्य जखमही आपण विसरून जाऊ.
९९०
सर्व प्रकारचे अपराध करणान्या पाप्यालाही उद्धाराची आशा आहे; परंतु कृतघ्न माणसास मात्र ती नाही.

 सर्ग १२:न्यायीपणा
९९९
न्यायीपणा म्हणजे सदाचाराचा आध्यन्त आहे. शत्रू असो, मित्र असो; त्याला त्याच्या योग्यतेनुरूप देणे याला न्यायीपणा म्हणतात.
९९२
न्यायाने वागणान्याचे वैभव कमी होत नाही; ते अतिदूरच्या पिढयांपर्यतही टिकते
९९३
सत्पथच्युत होण्याने संपत्ती मिळणार असली, तरी ती घेऊ नका. केवढाही फायदा होणार असला, तरी दूर राहा.
९९४
परिणामावरून त्या त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरत असते, शहानिशा होत असते.
९९५
सुखदुःख सर्वच्याच वाटचास येते; परंतु थोर मनुष्याचे न्यायी हृदय हे त्याचे खरे भूषण होय.
९९६
ज्या क्षणी तुझे हृदय सत्पथच्युत होऊन असत्पथाकडे वळू लागेल, त्या क्षणी तुझा विनाश जवळ आला असे समज
९९७
न्यायी नि सद्गुणी माणसाच्या दारिद्र्चाकडे जग तिरस्काराने पाहात नाही.
९९८
ती तराजूची सरळ दांडी न्यायाने मापते. त्या दांडीप्रमाणे सरळ राहून इकडे तिकडे झुकता न्यायनिष्ठ राहण्यात शहाण्या माणसाचा गौरव आहे.
९९९
जर हृदयात सदैव सत्य असेल, तर त्या मनुष्याच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द म्हणजेच खरा न्याय होय.
९२०
स्वतःच्या फायध्याप्रमाणेच जो व्यापारी दुसन्याच्या फयध्याकडे बघतो त्याचा पसारा वाढल, वैभव वाढल.

सर्ग १३: संयम
९२९
संयम स्वर्गाकडे नेतो; बेताल वासना-विकार अनंत अंधारात नेतात.
९२२
संयमाला मौल्यवान ठिव्याप्रमाणो जप. जगात याहॊन अधिक मेलाचे काहे नाही.
९२३
या जगातील वस्तूंचे योग्य मूल्यमापन जो करतो आणि संयमी जीवन जगतो, त्याला ज्ञान इतर आनंद प्राप्त होतात
९२४
ज्याने मन जिकले आणि जो कर्तव्यदक्ष आहे, तो पर्वताहूनही भव्य आहे.
९२५
नम्रता सर्वानाच शोभते; परंतु श्रीमंताचे ठिकाणि ती सकल सौंदर्याने शॊभते.
९२६
कासवाप्रमाने इंद्रिये जो आकर्षून ठेवतो, त्याला सात जन्म पुरेल इतका मोठा ठेवा मिळयो.
९२७
दुसन्या कोणत्या जोष्टीला लगाम नाही घालता आला, तर निदान जिभेला तरी घाल; उच्छृंखल जीभ वाटल ते बोलेल आणि तुला दु:खाच्या दरीत लोटेल.
९२८
एका शब्दानेही दुसन्याला दुखविलेस, तर तुझ्या सर्व गुणांची माती झाली उसे समज.
९२९
विस्तवाने भाजलेले बरे होते; परंतु जिमेने भजल्यामुळे झालेली जखम कधी सुकत नाही.
९३०
अंतःकारणात क्रोधाला थारा देणान्या संयमी स्थितप्रज्ञावे दर्शन घ्यायला प्रतुअक्ष येतो.

सर्ग १४: शुद्ध वर्तन
९३९
ज्याचे वर्तन विशुद्ध आहे, त्याला सारे सन्मानतात. प्राणहूनही विशुद्ध वर्तनाला अधिक महत्व आहे.
९३२
आपल्या वर्तनाकडे डोळयांच तेल घालून पाहत जा. तू जगात कितीही शोध केलास, तरी सद्वर्तनासरखा मित्र तुला मिळणार नाही
९३३
विशुद्ध जीवनावरून सत्कुलजता कलून येते; नीच वर्तनाने मनुष्य नीचांत जाऊन पडतो.
९३४
विसरलेले वेदही पुन्हा पाठ करता येतील; परंतु सत्पथच्युत ब्राह्मण चिरपतित झाला.
९३५
मत्सर्ग्रस्तास वैभव नाही, त्याचप्रमाणे दुराचारी माणसासही.
९३६
निग्रही लोक सन्मार्गवर दृढ राहतात. उन्मार्गगामी होण्याने कोणत्या आपत्ती येतात याची त्यांना जाणीव उसते.
९३७
सदाचारी मनुष्य सर्वत्र गौरविला जातो; दुराचारी माणसास सर्वत्र अपवाद नि अपकीर्ती सोसावी लगतात.
९३८
सदाचार भाग्ययाची जननी; तर दुराचार संकटाची जजनी.
९३९
चुकूनही सत्कुळात जन्मणान्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडणार नाही.
९४०
मूर्खना तू कितीही शिकवायची खटपट केलीस, तरी सदाचारी माणसांप्रमाणो वागायला ते कधीच शिकणार नाहीत.

 
 सर्ग १५: परस्त्रीकडे पाहू नको
९४९
ज्याची दृष्टी सद्धर्मकडे आहे, ज्याला भाग्य हवे आहे, तो परस्त्रीची इच्छा करण्याचा मूर्खपणा कधीही करणार नाही.
९४२
दुसन्याच्या उबरठयाचे अतिक्रमण करणारा पतिताहून पतित समजावा.
९४३
विश्वासाने राहणान्या मित्राच्या घरावरच जे हल्ला करतात, ते खरोखरी मृत्यूच्या जबडयात पडतात.
९४४
व्यभिचारामुळे किती मानहानी होतो, कशी मान खाली घालावी लागते, हे दिसत असूनही जर कोणी व्यभिचार करील तर त्याचा इतर कितीही मोठेपणा असला तरी काय कामाचा?
९४५
शेजान्याची बायको मिळणे शक्य आहे म्हणून तिच्याकडे डोळे लावून बसणान्याचे नाव कायमचे बद्दू होईल.
९४६
व्यभिचारी माणसाची द्वेष, पाप, भोती, लज्जा या चारांपासून सुटका नाही.
९४७
शोजान्याच्या बायकोच्या सौंदर्याने जो विचलित होत नाही, तोच खरा सत्प्रवृत्त गृहस्थ होय.
९४८
परस्त्रीकडे कधीही पाहणारा मनुष्य केवल थोर आहे; एवढेच नव्हे तर तो संत आहे.
९४९
परस्त्रीच्या बाहुपाशात जो पडत नाही, तो जगातील सर्व मंगलांचा मालक होईल
९५०
इतर पापांपासून परावृत्त नाही होता आले, तर निदान इतके तरी कर की कधी व्यभिचार करू नको. इतके केलेस तरीही प्रतिष्ठा मिळेल.

 सर्ग १६: क्षमा


९५९
आपले पोट फाडणान्यांचेही ही पृथ्बी पोषण करते, धारण करते; त्याप्रमाणे तुला दुःख देणान्यांचाही सांभाळ कर. कारण यातच खरा मोठेपणा आहे.
९५२
दुसन्यांनी कितीही अपाय केले तरी तू क्षमाच कर; आणि ते सारे विसरून गेलास तर सोन्याहून पिवळे.
९५३
दुसन्याचे स्वागत करणे हे खरे लज्जास्पद दारिद्र्य; मूर्खच्य मूर्खपाणाचाही राग येऊ देणे हे खरे थोर सामर्थ्य.


९५४
थोरपणा हवा असेल, सदैव उन्नत राहण्याची इच्छा असेल, तर दुसन्यांनी केलेल्या अतिक्रमणाची सदैव क्षमा करण्याची सवय मनःपूर्वक प्रयत्नांनी लावून घे


९५५
उपकाराचा बदला घेणान्यांविषयी शहाण्यांना फारसे काही वाटत नाही; परंतु शत्रुलाही क्षमा करणान्यांना ते सोन्यामोत्यांप्रमाणे जपतात.


९५६
सुडाचा आनंद एक दिवस टिकतो; क्षमा करणान्यांचे यश चिरंजीव आहे.


९५७
तुम्हांला झालेला अपाय केवढाही मोठा असो, भोगावे लागलेले दुःख किती का तीव्र सेना त्या गोष्टी मनाला लावून घेणे, सूडबुद्धी मनात येऊ देणे, यात खरा चांगुलपाणा आहे.
९५८
अह कारामुळे ज्यांनी तुला दुखविले, त्यांना मनाच्या थिरपणाने जिंकून घे.
९५९
उपहास करणान्यांच्या विशारी जिभेला जे शांतपणे सहन करतात, ते सर्वसंगपरित्याग केलेल्या संन्याशांहूनही थोर आहेत.
९६०
उपवास करून तप करणारे मोठे खरे; परंतु दुसन्यांनी केलेल्या निंदेची, उपहासाची जे क्षमा करतात, अशंच्या खालीच त्यांचा नंबर

 सर्ग १७: निर्भत्सरता


९६९
ज्या वेळेस हृदयात मत्सराचा लेशही आढळणार नाही, त्या वेळेसच तुझे हृदय सद्गुणांकडे जात असे समज.
९६२
निमंत्सर स्वभावाहून अधिक थोर श्रेष्ठ असे दुसरे काय आहे?
९६३
ज्याला सद्गुणांची पर्वा नाही, भाग्याची इच्छा नाही, तोज शेजान्याच्या भरभराटीचा आनंद मानता मत्सर करील.
९६४
शहाणे लोक मत्सरग्रस्त होऊन दुसन्यास कधी अपाय करीत नाहीत. कारण अशा नीच भावना मानत खेळविल्याने काय तोटे होतात, ते त्यांना माहीत असते.
९६५
मत्सरी माणसाच्या मनातील मत्सर हीच त्याला शिक्षा होय, कारण त्याच्या शत्रूंनी जरी त्याला वाचविले तरी त्याच्या मनातील मत्सर त्याचा नाश करील.
९६६
दुसन्याचे वैभव ज्याला बघवत नाही, त्याच्या कुटुंबाला दोन प्रहरची भ्रांत पडेल.


९६७
लक्ष्मीला मत्सरी माणसे आवडत नाहीत, आपल्या वडीलबहिणीच्या- विपत्तीच्या- त्यांना स्वाधीन करून ती निघून जाते.
९६८
अतिमत्सराने मनुष्य भिकेला लागते आणु शेवटी नरकात जातो.
९६९
मत्सरी वैभवात आणि उदार मनुष्य विपत्तीत? छेः, असे होणे म्हणजे नवलच म्हणायचे.
९७०
द्वेषमत्सराने कधीही भाग्य लाभले नाही; उदाराला कधीही बाघ्यच्युत व्हावे लागले नाही.

सर्ग १८: निर्लोभता


९७९
परधनाचा लोभ धरायला ज्याला दिक्कत वाटत नाही, त्याची दुष्ट बुद्धी वाढत जाईल आणि त्याच्या कुटुंबाला अवकळा येईल.
९७२
वाईटापासून परावृत्त होणारे लोक निर्लोभ असतात; कुकर्म करायला ते कधीही प्रवृत्त होत नाहीत.
९७३
ज्यांना खन्या आनंदाची तहान आहे ते क्षुद्र सुखांचा लोभ करीत नाहीत, अन्यायाचा कधी आश्रय करीत नाहीत.
९७४
थोर दृष्टीचे संयमी लोक "आम्हांला अमुक पाहिजे, आमच्याजवळ अमुक नाही" असे लोभाविष्ट होऊन कधी म्हणत नाहीत.
९७५
तुमची बुद्धी कितीही मूलग्राही नि सुरक्ष असली, तरी ती लोभवश होऊन तुम्हांला मूर्खपणाची कृत्ये करायला जर संमती देत असेल तर तिचा काय उपयोग?
९७६
ईश्वराची कृपा व्हावी म्हणून ज्याला तळमल आहे, ईश्वराकडे जाणान्या मार्गावर जो आहे, अशाने द्रव्यहेतू मनात धरून जर दुष्ट बेत केले तर त्याचाही नाश होईल.
९७७
लोभाने गोळा केलेल्या संपत्तीचा लोभ धरू नका. कारण सुखाची वेळ आली तरीही त्या संपत्तीचे कटुच फळ मिळणार.
९७८
तुझ्या पुंजीत कमी पडायला नको असेल, तर शोजान्याच्या द्रव्याचालोभ नको करू
९७९
न्यायी निर्लोभी अशा प्रज्ञावंताची योग्यता लक्ष्मी जाणते त्याला शोधीत येते.
९८०
अदूरदर्शी लोभामुळे सर्वनाश होतो; परंतु निरिच्छ मनाचा मोठेपणा सर्वत्र विजयी होतो.

 सर्ग १९: निंदा करू नको


९८९
जो अन्यायाने वागते, सदाचाराचे नावही जो कधी काढीत नाही, अशाही मणसाला उद्देशून "हा पाहा मनुष्य; हा कधी कोणाची त्याच्या पाठीमागे निंदा करीत नाही". असे जर कोणी म्हणाले तर ते ऐकून त्या माणसासही समाधान वाटते.
९८२
चांगले सोडून वाईट करणे म्हणजे चूकत; परंतु तोंडावर हसून मागे निंदा करणे हे मात्र फारच वाईट.
९८३
असत्याने नि परिनिंदेने जगण्यापेक्षा तत्काळ मरणे शतपटींनी बरे.
९८४
एकाध्याने तुमच्या तोंदावर जरी तुमचा अपमान केला असला, तरी त्याच्या पाठीमागे तुम्ही त्याची निंदा करू नका.
९८५
ओठावर धर्मवचने असली, तरी निंदाखेर जीभ हृदयाची क्षुद्रता प्रकट करतेच.
९८६
तू दुसन्याची निंदा केलीस तर तोही तुझी सारी उणी पाहील; तुझे सारे किळसवाणे प्रकार तोही बाहेर काढील.
९८७
निंदेतच आनंद मानणान्यांना मैत्री जोडण्याची मधुर कला अवगत नसते. त्यांचे जुने मित्रही त्यांच्या निंदेला विटून, कंटाळून त्यांना सोडून जातील.
९८८
मित्रांचे दोषही जगाला सांगण्यात ज्यांना आनंद वाटतो, ते शत्रूचे दोष कसे पाहणार नाहीत?
९८९
पाठीमागे निंदा करणान्यांचा भार धरित्रीला कसा बरे सहन होतो? केवल कर्तव्य म्हणूनच भूमाता हे करीत असेल.
९९०
शत्रूच्या दोषांचे आविष्करण, पृयवकरण करता, त्याप्रमाणे स्वत:च्या दोषांचे निरीक्षण-परीक्षा कराल तर पाप जवळ येईल का?

सर्ग २०: पोकळ बडबड नको


९९९
उगीच बडबड करून दुसन्यांच्या कानंना सतावणारा-त्याच्यावर श्रेते संतापतात, सारे लोक त्याचा तिरस्कार करतात
९९२
आपल्या मित्रांना दुखविण्यापेक्षाही  दुसन्यांच्यासमोर पोकळ बडबड करणे फार वाईट आहे.
९९३
जो वल्गाना करतो तो स्वतःची नालायकी उद्घोषितो.
९९४
एखाध्या सभेत उगीच व्यर्थ बडबड केल्याने फायदा तर नाहीच; य्लट जो काही आपले चांगले असते, तेही आपणांस सेडून जाते.
९९५
तुम्ही किती का मोठे असाना, उगीच वटवट कराल, वृथा वल्गना कराल, तर सारा मानसन्मान गमावून बसाल.
९९६
पोकळ बल्गनांवर प्रेम करणान्याला सारहीन तूस म्हणा, भूस म्हणा.
९९७
योग्य वाटले तर वेळप्रसंगी शहाण्यांनी कठोर शब्दही वापरले तरी ते चलेल; परंतु निरर्थक बडबडीपासून दूर राहणे हे त्यांच्याही हिताचे आहे.
९९८
गहन प्रश् सोडविण्यात गढून गेलेले लोक अर्थगंभीर शब्दांशिवाय निरर्थक शब्द बोलत नाहीत.
९९९
ज्यांची दृष्टी पूर्ण आहे, ते चुकूनसुद्धा पोकळ शब्द बोलत नाहीत.
२००
बोल्ण्यास योग्य असेच शब्द बोल; पोकळ शब्द कधी बोलू नकोस.

No comments:

Post a Comment