Friday, 1 June 2007

सर्ग 81-90Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग दुसरा: अर्थ
सर्ग ८१ जीवश्व कंठश्व


८०१
आपल्या मित्राने आपल्याशी कितीही स्वातंत्र्य घेतले तरी जर आपण रागवणार नसू तरच ती खरी मैत्री.
८०२
मोकळेपणाने नि प्रेमळपणाने परस्परांजवळ वागणे उआत मैत्रीचे सर्वस्व आहे. अशा अतिपरिचयाचा थोरांना कधी राग येत नाही.


८०३
तुमची मैत्री फारा दिवसांची असेल; परंतु ती जर मित्राला मोकळीक देण्यार नसल, स्वातंत्र्याची सवलत देणार नसेल, स्वातंत्र्याची सवलत देणार नसेल, तर ती काय कामाची?
८०४
परस्परांच्या दृढ परिचयावर विसंबून एकमेकांस विचारताही मित्र जेव्हा एखादी गोष् करतो, तेव्हा जे प्रेमल हृदयाचे असतात, त्यांना त्यात प्रेमच दिसते.


८०५
मित्राने केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे, समजा तुम्हांला दुःख झाले, तरी त्याची एखरूपता, अभिन्नता, आपल्या मित्राला यामुळे दुःख होईल ही त्याला नसलेली कल्पना, इत्यादी गोष्टी मनात आणाव्या.


८०६
मित्र तुमच्या नाशाला कारणीभूत झाला तरीही तुम्ही जर खरे मित्र असाल तर त्या हृदयाच्या मित्रास टाकणार नाही.
८०७
ज्याने मनापासून कित्येक दिवस प्रेम केले, त्याचे प्रेम, मित्राने वरचेवर जरी नुकसानीत आणले तरी कमी होत नाही.


८०८
आपल्या खन्या मित्रासंबंधी कोणी कितीही कागळया केल्या तरी जो ऐकत नाही, त्याला तो मित्रच जेव्हा उपाय करतो, तेव्हाही आनंदच होतो. (कारण मित्राला क्षमा करून आपली गाढ मैत्री दाखवायला प्रसंग मिळतो)


८०९
जो दुसन्यावर अविचल प्रेम करतो, त्याच्यावर सारे जग प्रेम करते.


८१०
आपल्या जुन्या मित्रांबरचे ज्याचे प्रेम बदलत नाही, त्याच्याकडे शत्रूसुद्धा प्रेमाने पाहतील.

सर्ग ८२ अपायकारी मैत्री


८११
जणू तुम्हांला खाऊन टाकतील इतके प्रेम जे तुमच्यावर करतात, मैत्री जोडण्याच्या वेळेपेक्षा तोडण्याच्या वेळेसच जे अधिक गोडीगुलाबी दाखवतात, अशांच्या हृदयात प्रेमाचा लवलेशही नसतो.


८१२
फायद्यासाठी जे खुशामत करतात, फायदा नाही असे दिसताच जे खुशाल सोडून जातात, अशा नीचांची मैत्री लाभली काय, लाभली काय, सारखीच.


८१३
मैत्रीमुळे काय फायदा होईल याचा जे हिशेव करीत बसतात ते वेश्या चोर यांच्या वर्गांतीलच समजावे.


८१४
वरती बसणारास फेकून रणातून पळून जाणान्या घोडयाप्रमाणे काही लोक असतात; असे मित्र मिळण्यापेक्षा नसलेल बरे.


८१५
विश्वास टाकणान्या मित्रास संकटकाळी आणी त्याला मदतीची अपेक्षा असताना जे सोडून जातात, अशा नीचांची मैत्री नसलेली बरी.


८१६
मूर्खांशी गृढ मैत्री असण्यापेक्षा शहाण्यांचे शत्रूत्वही शतपटींनी बरे.


८१७
खुशामते आणि चलती आहे तोवर मैत्री करणारे, अशांपेक्षा शत्रूचा द्वेषही पुरवला.


८१८
एखाद्या कामात तू जिवापाड मेहनत करीत असता जे तुझ्या मार्गात अडथळे आणतात, अशांजवळ एक शब्दही बोलता दूर जाणे हे चांगेल.
८१९
ज्यांच्या वाणीत आणि करणीत मेळ नाही, अशांजवळ मैत्री स्वप्नातही मनात आणाल तरी नुकसान होईल.
८२०
तुम्ही एकटे असताना तुमच्याजवळ गोड बोलतात; परंतु सभेत जे तुमची टर उडवतात, उपहास करतात, अशांजवळ जरासुद्धा जाऊ नकोस.

सर्ग ८३ खोटी मैत्री


८२१
शत्रूने वरपांगी दाखविलेली मैत्री म्हणजे ऐरण होय; वेळ येताच या ऐरणीवरच तो तुला ठोकून काढील.


८२२
जे वरून मित्र दिसतात, परंतु अंतरी शत्रू असतात, अशांची मैत्री स्त्री-हृदयवत चंचल समज.


८२३
शत्रू कितीही विद्वान असला, त्याने नीतिशास्त्राचे, धर्मशास्त्राचे कितीही ग्रंथ वाचले असले, तरी त्याच्या हृदयातील द्वेष जाणे अशक्य आहे.


८२४
तोंडावर हास्य खेळवणारे परंतु मनात मत्सर बाळवणारे, अशा दांभिक दुष्टांना भिऊन वाग.


८२५
ज्यांची मते तुझ्याशी एकरूप नाहीत, अशांची वाणी कितीही मोहक वाटली, तरी त्यांच्यावर थोडाही विश्वास ठेवू नकोस.


८२६
शत्रू लोणकढी प्रेमाची भाषा बोलला, तरी त्याचे खरे स्वरूप एका क्षणात प्रकट होईल.


८२७
शत्रूने बोलण्यात कितीही नम्रता दाखविली तरी विश्वसू नकोस; वाकलेले धनुष्य उपाय सुचविते.


८२८
जोडलेल्या हस्तांजलेतही शत्रूने शस्त्र लपविले असेल; त्याच्या अश्रूंवरही विश्वसू नकोस.


८२९
बाहेर चारचौघांत तुझी स्तुती करणारे, परंतु गुप्तपणे तुझी कुटाळकी करणारे, अशांजवळ तूही वरून हसून खेळून वाग; परंतु वेळच आली तर आलिंगन देताना त्याला चिरडून टाकण्यास कचरू नकोस.


८३०
उघडपणे शत्रूजवळची मैत्री झुगारून देत येत नसेल, तर मैत्रीचे सोंग चालू ठेव. तो वरपांगी मैत्री दाखवितो, तशी तूही दाखव. परंतु हृदयात त्याला जागा देऊ नकोस.

सर्ग ८४ मूर्खपणा


८३१
तुला मूर्खपणा समजून घ्यायाचा आहे? हितकर फेकणे नि अहितकर कवटाळणे याला मूर्खपणा म्हणतात.


८३२
अयोय नि नीच गोष्टींकडे मन जाणे याला मूर्खपणा म्हणतात.


८३३
अविवेकी मनुष्य कर्तव्यपराङ्मुख आणि उद्धट असतो; त्याला लाज नसते. ज्या गोष्टी हृदयशी धराव्या त्या तो कधीही धरणार नाही.


८३४
विद्वान आहे, दुसन्यास शिकवतो; परंतु स्वतःच्या वासनांचा मात्र गुलाम आहे; अशाहून मूर्ख अविचारी कोण आहे?


८३५
मूर्ख एका जन्मात स्वतःविषयी इतके बोलतो की त्यामुळे सात जन्म नरकात निःशंक स्थान मिळेल.


८३६
क्षणभर टिकणारे उद्योग जो आरंभतो आणि त्यांचीही पुषे माती करतो, तो पुढे गोत्यात, बंधनात पडल्याशिवाय राहणार नाही.


८३७
मूर्खाला मिळालेल्या ठेव्यामुळे इतरेजनांची चंह्गल उशेल; घरची मात्र उपशी मरतील.


८३८
मूर्खाच्या हातात मैल्यवान वस्तू पडल्या तर आधीच मर्कट तशात मद्य प्यायलेला, अशासारखा तो वागेल.


८३९
मूर्खांची मैत्री मोठी गमतीची असते; ती तुटली तरी दुःख होत नाही.


८४०
धुतलेला पाय कोचावर ठेवावा, तद्वत सन्मान्य लोकांच्या सभेत मूर्खाने पाऊल ठेवणे होय.

 
सर्ग ८५ अहंकारी मूर्खपणा


८४१
व्यवहारज्ञानाचा अभाव हे ख्रे दारिद्र्य; दुसन्या दारिद्र्याला जग दारिद्रय समजत नाही.


८४२
मूर्खाने आपण होऊन देणगी दिली, तर देणगी मिळणान्याचे अशीक म्हणायचे, दुसरें काय?


८४३
शत्रूसुद्धा आणणार नाही अशी संकटे आपल्या हातांनी मूर्ख आपल्यावर ओढवून घेतो.


८४४
'मी मोठा शहाणा' असे म्हणण्यात जितकी उथळ बुद्धी आहे, तितकी कोठेच दिसणार नाही.


८४५
नसलेले ज्ञान स्वतःजवळ आहे, असे सांगणारा मूर्ख, स्वतःजवळ असलेल्या ज्ञानाविषयीही अस्स्शंकता निर्मितो.


८४६
मनोबुद्धीची कुरूपता जर पदोपदी प्रकट होत असेल तर शरीर शृंगारून काय फायदा?


८४७
गुप् गोष् स्वतःजवळ राखू शकणारा उथळ आणि उतावीळ मनुष्य स्वतःवर मोठी संकटे ओढून आणील.


८४८
जो दुसन्याचा चांगला सल्ला ऐकत नाही, आणि चांगले काय हे कळण्याची ज्याला अक्कल नाही, तो मरेपर्यत स्वजनांना दुःख मात्र देत राहणार.


८४९
मूर्खाचे डोळे उघडण्याचा प्रयत् करणारा मूर्ख होय; कारण मूर्ख एकाच दृष्टिकोनाने बघतो आणि तेच बरोबर, असे त्याला वाटत असते.


८५०
सारे जग ज्या गोष्टी मानते, त्याही नाकारणारा मनुष्य पृथ्वीवरचा मूर्तिमंत सैतान होय.

सर्ग ८६ विरोधी वृत्ती
८५१
दुसन्याला नेहमी उडवून लावण्याच्या वृत्तीमुळे शेटवी द्वेष जन्माला येतो.
८५२
मुद्दाम भांडण उकरून काडःअण्यासाठी युझा शेजारी जरी अपाय करायला आला, तरीही तू सूडबुद्धी मनात बाळगणे उत्तम.


८५३
नेहमी भांडणे उकरीत वसण्याचा रोग फार वाईट; या रोगापासून मुक् होणारा कायम टिकणारी कीर्ती मिळवील.
८५४
उद्धटपणासारखा अवगुण नाही. तो तुला हृदयातून घालवता आला तर तुला परमोच्च आनंद लाभेल.


८५५
जो वैर टाळतो, त्याला धुळीस मिळविण्याची कोण इच्छा करील?


८५६
शेजान्यावर सदैव जळफळणारा आणि उद्धटपणातच आनंद मानणारा लवकरच ठेचाळेल नि पडेल.


८५७
जो राजा कलहप्रिय आहे, मत्सरी आहे, त्याला देशाच्या अभ्युदयाची दुष्टी नसते.


८५८
कलहनिवृत्ती भाग्य देते; परंतु कलहाचे भूतच वाढवाल तर लगेलग नाश आल्याशिवाय राहणार नाही.


८५९
तुमच्यावर दैव सुप्रसन्न असेल तर तुम्ही क्रोधवश होणार नाही; परंतु दैवाने तुमचा नाश करायचेच ठरवीले असेल, तर तुम्ही शेजान्याजवळ इतक्या घमेंडखोरपणाने वागाल की सीमा नाही.


८६०
उद्धटपणामुळे सारी कटुता जन्मते; सुस्वभावमुळे शांती नि ऐक्य यांचे मधुर फल मिळते.

सर्ग ८७ शत्रूची लक्षणे


८६१
प्रबळांशी स्पर्धो नको; परंतु दुबळयांवर क्षणभरही थांबता चढाई कर.


८६२
जो राजा दुष् आहे, ज्याला मित्र नाहीत, एकाकी ठाण मांडण्याची ज्याला शक्ती नाही, तो शत्रूच्या सैन्याविरुद्ध क्या टिकाव धरणार?


८६३
ज्या राजाला धैर्य नाही, अक्कल नाही, जो शेजान्याशी स्नेहाने वागात नाही, तो ताबडतोब शत्रूच्या भक्ष्यस्थानी पडेल.


८६४
जो राजा तामसी आहे, ज्याच्या ताब्यात जीभ नाही, तो सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वांच्या भक्ष्यस्थानी पडेल.


८६५
ज्याला कसे वागावे हे कळत नाही, ज्याला स्वाभिमान नाही, राजनीतीकडे जो लक्ष देत नाही, त्याला पाहून शत्रूंना आनंद होतो.


८६६
जो राजा विषयवासनांस बळी पडतो, क्रोधान्ध होऊन बुद्धी गमवितो त्याच्याशी वैर आलस्य वैरी आनंदतो.


९६७
जो राजा कामांना हात घालतो, परंतु त्यात यश यावे म्हणुन खटपट मात्र करीत नाही, अशांशी किंमत देऊनही शत्रुत्व पत्करावे.


८६८
राजा अवगुणांचा पुतळा असेल तर त्याला मित्र मिळणार नाहीत, आणि त्याचे शत्रू आनंदतील.


८६९
प्रतिस्पर्धी मूर्ख नि भित्रा असेल तर शत्रुला आनंद होतो.


८७०
मूर्ख शेजान्यांशी लढून सहजपणे मिळणान्या विजयाकडे जो लक्ष देत नाही, त्या राजाला कधीही कीर्ती मिळणार नाही.

सर्ग ८८ उगीच शत्रू निर्माण करणे


८७१
थट्टेनेसुद्धा आपण होऊन शत्रुत्वाची दुष् भावना मनात बाळगू गये.


८७२
धनुष्य ज्यांचे शास्त्र आहे अशांना आव्हान देव; परंतु जिव्हा हे ज्यांचे शास्त्र आहे त्यांना मात्र उगीच संतापवू नकोस.


८७३
मित्र नसताना जो राजा अनेक शत्रूंना आव्हान देतो, तो मूर्खाहून मूर्ख समजावा.


८७४
शत्रुला मित्र बनविण्यात जो पटाईत आहे, त्याची सदैव सत्ता राहील.


८७५
दोन शत्रूंची तुला एकाकी लढण्याचा जर प्रसंग आला, तर त्या देहोंतील एकाला स्वतःच्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न कर.


८७६
शोजान्याच्या बाबतीत, तो शत्रू असो विइ मित्र असो; तू जर काही करावयाचे ठरविले असशील, तर ते तू जेव्हा स्वतः अडचणीत असशील त्या वेळेस करू नकोस.


८७७
तुझ्या अडचणी ज्यांना माहीत नाहीत, त्यांना त्या कळू देऊ नकोस; तुझी व्यंगे शत्रूसमोर उघड करू नकोस.


८७८
चांगल्या योजना कराव्या; साधने समुद्ध करावी; किल्लेकोट नि संरक्षणाची साधने बळकट ठेवावी. असे कराल तर तुमच्या शत्रूचा अभिमान लवकरच धुळीला मिळेल.


८७९
काटेरी झाडे लहान आहेत तोच तोडावी; कारण मोठी झाल्यावर ती तोडू पाहाल तर ती तुमचे हात कापून टाकतील.


८८०
तुम्हांला तुच्छ मानणान्यांचा गर्व जर तुम्ही दूर कराल, तर तुमचा लवकरच नाश होईल.

सर्ग ८९ घरमेदे


८८१
आमराया, झरे यांच्यापासून रोगराई उत्पन्न होत असेल तर त्याच्यापासून कोठला आनंद? कोठले सुख? तद्वत आप्तेष्टच जर तुमच्या नाशाची खटपट करीत असतील तर त्यांचा त्यागच करावा.


८८२
नागव्या तरवारीप्रमाणे उघड शत्रुच करणान्याची तेवढी भीती नाही; परंतु मैत्रीचे ढोंग करणान्या शत्रूपासून मात्र सावध राहीले पाहिजे.


८८३
गुप् शत्रूंच्या बाबतीत सावध राहा; कारण तू संकटात आहेस असे दिसताच ते तुझा निःपात करतील.


८८४
मैत्रीचे ढोंग करणारे शत्रू अनेक कारस्थाने रचत असतात; तुझ्या आप्तेष्टांच्या मनांत ते विष कालवतील.


८८५
स्वतःचे आप्तेष्टच जेव्हा द्रोही नी विश्वासघातकी बनतात, तेव्हा ते संकटे आणून तुझा जीव धोक्यात आणतील.


८८६
फंदाफितुरी एकदा का राजवाडयात, सैन्यात शिरली, म्हणजे मग तिला बळी पडणे अशक्य होते.


८८७
घरभेद्या असलेले घर घट्ट झाकण असलेल्या भांडयाप्रमाणे असते; दिसायला एक, परंतु वस्तुतः दोन.


८८८
ज्या घरात घरभेदी असतो, ते गंजलेल्या लोखंडाप्रमाणे धुळीत मिळते.


८८९
घरभेद्या असलेल्या घराचे गृहछिद्र लहानसे असले तरी विनाश तेथे घिरटया घालीत असतो.


८९०
तुमच्याविषयी द्वेषमत्सर बाळगणान्याजवळ तुम्ही आपलेपणाने वागणे म्हणजे घरात सर्प घेऊन राहण्याप्रमाणे आहे.

सर्ग ९० बलवंतांचा राग


८९१
जे सर्वशक्तिमान आहेत, कर्तुमकर्तुम करू शकतील, अशांच्या क्रोधापासून स्वसंरक्षणेच्छू माणसाने जपावे; त्यांच्या क्रोधाला तिळभरही जागा देऊ नये?


८९२
तुम्ही बलवंताचा अपमान कराल, तर त्यांची शक्ती तुमच्यावर अपरिहार्य अशी अनंत दुःखे लोटील.


८९३
तुला स्वतःचा सर्वनाश करून घ्यायचा आहे? तर मग जा आणि तुझा नाश करण्याचे ज्यांना सामर्थ्य आहे, त्यांना डवच.


८९४
जो प्रबळाला दुखवितो, तो आपण होऊन मृत्यूला बोलावतो.


८९५
प्रबळ शास्त्रास्त्रांनी सज्ज अशा राजावा राग जो ओढवून घेईल, त्याची कोठेही धडगत नाही.


८९६
वणव्यात सापडलेले एक वेळ जिवानिशी सुटतील; तर तुझे हे कुबेराचे वैभव कोठे राहील?


८९७
तपःसामर्थ्यसंपन्न ऋषी जर तुझ्यावर संतापले, तर तुझे हे कुबेराचे वैभव कोठे राहील?


८९८
आपला पया पक्का आहे, कोणाचेही भय नाही, असे जरी तुम्हांस वाटले तरी पर्वताप्रमाणे बलवान असणान्यांनी मनात आणले तर तुमचे ते समूळ उत्पाटन करू शकतील.


८९९
पवित्र व्रतस्थ लोक देवेन्द्रावर संतापले तर तो देवेन्द्रही स्वराज्य गमावून रसातळास जाईल.


९००
तपोनिधीची वक्र दृष्टी वळली, तर भी मी म्हणणारे मातब्दरही धुळीस मिळतील.

No comments:

Post a Comment