Friday, 1 June 2007

सर्ग 61-70



Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग दुसरा: अर्थ
सर्ग ६१ आलस्य


६०१
तुमचे कुल म्हणजे तुमचा चिरंतन प्रकाश, स्थिर नंदादीप; परंतु आलस्याच्याविषारी वान्याने हा दिवा मालवला जाईल.




६०२
ज्याला आपल्या कुळाची भक्कम पायावर उभारणी करायची असेल त्याने आळसाला आळस म्हणून संबोधावे नि त्याला दूर ठेवावे.


६०३
आलस हा मारेकरी आहे; याला हृदयात जगा द्याल तर तुमच्या कुळाचा तुमच्या डोळयांदेखत नाश होईल.


६०४
जे आळशी बनून महत्वाची कामे अंगावर घेत नाहीत, त्यांच्या ठिकाणी दुर्गुणांची झपटयाने वाढ होईल आणि त्यांच्या घराण्याचा नाश होईल.


६०५
ज्यांच्य विनाशकाल जवळ आला आहे ते आळस, निद्रा, विसराळूपणा नि दिरंगाई या चार दुर्गुणांच्या आहारी जातात.


६०६
राजाची कृपादृष्टी असली तरीही आळशी मनुष्य जगात पुढे येणार नाही; त्याची भरभराट होणार नाही.


६०७
जे आळशी आहेत, मोठमोठया कामांसाठी ज्यांचे हात उपयोगात आणले जात नाहीत, त्यांना जगाची निंदा सहन करावी लागेल, उपहास सहन करावा लागेल.


६०८
ज्या घरात आळस घर करतो, ते लवकरच शत्रूच्या कचाटयात जाते.


६०९
आळस सोडून द्या, की ताबडतोव तुमच्या कुटुंबावर केसळू पाहणारी दुःखे दूर होतील.


६१०
ज्या राजाला आळस काय ते माहीत नाही, तो वामनाच्या तीन पावलांत मावलेल्या त्रिभुवनाला स्वसत्तेखाली आणू शकेल.

सर्ग ६२ पुरुषार्थशाली उद्योग


६११
अशक्य समजून कोणत्याही कार्यपासून मागे नको वळू तुझे प्रयत्; कोणतीही गोष् प्राप् करून घ्यायला तुला समर्थ करतील.


६१२
कोणतेही काम अर्धवट नको ठेवू. काम अर्धवट सोडणान्यांची जग पर्व करीत नाही.


६१३
कितीही कष् पडले तरी जो खचत नाही, त्यालाच सर्वांची सेवा करण्याची शक्ती लाभण्याचे भाग्य असते.


६१४
षंढाच्या हातातील हत्याराप्रमाणे आळशी माणसाचे औदार्य होय. ते औदार्य टिकत नाही.


६१५
जो सुखासीन नसून यत्नदेव आहे, तो सामर्थ्यस्तंभ आहे; तो आपल्या मित्रांना आधार वाटतो; तो त्यांचे दुःखाश्रू पुसून टाकतो.


६१६
उद्योग म्हणजे भाग्यजननी; आलस्य म्हणजे दारिद्र्य आणि विनाश यांची जननी.


६१७
दुःखदेवतेचेघर आलस्यात असते. परंतु जो आलस्य-वश होत नाही, त्याच्या उद्योगात लक्ष्मी येऊन नांदते.


६१८
जवळ संपत्ती नाही म्हणून लाजायचे कारण नाही; परंतु जाणूनबुजून श्रमापासून पराङ्मुख होणे ही गोष् मात्र लाजिरवाणी आहे.


६१९
जरी देव आणि दानवही तुझ्याविरुद्ध उभे राहिले तरी उद्योगदेवता तुझ्या श्रमाचे फल तुला दिल्यावाचून शहणार नाही.




६२०
देवला शरण जाता जे अखंड यत्नशील असतात, ते दैवाला फजित करतात.

६३ दुर्दैव आले तरी घीर सोडणे


६२१
दुर्दैव भेटायला अल्ल्पास प्रसन्न मुखाने त्याचे स्वागत करा. दुर्दैव आले असता धीर द्यायला एकच वस्तू समर्थ आहे, ती म्हणजे हास्य.


६२२
अस्थिर मन संकटसमुद्राला तोंड देण्यासाठी स्थिर वृत्तीने इद्ध होताच संकटे खाली मान घालतात, ती लाजतात.


६२३
जे दुःखाने दुःखी होत नाहीत, ते दुःखाला दुःखी करतात.


६२४
प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जे पराकाष्ठेचा प्रयत् करतात, तेच खरे पुरुष होत.


६२५
अनंत आडचणी '' पसरून समोर असतानाही ज्याचा धीर खचत नाही, त्याच्या मार्गात यायला अडचणींनाच अवघद वाटते.


६२६
दैवाची कृपा असताना जे फुशारून जात नाहीत, ते दुर्दैव आले असताना का म्हणून रडतील?


६२७
शरीर दुःखांचे माहेरघर आहे असे जाणुन शहाणे लोक शरीरावर संकटे आली तरी रंजीस येत नाहीत.


६२८
जो मनुष्य सुखासक् नाही, तो दुःखे हा मर्त्य जीवनाचा नियमच आहे असे समजून अडचणींनी कष्टी होत नाही.


६२९
वैभवाचे काळीही जो सुखात रमत नाही, तो पडत्या काळात दुःखानेही रडत नाही.


६३०
कष्टांमुळे होणान्या त्रासाला नि दगदगीला जो आनंदरूपच मानतो, त्याची शत्रूही स्तुती करतात.

सर्ग ६४ मंत्री


६३१
मोठमोठया गोष्टी कशा सिद्धीस न्याव्या, तदर्थ साधने कोणती, मार्ग कोणते, आरंभ केन्हा करावा, हे सारे जो  जाणतो तो मंत्री नेमण्यास योग्य होय.


६३२
ज्ञान, निश्चय, अदम्य श्रम, प्रजेच्या हिताकडे अखंड प्रेमळ दृष्टी, आणि वरचे एक, अशी मंत्र्याची पाच लक्षणे होत.


६३३
जो विभक्तांना एकत्र अणू शकतो, एकत्र असलेल्यांत फूट पाडू शकतो, अस्तित्वात असलेले स्नेहसंबंध सांभालू शकतो, तो खरा समर्थ मंत्री होय.


६३४
कोणते बेत करावे हे जो ठरवतो, ते बेत कसे पार पाडावे हे जो जाणतो, ज्याचे मत नेहमी निश्चित नि निर्णायक असते, तो योग्य मंत्री असे समजावे.


६३५
जो विधिज्ञ आहे, धर्मज्ञ आहे, जो पुष्कल अध्ययन केलेला आहे, जो विचारपूर्वक बोलतो, प्रसंगोचित जाणतो, तो योग्य मंत्री होय.


६३६
उपजत बुद्धिमान असून अध्ययनाने ज्यांनी भरपूर ज्ञान मिळविले आहे, त्यांना जगात दुर्बोध असे काय आहे, सूक्ष्म असे काय आहे?


६३७
तू पुस्तकी पंडित असलास तरी अनुभवाने येणारे शहाणपण मिळव नि तदनुसार वाग.


६३८
राजा मूर्ख असला, पदोपदी मंत्र्यांच्या कामात अडथळे आणीत असला, तरीही मंत्र्याने त्याला योग्य नि रास्त तेच नेहमी सांगत राहावे.


६३९
जो मंत्री गुप् कारस्थाने करून राजाचाच नाश करो बगतो, तो सात कोटी शत्रूपेक्षाही भयंकर होय.


६४०
जे दृढमती नसतात, ते मोठमोठया योजना आखतात; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या वेळेस कचरतात. त्यांचे हेतू कधीही तडीस जाणार नाहीत.

 
सर्ग ६५ वक्तृत्व


६४१
वक्तवृत्वाची देणगी खरोखर इतर देणग्यांपेक्षा अपूर्व अशी आहे.


६४२
भाग्य वा दुर्भाग्य जिभेवर अवलंबून आहे. बोलण्यात उद्धटपणा येऊ नये म्हणुन जप.


६४३
ज्या वक्तृत्वाने मित्र अधिकच जवळ येतात, आणि शत्रूही विरघळतात, तेच खरे वक्तृत्व.


६४४
प्रत्येक प्रसंग नीट त्लून बघ नि प्रसंगोचित बोल. याहून हितकर नि पुण्यप्रद दुसरे काही नाही.


६४५
अशी वाणी बोल की दुसन्यांच्या शब्दांनी जी निरुत्तर होणार नाही.


६४६
श्रोत्यांना आपलेसे करून घेणे, दुसन्यांच्या भाषणातीलही मथितार्थ आपल्या भाषणात आणणे, हे कसलेल्या मुत्सद्दयाचे काम आहे.


६४७
जो गोंधळत नाही, भीत नाही, जो अस्खलित बोलतो, त्याचा वादविवादात कोण पराजय करील?


६४८
ज्याचे भाषण मुद्देसूद नि व्यवस्थित असते, मने वळवणान्या शब्दांत असते, त्याच्या पाठीशी सारे जग उभे राहील.


६४९
मोजक्या निवडक शब्दांत ज्यांना आपले विचार मांडता येत नाहीत; तेच भाराभर बोलण्यासाठी हपापलेले असतात.


६५०
स्व्तः मिळविलेले ज्ञान जे दुसन्यास नीट देऊ शकत नाहीत, ते फुलूनही सुवास देणान्या फुलांप्रमाणे समजावे.

सर्ग ६६ कर्माचे पावित्र्य




६५१
दुसन्याशी मैत्री जोडल्याने यश येते; परंतु आपली कृती शुद्ध असेल तर सर्व मनोरथ पूर्ण होतील.


६५२
ज्या कर्मांपासून शाश्वत सुख नि कीर्ती लाभणार नाहीत, त्यांच्यापासून पराङ्मुख हो.


६५३
या जगात परमोच्च पदू शोभावे असे ज्यांना वाटते, त्यांनी कलंक लावणान्या सर्व कर्मांपासून दूर राहावे.


६५४
वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणारे, वाईट दिवस आले तरीही वाईट कृत्ये करायला प्रवृत्त होणर नाहीत.


६५५
"अरेरे! काय मी केले?" असे पाठीमागून ज्या कृत्यांमुळे रडत म्हणावे लागेल, त्यांपासून आधीच दूर राहावे. असे कृत्य एकदा हातून झाले असले तरी फिरून करू नये.


६५६
सज्ञ लोक ज्या कृत्यांस निंद्य नि त्याज्य समजतात, ती कधी करू नयेत; भुकेने तळमळणारे आईवे प्राण वाचवावयाचे असले तरीही ती कर्मे करू नयेत.


६५७
अन्याय्य मार्गाने मिळविलेल्या सपत्तीपेक्षा थोरांचे दारिद्रयही श्रेयस्कर होय.


६५८
श्रेष् नीतिधर्म ज्या गोष्टी करू नये म्हणून सांगते, त्या करून जरी तुम्ही यशस्वी झालात तरी शेवटी तुम्हांस पस्तावावे लागेल.


६५९
दुसन्यांना छळून, पिळून, रडवून जे मिळवाल, ते तुमच्या हातांतूनही जाईल आणि जाताना तुम्हांलाही ढळढळा रडवील; परंतु खन्या धर्माने जोडलेले जरी मध्येच गेले तरी पुन्हा येईल आणि वाढेल.


६६०
कपटाने संपत्ती मिळवू बघणे म्हणजे कच्चा मडक्यात पाणी ठेवण्याप्रमाणे आहे.

सर्ग ६७ निश्चयी संकल्पशक्ती


६६१
कर्तृत्वाचा मोठेपणा हा वास्तविक दृढ इच्छाशक्तीचा मोठेपणा असतो. तिच्यामुळे कर्तृत्व शक्य होते. इतर गोष्टी शेवटपर्यत टिकत नसतात.


६६२
जे सिद्धीस जाणारच नाही असे नक्की वाटते त्याचा आरंभ करणे, अणि ज्याचा आरंभ केला ते कितीही अडचणी आल्या तरी सोडणे, ही शहाण्या लोकांच्या वागणुकीची दोन तत्त्वे आहेत.


६६३
कार्यसिद्धीनंतरच कार्यकर्ता आपले मन बोलून दाखवितो; आपण आधीच आपले बेत जाहीर केले तर अपरिहार्य अडचणी मार्गात येण्याचा संभव असतो.


६६४
बोलणे सोपे असते; बोलल्याप्रमाणे तडीस नेणे महाकर्म कठीण.


६६५
मोठमोठी कामे करून दाखविल्याबद्दल ज्याची प्रसिद्धी आहे, अशा मनुष्याची राजाला फार जरूरी असते. तो राजाच्या उपयोगी पडेल नि सारे त्याची वाहवा करतील.


६६६
इच्छेनुसार तुम्हांला सारे काही मिळेल; परंतु सारी इच्छाशक्ती तेथे हवी, सारी निश्चयी संकल्पशक्ती तेथे हवी.


६६७
केवल तोंडाकडे बघून मनुष्याला तुच्छ मानू नको. घडघड जाणारा प्रचंड रथ लहानशा आसावर अवलंबून असतो.


६६८
संपूर्ण विचाराने एखादी गोष् करणाचे तू निश्चित केले असतील, तर चलबिचल होऊ देता उत्साहपूर्वक त्या गोष्टीच्या मागे लाग.


६६९
ज्यांमुळे सुखाची वृद्धी होईल ती कर्मे कर. ती सिद्धीस नेण्यासाठी मन वज्राप्रमाणे कठोर नि खंबीर करून प्रयत् कर. मरणान्तिक दुःखे सहन करावी लागली तरी हटू नको.


६७०
ज्यांचा निदचय दृढ नाही, त्यांनी आपल्या मार्गत कितीही मोठेपणा मिळविला, तरी जग त्यांना किंमत नाही.

सर्ग ६८ कामे नीट करणे


६७१
सान्या चर्चाचा हेतू काहीतरी निश्चित करणे हा असतो. निश्चित ठरल्यावर विलंब लावणे चूक आहे.


६७२
ज्या गिष्टी हळूहळूच करावयाच्या असतात, त्या सावकाश विचाराने कर; परंतु ज्या झटपट उरकायला हव्यात, त्या क्षणभरही दूर ढकलू नको.


६७३
जेव्हा जेव्हा परिस्थिती अवसर देईल, तेव्हा तेव्हा आपल्या ध्येयाकडे सरळ जात जा; जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असेल, तेव्हा ज्या मार्गात फार विरोध नाही, त्याचे अनुसरण कर.


६७४
अपुरे कार्य नि अशान्त शत्रू विझलेल्या विस्तवाप्रमाणे आहेत; वेळ येताच वाढून निष्काळजी मनुष्याचा ती निःपात करतील.


६७५
कोणतेही कार्य करताना पाच गोष्टी लक्षात ठेवावयास हव्यात: कार्याचे स्वरूप, योग्य वेळ, योग्य स्थळ, कसे करायचे, कशाने करायचे (साधने)


६७६
कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी त्याला श्रम किती पडतील, मार्गातील अडचणी आणि अपेक्षित फायदा या गोष्टी लक्षात घ्याव्यात.


६७७
आपणाला जी गोष् साध्य करून घ्यावयाची आहे, तिच्यात जो तज्ज्ञ आहे, त्याच्या पोटात शिरून त्या गोष्टीचे मर्म समजून घ्यावे.


६७८
एका हत्तीकडून दुसन्या हत्तीस पशी पाडतात. त्याप्रमाणे एक कार्य दुसन्या कार्याचे साधन कर.


६७९
मित्रांना बक्षिसे देण्याआधी शत्रूंना शांत करण्याची नि त्यांना मित्र बनविण्याची त्वारा कर.


६८०
जीविताची रोज उठून धाकधुक वाटू नये म्हणून दुर्बलांनी संधी येताच प्रबळांशी दोस्ती जोडायला नेहमी तयार असवे; निर्धास्त वाटवे म्हणुन सतत प्रयत् करावे.

सर्ग ६९ दूत (वकील)


६८१
प्रेमळ स्वभाव, श्रेष् कुलात जन्म, राजाला आकर्षील अशी चाल चलणूक हे दूताचे गुण होत.


६८२
राजनिष्ठा, प्रखर बुद्धी, बोलण्यातील चातुर्य, त्वरित ग्रहणशक्ती हे गुण दूतास अत्यंत आवश्यक होत.


६८३
आपल्या राजाचा फायदा व्हावा अशा रीतीने जो दुसन्या राजांजवळ बोलू शकतो तो बुद्धिमतां वरिष् समजावा.


६८४
व्यवहारकुशल, विद्याव्यासंगी आणि दिसायला रुबाबदार अशा माणसास शिष्टाईसाठी पाठवावे.


६८५
अप्रिय बोलणे शक्यतो टाळून, मोजक्या गोड शब्दांनी दूताने आपल्या स्वामीचे हित साधावे.


६८६
विद्यावान, उत्साही, प्रसंगोचित जाणणारा, मन जिंकून घेणारे सुंदर बोलणे ज्याला साधते, अशा माणसाला परराष्ट्रांकडे दूत म्हणून पाठवावे.


६८७
जो काळ-वेळ ओळखतो, जो स्वकर्तव्य जाणतो, शब्द उच्चारण्यापूर्वी जे मनात असेल ते बोलून्पाहतो, तो उत्कृष्ट्दूत होय.


६८८
शिष्टाईसाठी पाठविलेला दूत निश्चयी वृत्तीचा, शुद्ध हृदयाचा नि सुंदर चालचलाणुकीचा असावा.


६८९
ज्याच्या बोलण्यात दुर्बलत्व नाही, शोभणारे असे काही नाही, जो निश्चयाचा खंबीर आहे, असा मनुष्यच दुसन्या राजांच्या दरबारात आपल्या राजाचा संदेश घेऊन जायला योग्य होय.


६९०
मरणाची भीती दाखविली तरीही जो खरा राजदूत आहे तो कर्तव्यात कसूर करणार नाही; आपल्या स्वामीचे हित प्रयत्नपूर्वक साधील.

सर्ग ७० राजासमोर कसे वागावे


६९१
राजाजवळ वागताना, ऊब येण्यासाठी विस्तवापासून फार दूर नाही, परंतु फार जवळही नाही असे आपण बसतो, तसे असावे.


६९२
ज्या गोष्टीची राजाला इच्छा असते, तिच्याविषयी आपण हपापलेले नसणे, हा त्याची मर्जी संपादण्याचा निश्चित उपाय आहे. त्यामुळे धनलाभही होईल.


६९३
आपली नाचक्की होऊ नये असे वाटत असेल तर अपयशी होण्याची दक्षता बाळग. तू कोणतेही काम नीत पार पाडू शकत नाहीस असा एकदा बभ्रा झाला म्हणजे तो कधीही दूर करता येणार नाही.


६९४
थोरामोठयांच्या देखत कानांत कुजबुजू नये; किंवा ते जवळ असता दुसन्यांकडे पाहून हसूही नये.


६९५
कोणाचे बोलणे चोरून ऐकू नकोस; जे तुझ्यापासून मुद्दाम गुप् राखण्यात आलेले आहे, ते माहीत करून घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. ज्या वेळेस एखादी गोष् तुला सांगितली जाईल त्या वेळेसच तू ती ऐक.


६९६
राजाची लहर लक्षात घ्यावी; काळवेळ ओळखून राजाला ज्यायोगे संतोष होईल असे आकर्षक बोलणे करावे.


६९७
प्रिय असणान्या गोष्टीच राजासमोर बोलाव्या. त्याने 'सांग' म्हणून आज्ञापिले तरीही अप्रिय नि अहितकर गोष्टी त्याला सांगू नयेत.


६९८
राजा अल्पवयी असी वा आप्तसंबंधी असो; त्याच्याजवळ थट्टामस्करी करू नये. त्याच्या प्रतिष्ठेत साजेसेच वर्तन त्याच्याजवळ करावे.


६९९
ज्यांची दृष्टी गोंधळलेली नसून निर्मल नि स्वच्छ आहे, ते 'आपन राजाचे आवडते आहोत' म्हणून अनुचित वर्तन कधीही करणार नाहीत.


७००
आपन राजाच्या फार विश्वासातील आहोत असे समजून जे अयोग्य वर्तन करतात, त्यांचा नाश होईल.

No comments:

Post a Comment