Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल |
भाग
तिसरा: काम
सर्ग
१०९ सुंदरीने हृदयास केलेली जखम
|
|
|
तो
|
१०८१
|
ती लावण्यमयी, हिरण्मयी मूर्ती! ती का वनदेवता होती? मत्त मयूरी होती? की ती सरल सुंदर बाला होती? खरोखर, मी चकित होऊन गेले आहे.
|
|
|
१०८२
|
आपल्या सर्व संभारासह रंभा जर मोह पाडायला आली, तर जशी दशा होईल तशीच हुबेहूब तिने माझ्या दृष्टीला दृष्टी भिडवताच माझी झाली.
|
१०८३
|
मृत्युदेवाची मला पूर्वी कल्पना नव्हती; परंतु आता कळून आले की, मृत्यू स्त्रीरूपाने येतो व त्याचे डोळे विशाल नि जिंकून घेणारे असतात.
|
|
|
१०८४
|
ती साधी, सुंदर आहे; परंतु तिचे डोळे मात्र मोठे लढाऊ आहेत; कारण जे तिच्याकडे पाहतात त्यांचे प्राण ते डोळे प्राशून टाकतात.
|
१०८५
|
मी अंतकाल बघत आहे की फक्त सोळयांनाच बघत आहे? की हे हरिणापाडसाचे दॊळे आहेत? कारण या साध्या तरुणीच्या डोळयांत तिन्ही मला दिसत आहेत.
|
१०८६
|
ज्या वेळेस तिच्या भुवया खाली वाकून पाहायचे बंद करतील व तिच्या मुद्रेवर पडदा घालतील, तेव्हाच तिचे डोळे मला विव्हल करणार नाहीत, माझ्यात कंप उत्पन्न करणार नाहीत.
|
|
|
१०८७
|
मत्त हत्तीच्या डोळयांवर ज्याप्रमाणे झापण असते,त्याप्रमाणे त्या चारुगात्रीच्या स्तनांवर अंशुक आहे.
|
१०८८
|
रणांगणावर माझा पराक्रम न अनुभवताही मला पाहून मोठमोठे कापू लागतात. अशा मलाही तिने आपल्या भालप्रदेशाने जिंकून घेतले आहे.
|
१०८९
|
हरिणीप्रमाणेतिची दृष्टी निष्कपट नि खेळकर आहे; विनय हा तिचा विशेष अलंकार आहे. मग तिचे नैसर्गिक सौंदर्य कमी करणारी इतर भूषणे तिच्या अंगावर कशाला?
|
१०९०
|
मद्याने आनंद होतो; परंतु तो ते घेणारालाच; प्रेमाने पाहताच जसा आनंद होतो, तसा त्याने होत नाही.
|
सर्ग
११० बाह्य लक्षणांनी हृदय ओळखणे
|
|
|
तो
|
१०९१
|
सुरमा घातलेल्या तिच्या डोळयांचा पाहण्याच्या दोन तन्हा आहेत. एका तन्हेने हृदय विद्ध होते, तर दुसन्या तन्हेने व्यथा होते.
|
१०९२
|
प्रियकराने आपले डोळे बाजूला वळवताच त्याच्याकडे चपलेप्रमाणे पटकन चोरून पाहणे यात अर्धप्रेम नसून संपूर्ण प्रेम आहे असे समजावे.
|
१०९३
|
तिने पाहिले नि खाली मान घातली; आम्हा दोघांच्या मनांत वाढणान्या प्रेमरोपाला त्यामुळे पाणी मिळाले.
|
१०९४
|
मी तिच्याकडे बघताच्ती जमिनीकडे पाहू लागते; परंतु मी दुसरीकडे पाहू लागताच ती माझ्याकडे पाहून मंद स्मित करते.
|
१०९५
|
तिची दृष्टी मजकडे नाही असे वाटते खरे; परंतु माझ्याकडे तिरप्या दृष्टीने पाहायचे तिच्या नुसते मनात येताच ती अपरंपार आनंदते, हे तिच्या स्मितावरून माझ्या लक्षात येते.
|
१०९६
|
प्रिया नि प्रियकर, दोघांनी संतापलेल्या परक्या माणसाप्रमाणे बोलण्याचा आव आणला तरी ते प्रेमाचे बोलणे आहे, हे एका क्षणात ओळखता येते.
|
१०९७
|
जे झिडकारण्याचे सोंग करतात, परंतु मनातून जे खरोखर प्रेम करीत असतात, ते अर्धवट कानौघाडणीचे व रागावल्यासारखे बोलतात.
|
१०९८
|
माझी दीन मुद्रा पाहून त्या तन्वंगीचे हृदय द्रवले. तिने स्मित केले, प्रेमळपणे पाहिले, त्यामुळे तिने सौंदर्य अधिकच वाढले.
|
|
|
१०९९
|
जे आपल्यावर प्रेम करतात, त्यांच्या दृष्टीत आपल्याविषयी अत्यंत उदासीनता असते; जणू मुळीच परिचय नाही असे ते डोळे दाखवू इच्छितात.
|
|
|
११००
|
दृष्टी दृष्टीला जेव्हा संमती देते, तेव्हा वाणीचा काही उपयोग नसतो.
|
सर्ग
१११ एकता
|
|
तो
|
|
११०१
|
या तरुणीच्या ठिकाणी सारे सुखानंद एकत्रित झाले आहेत. तिच्या हातातील कंकणे कशी चमकत आहेत पाहा.
|
|
|
११०२
|
ज्या करणाने रोग होतो, त्याच्याहून भिन्न अशा गोष्टीत त्या रोगावरचा उपाय असतो; परंतु ही तरुणीच विव्हल करते; नि सुखही तीच देऊ शकेल.
|
|
|
११०३
|
प्रियेच्या कोमल बाहुपाशात जी माधुरी आहे, तिच्याहून अधिक त्या सत्यलोकात तरी आहे का?
|
|
|
११०४
|
ती दूर असली म्हणजे जाळते, जवळ असली तर शांत करते! असला विचित्र अग्नीतिने कोठे बरे मिळविला?
|
|
|
११०५
|
माझ्या प्रियेची मोहकता कोण वर्णील? तिने केसांत फुले घातली आहेत. ज्या ज्या आकाराची इच्छा करावी तो तो तिच्या ठायी मला दिसतो.
|
|
|
११०६
|
त्या अल्लड प्रियेचे बाहू जणू अमृताचे आहेत; कारण त्यांचा प्रत्येक स्पर्श मला नवजीवन देतो, माझ्या मृतवत शरीरत चैतन्य ओततो.
|
|
|
११०७
|
या सुंदरीचे आलिंगन अत्यंत आनंददायक आहे. अतिथीला देऊन उरलेले सेवन करणान्या गृहस्थाश्रमी मनुष्यास जसा आनंद होतो, तसा तिच्या दृढालिंगनात मला होतो.
|
|
|
११०८
|
वान्यालही ज्या आलिंगनात वाव नसतो, अशा दृढ आलिंगनात परस्परऐक्याचा आनंद भरलेला असतो.
|
|
|
११०९
|
प्रेमकलहातील कपाळावरच्या आठया, नंतर हृदय द्रवणे, आणि मग मिळणारे पुनरालिंगन, या अमृतमय गोष्टी प्रेमी युगुलच जाणे.
|
|
|
१११०
|
मनुष्य अधिकाधिक विद्वान होत असता, स्वतःचे अधिकाधिक अज्ञान त्याला दिसू लागते; त्याप्रमाणे तिच्या संगतीत मी जितका जास्त रमतो, तितके अधिकच तिचे प्रेम माझ्यावर जडते.
|
सर्ग
११२ तिच्या सौंदर्याची स्तुती
|
|
|
ता
|
११११
|
जाईच्या कुला, तू सुकुमार नि कोमल आहेस; परंतु जिच्यावर मझे मन आहे, ती तुझ्याहूनही कोमल आहे.
|
|
|
१११२
|
हे माझ्या हृदया, फुले पाहून तू दुःखी होतोस. कारण फुले म्हणजे तिचे डओले, असे तुला सारखे वाटत होते.
|
१११३
|
तिचे बाहू कळकीप्रमाणे आह्र्त; तिचे शरीर नवपल्लवप्रमाणे आहे; तिचे हास्य म्हणजे मोती; तिचा श्वास अतिमधुर सुगंधाने भरलेला; आणि काजळ घातलेला तिचा डोळा म्हणजे जणू भाला.
|
१११४
|
आकाशवर्णी कृष्णकमळाला तिच्या ओळयांची सर दाखविता येत नाही म्हणून वाईट वाटते नि ते सारखे खाली मान घालते.
|
|
|
१११५
|
तिने पुलांनी स्वतःला नटविले आहे. परंतु देठही न काडःअलेल्या त्या फुलांचा भार सहन न होऊन तिची कमल वाकेल नि मोडेल.
|
|
|
१११६
|
चंद्र कोणता नि तिचे तोंड कोणते ते न कळल्यामुळे आकाशातील सारे तारे सारखे भटकत फिरत आहेत.
|
|
|
१११७
|
काल हा चंद्र पूर्ण नव्हता. आज त्याने स्वतःला पूर्ण करून घेतले असले तरी तोंडावरचा डाग कोठे जाणार? तिच्या तोंडावर आहे का असा डाग?
|
१११८
|
हे चंद्रा, या सुंदरीच्या मुखाप्रमाणे तूही शोभू लागलास तर धन्य होशील. कारण मग मी तुझ्यावरही प्रेम करीन.
|
|
|
१११९
|
चंद्रा, फुलाप्रमाणे डोळे असणान्या तिच्या मुखाचे अनुकरण तुला करायचेच असेल तर तू प्रकाशता फक्त माझ्यासाठी प्रकाश.
|
|
|
११२०
|
कोमल फुले नि हंसीची पिसे, हीसुद्धा तिच्या पायाला काटयाप्रमाणे बोचतात.
|
सर्ग
११३ प्रेमाची महती
|
|
|
तो
|
११२१
|
ती फर बालत नाही. तिच्या ओठांचा रंग दूध नि मध यांच्या मिश्रप्रमाणे आहे.
|
|
|
११२२
|
कुडी नि प्राण यांच्यात जसे प्रेम असते यसे तिच्यात नि माझ्यातआहे.
|
|
|
११२३
|
माझ्या डोळयांतील बाहुल्ये, तू दूर हो नि मी जिच्यावर प्रेम करतो तिच्या मूर्तीला तेथे जागा दे. कारण तिला राहायला योग्य असे दुसरे स्थान नाही.
|
|
|
११२४
|
ती जवळ असली म्हणजे मला जीवन मिळते; ती दूर जातात मरण वाट्ते.
|
|
|
११२५
|
तिचे डोळे कसे मारक आहेत पाहा. ती संदर आहे; तिचे गुण मी विसरलो तरी पुन्हा स्मरतो; ते कसे विसरू तेच कळत नाही.
|
|
ती
|
११२६
|
तो माझ्या डोळयांतून जाणार नाही. मी डोळे मिटले तरी त्याला दुखापत होणार नाही. माझ्या प्रियकराचा अकारच असा अतिसूक्ष्म आहे.
|
|
|
११२७
|
माझा प्रियकर सदैव मझ्या डोळयांत असतो. तो क्षणभर दूर होईल या भीतीने मी डोळयांत काजळही घालीत नाही.
|
|
|
११२८
|
माझा प्रियकर सदैव माझ्यागृदयात असतो. तो भाजेल म्हणून कधत अन्न मी खात नाही.
|
|
|
११२९
|
मी झोपत नाही. कारण तो क्षणभरही दूर जावा असे मला वाटत नाही. आणि म्हणून त्याला निष्ठुर म्हणतात. (त्याने तिला सोडले म्हणून ती झोपत नाही असे लोकांना वाट्ते.)
|
|
|
११३०
|
प्रेमाने तो माझ्या हृदयात राहतो.तेथून तो कधीही दूर जात नाही. तरीही जावातील लोक म्हणतात की त्याने तिला टाकले आहे, तो दुष्ट आहे.
|
सर्ग
११४ विनयातिक्रमण
|
|
|
तो
|
११३१
|
प्रियजनांचा विरह ज्यांना सोसावा लागत आहे, विरहवन्हीने जे कळत आहेत, त्यांनी टोकदार शिंदीच्या फांदीवर बसावे. दुसरे काय?
|
|
|
११३२
|
शरीर नि मन दोघांना विरहवेदना सहन करवत नाहीत. शिंदीच्या अणकुचीदार टोकावर बसायलाही ती तयार होतील. सारी लाज त्यांनी आता सोडली आहे.
|
|
|
११३३
|
पूर्वी मनाचा खंबीरपणा नि विनय दोन्ही गोष्टी माझ्याजवळ होत्या, परंतु प्रेमविव्हळ प्रियकर शिंदीच्या ज्या अणकुचीदार फाद्यांवर बसतो, त्याच फक्त आता माझ्याजवळ आहेत.
|
|
|
११३४
|
दृढमती नि विनय यांचा तराफा तयार करून त्यावर विश्वासून मी होतो, परंतु वासनाविकारांचा एवढा प्रबल लोंढा आला की सारे वाहून गेले.
|
|
|
११३५
|
लहान काकणे गातांत घालणारी, फुलांप्रमाणे कोमल अशा त्या सुंदरीने या टोकदार फांद्यांवर बसायला मला भाग पाडले. ती मला सायंकाली मनस्पात देते, चिंता देते.
|
|
|
११३६
|
त्या अल्लड सुंदरीचा विचार सारखा मनात येतो नि मी वचैन होतो. आता रातेअ झाली असली तरी या शिंदीच्या फांद्यांवर मी स्वार होईन.
|
|
|
११३७
|
मनात कामासागर उसळत असताही जी तरुणी शिंदीच्या अणुकुचीदार फांद्यांवर बसत नाही, तिच्या मनःसंयमाहून श्रेष्ठ असे या जगात दुसरे काय आहे?
|
|
ती
|
११३८
|
माझ्या विनयाची शक्ती माझे प्रेम लक्षातच घेत नाही. मी त्या प्रेमला किती हळुवारपणाने वागवीत असते हे त्या प्रेमलाही कळत नाही. मनातील प्रेमविकार प्रकट होतो नि जगाला कळून येतोच.
|
|
|
११३९
|
आपली उपेक्षा होत आहे असे वाटून मनातील प्रेम बाहेर पडते नि ते रस्त्यात स्वतःचे प्रदर्शन करते.
|
|
|
११४०
|
लोक मला असतात. ज्या वेदना मला सोसाख्या लगत आहेत त्यांची त्यांना काय कल्पना?
|
सर्ह
११५ किंवदन्ती
|
|
|
तो
|
११४१
|
गावातील लोकांची बोलणी ऐकून निधून गेलेले पंचप्राण पुन्हा माझ्या शरीरत येत आहेत असे वाटते. हे गुपित पुष्कळांना माहीत नाही हे माझे सुदैव होय.
|
|
|
११४२
|
फुलांप्रमाणे डोळे असणान्या माझ्या प्रियेचे दुर्मिल गुण गावकन्यांना माहीत नाहीत; म्हणून आमच्यासंबंधी हाकाटी करून त्यांनी ती जणू मला स्वस्तात दिली.
|
|
|
११४३
|
गावकन्यांची बोळणी मला अमोल वाटतात. कारण ती अजून मिळाली नसली तरी मिळाल्यासारखीच आहेत असे आया वाटते.
|
|
|
११४४
|
लोकांच्या या कुजबुजीने तिच्याविषयीचा माझा प्रेमविकार अधिकच बळावला अहे. असे काही नसते झाले तर सारे प्रकरण शिले नि निरस झाले असते.
|
|
|
११४५
|
मद्यपी, पेल्यांमागून्पेले झोकतो; त्याची तृष्णा कमी न होता वाढते. त्याप्रमाणे प्रेम करणान्याच्या मनातील प्रेम जसजसे जगाला कळते, तसतसे ते अधिकच वाढत जाते.
|
|
ती
|
११४६
|
आम्ही एकच दिवस एकमेकांस भेटलो; परंतु ग्रहण लागताच ज्याप्रमाणे गलबला माजतो, तसे आमच्या बाबतीत झाले आहे.
|
|
|
११४७
|
लोकांच्या बोलण्याचे खत मिळून, आईच्या कानउघाडणीचे पाणी मिळून आमच्या मनातील प्रेमांकुर अधिकच फोफावत आहे.
|
|
|
११४८
|
आरडाओरडीने आमचे प्रेम मारू पाहणे म्हणजे तुपाने वन्ही विझवू पाहण्याप्रमाणे आहे.
|
|
|
११४९
|
'भिऊ नको' असे आश्वासन देऊन त्यानेच मला सोडले. लोकांच्या निंदेचा त्याने मला विषय केले. आता लोकांच्या केल्हेकुईला भिऊन मी का लाजेने मरून जाऊ?
|
|
|
११५०
|
आमच्याविषयीची जी आवई उठावी म्हणून मला मनापासून वाटत होते, ती गावकन्यांनी उठवलीच आहे. मी माझ्या प्रियकराजवल आता जे मागेन ते त्याला नाकारता येणार नाही.
|
सर्ग
११६ प्रेमपावित्र
|
|
|
|
११५१
|
अपला वियोग न व्हावा याविषयी बोलत असल तर बोला; परंतु लवकर परत येईन वगैरे बोलायचे असेल, तर त्या वेळेपर्यत जे कोणी जिवंत राहणार असेल त्याच्याजवळ ते बोला.
|
|
|
११५२
|
त्याने एकदा पाहिलेतरी मला पूर्वी परमानंद होत असे; परंतु आता त्याच्या आलिंगनानेही दुःख होते. कारण तो लवकरच जाईल अशी आता भीती वाटते.
|
|
|
११५३
|
ज्याला माझे मन माहीत आहे, त्याच्याही मनात मला सोडून जाण्याचा विचार लपून असावा हे पाहून कोणवरही विध्वास ठेवणे अशक्य झाले आहे.
|
|
|
११५४
|
"आनंदी राहा" असे ज्याने आपन होऊन मला सांगावे, त्यानेच माझ्याजवळून दूर जाण्याचा विचार करावा, किती दुःखाची गोष्ट! त्याच्या गंभीरपणे दिलेल्या वचनावर मी विश्वास ठेवीत नाही म्हणून त्याने का म्हणून मला दोष द्यावा?
|
|
|
११५५
|
हे सखी, माझे प्राण राहावेत असे तुला वाटत असेल तर माझा प्राणसखा दूर जाऊ नकोस; कारण जर तो दूर गेला तर तो परत येईल त्या वेळेस त्याचे स्वागत करायला मी जिवंत असेन की नाही शंका आहे.
|
|
|
११५६
|
मी निघून जाईन, असे माझ्या तोंडावर सांगण्याइतकी निष्ठुरता त्याच्याजवळ आहे. तो माझे प्राण राहावे म्हणून परत येईल, अशी मला अशा नाही.
|
|
|
११५७
|
या घट्ट असनान्या बांगडया सैल झाल्या हे पाहून तरी निघून जाण्याचे जे भूत त्याच्या मनात आले आहे ते निघून नाही का जाणार?
|
|
|
११५८
|
जिवाचे जिवलग जेथे नाहीत तेथे जगणे म्हणजे दुःखद होय; परंतु प्रियकरापासून नियुक्त होणे हे त्याहूनही दुःखद आहे.
|
|
|
११५९
|
अग्नीचा स्पर्श होईल तेव्हाच तो भाजतो, परंतु प्रीती दूर असली म्हणजेच फार दाह करते.
|
|
|
११६०
|
निरोप देण्याचे व वियोगाचे दुःख सोसूनही प्रियकराच्या पुनरागमनापर्यत जीव धरून राहिल्याची उदाहरणे नसतील का?
|
सर्ग
११७ विरह-शोक; झुरून जाणे
|
|
|
ती
|
११६१
|
झान्याचे पाणी किती भरले तरी पुनःपुन्हा उफालून येते; त्याप्रमाण मी माझे दुःख कितीही आत दाबून ठेवले तरी पुनःपुन्हा तरारून बाहेर पडते.
|
|
|
११६२
|
दुःख लपविणे आता माझ्या शक्तीबाहेरचे आहे. ते दुःख इतरांसमोर राहेच; परंतु ज्याने ते दिले त्याच्यासमोरही आपण होऊन प्रकट करण्याची मला लाज वाटते.
|
|
|
११६३
|
माझ्या जीवनाच्या एका टोकाला प्रेम आहे आणि दुसन्या टोकाला विनय आहे. या दोहोंच्या ओझ्याखाली माझे हे दुबळे शरीर मात्र चिरडले जात आहे.
|
|
|
११६४
|
प्रियकराविषयीच्या प्रेमाचा सागर उसळून राहिला आहे, परंतु तो तरून जायला विश्वसनीय नौका माझ्याजवळ नाही.
|
|
|
११६५
|
मित्रासुद्धा जर एखाद्याला झूरत असता पाहू शकतात, तर शत्रू काय करणार नाहीत?
|
|
|
११६६
|
प्रेमजन्म आनंद सागराप्रमाणे असतो; परंतु प्रेम दग्ध करू लागले म्हणजे होणान्या वेदना त्या आनंदाहूनही खोल नि अनंत असतात.
|
|
|
११६७
|
प्रेमाच्या प्रक्षुब्ध सागरात मी पाहेत आहे; परंतु मला किनाराकोठेच दिसत नाही; मध्यरात्रीमी अगदी एकटी असते; माझे सांत्वन करायला चिटपाखरूही जवळ नसतो.
|
|
|
११६८
|
कृपाळू रात्र येते नि प्राणिमात्राला झोपविते. परंतु त्या रात्रीला मात्र माझ्याशिवाय कोणाचीच सोबत नसते.
|
|
|
११६९
|
त्या निर्दय प्रियकरपेक्षाही हळूळू जाणारी ही रात्र अधिकच निर्दय वाटत आहे.
|
|
|
११७०
|
तो जेथे आहे तेथे माझे हृदय धावते; दोळयांनाही अशी धाव घेता येती तर त्यांना अश्र्य्सागरात पोहावे लागले नसते.
|
सर्ग
११८ उत्कंठेने वाट पाहून डोळे निस्तेज होणे
|
|
|
ती
|
११७१
|
हे डोळे आज का बरे करकूर करीत आहेत?यांनीच तो प्रियकर मला प्रथम दाखविला आणि न शांत होणारे दुःख त्यांनी माझ्या नशिबी आणले.
|
|
|
११७२
|
काईएक विचार न करता या डोळयांनी प्रियकराला प्रथम उतावीळपणाने पाहिले. त्या मूर्खपणाचे परिणाम आता मुकाटयाने सोसायचे सोडून ते रडतात कशाला?
|
|
|
११७३
|
त्या दिवशी या डोळयांनी आपण होऊन त्यांच्याकडे पोट भरून पाहिले आणि आज तेच रडत आहेत! असे करून ते स्वतःला हास्यास्पद मात्र करून घेत आहेत.
|
|
|
११७४
|
माझे डोळे आत कोरडे आहेत. अश्रूंचा साठा संपला; परंतु अपरिहर्य शोकाची पुंजी शिल्लक आहे.
|
|
|
११७५
|
समुद्राहूनही अपार असे दुःख नि मनस्ताप मला देऊन हे डोळे आता स्वतःच दुःखाने झुरत आहेत, ते झोपू शकत नाहीत.
|
|
|
११७६
|
ज्या डोळयांनी मला रडविले, तेच आता स्वतः रदत आहेत. सूड जगवला गेला असे मनात वाटले.
|
|
|
११७७
|
त्या दिवशी प्रेमार्थ होऊन बुभुक्षियाप्रमाणे या डोळ्यांनी त्याच्याकडे टक लावून पाहिले; त्याच्य रमणीय मूर्तीवर ते लुब्द झाले होते. आता म्हणावे रडा, झुरून मरा.
|
|
|
११७८
|
आपणाला प्रेम मिळाले ताही तरीही प्रेम करणारे या जगात असतात. तो दिसत नसन्यामुळे ज्यांना विश्रांती माहीत नाही, ते माझे डोळे बघा.
|
|
|
११७९
|
तो दूर असला म्हणजे डोळयांना झोप माहीत नसते; जवळ असला म्हणजेही ते मिटत नाहीत. अखंड दुःखच त्यांच्या नशिबी आहे.
|
|
|
११८०
|
माणसाचे डोळेच जेव्हा सारे जाहीर करू लागतात तेव्हा गुप्त गोष्ट लोकांना कळल्याशिवाय कशी राहील? माझे डोळे हेच करीत आहेत.
|
सर्ग
११९ विरही प्रेमामुळे आलेली पांडुरता
|
|
|
ती
|
११८१
|
प्रियकराला जायला मीच होऊन शेचटी संमती दिली; आता या माझ्या पांडुरतेबद्दल मी कोणाकंड तक्रार करू?
|
|
|
११८२
|
ही पांडुरता त्याचे अपत्य आहे आणि म्हणून त्याचा मला अभिमान वाटते. ही पांडुरता माझ्या सर्व शरीरावर पसरली आहे.
|
११८३
|
माझे सौंदर्य नि माझी लज्जा तो घेऊन गेला; आणि त्याचा मिबदला म्हणून दुसरे काही नाही तर निदान मनोव्यथा नि हा फिकटपणा देऊन गेला.
|
|
|
११८४
|
माझ्या मनात दुसरे-तिसरे काहीएक नसून त्याचेच विचार सारखे असतात; माझी वाचाही इतर काही न बोलता त्याचीत स्तुती करीत असते; तरीही ही पांडुरता माझ्या शरीरावर का बरे? काय आहे ही जादुगिरी?
|
११८५
|
त्या दिवशीही तो असाच तिकडे गेला आणि ही पांडुरता माझ्याकडे आली.
|
११८६
|
दिव्याच्या विझण्याची अंधार वाट पाहत असतो; त्याप्रमाणे आमची ताटापूट केव्हा ह्प्ते, याची ही पांडुरता वाट पाहत असते.
|
|
|
११८७
|
मी त्याच्या आलिंगनात होने; मी त्याला दूर केले मात्र, तो दुसन्याच क्षणी या पांडुरतेने मला ग्रासले.
|
११८८
|
लोक मेले मला म्हणतात की, "पाहा कशी भूतासारखी पांढरी फटफटीत झाली आहे!" परंतु तो सोडून गेला म्हणून त्याला मात्र कोणी बोलत नाही.
|
११८९
|
हे सखी, तू त्याचीच बाजू घेणार नि त्याला निरपराधी ठरविणार? मी पांढरी फटफटीत झाल्ये आहे याचे तुला काय सुखदुःख?
|
११९०
|
माझ्या प्रियकराला दुष्ट म्हणून ते नावे ठेवणार नसतील तर माझे हे शरीर कितीही कृशा नि फिकट झाले तरी मी आनंदच मानीन (एकदम वृत्तीत बदल होऊन ती शेवटी म्हणते)
|
सर्ग
१२० पतीला एकरूपता वाटत नाही म्हणून हृदयवेदना
|
|
|
ती
|
११९१
|
आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपणावरही करतात, असा अनुभव ज्यांना येतो तेच अतिमधुर असा प्रेमानंद चाखतात.
|
११९२
|
जगाला ज्याप्रमाणे पाऊस, त्याप्रमाणे प्रेम करणान्या स्त्रीला प्रियकराची कोमलता.
|
११९३
|
आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपणावरही करीत आहे, असे ज्यांना निःशंक वाटत असेल त्यांनीच सुखाची प्रौढी मिरवावी.
|
११९४
|
इतरांनी प्रेम केले तर त्याला काय अर्थ आहे? स्त्रिया ज्याच्यावर प्रेम करतात, त्याचे जर प्रेम त्यांना मिळाले नाही तर त्यांना या जगात सुख नाही.
|
११९५
|
मी माझ्या प्रियकरावर प्रेम करते, त्याप्रमाणे जर तो माझ्यावर करीत नसेल तर त्याच्याजवळून कोणती मागण्याची मला आशा असणार?
|
११९६
|
पाण्याची कावड असते त्याप्रमाणे प्रेम जर दुतर्फी असेल तरच त्यात आनंद आहे; एकतर्फी प्रेम म्हणजे दुःख नि निराशा.
|
११९७
|
हा कामदेव फक्त मलाच पीडा देतो; माझी दुःखे बघायला त्याला डोळे नाहीत म्हणून का तो असे करतो?
|
११९८
|
प्रियकराकडून प्रेमाचा संदेश न मिळाला तरीही ज्या स्त्रिया आशेने जीवन कंठू शकतात, त्यांच्याप्रमाणे आशावादी नि धैर्यवान त्याचजगात त्यांची सर दुसन्यांना येणार नाही.
|
|
|
११९९
|
प्रियकर अनुदार असला तरीही त्याच्याकडून दोन शब्द आले तरी ते कानांना किती गोड वाटतात!
|
१२००
|
हे हृदया, जो तुझ्यावर प्रेम करीत नाही त्याला स्वरःचे दुःख सांगायला का इच्छितोस? समुद्राला रिकामे करण्याप्रमाणे हे अशक्य आहे. वेडे आहे हे माझे हृदय
|
No comments:
Post a Comment