Friday, 1 June 2007

सर्ग 39-50

Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग दुसरा: अर्थ
सर्ग ३९ राजाचे गुणा


३८१
सैन्य, प्रजा, संपत्ती, मंत्री, मित्र नि किल्लोकोट या सहा वस्तू ज्याच्याजवल आहेत तो खरा राजसिंह.
३८२
धैर्य, औदार्य, धूर्तता नि उत्साह हे चार गुण राजाजवळ नेहमी हवेत.
३८३
जे पृथ्वीवर सत्त गाजवतात, त्याच्याजवळ पुठील तीन गुणा असतात: सदैव सज्जता, विद्या, प्रत्युत्पन्नमतित्व (झटपट निर्णय घेण्याची बुद्धी).
३८४
गुणहीन राजा काय कामाचा? राजाने अधर्माचे शासन करावे, स्वतःच्या यशाला प्राणांपेक्षा जपावे, क्षात्रधर्माविरुद्ध पाप त्याने करू नये.
३८५
आपल्या राज्यातील समृद्धी कशी वाषेल, आपला खजिना भरलेला कसा राहील, या गोष्टी राजाला माहीत हव्यात. त्याप्रमाणेच आपल्या संपत्तीला कसे जपावे, तिचा योग्य व्यय कसा करावा, हेही त्याला माहीत हवे.
३८६
ज्या राजाजवल प्रजेला जाता येते, जो सर्वांना प्राप्त आहे, जो गोड बोलतो, त्या राज्याच्या राज्याची इतर राज्यांपेक्षा सर्वत्र अधिक प्रशंसा होईल.
३८७
जो उदारपणाने देतो नि प्रमाने राज्य करतो, अशा राजाची कीर्ती जगभर पसरते; जो प्रदेश ध्यावा असे त्याला वाटेल, तो तुआच्या सत्तेखाली येईल.
३८८
जो निष्पक्षपातीन्याय देतो नि प्रजापालन काळजीपूर्वक करतो. तो नरश्रेष् म्हणून मानला जाईल, तो देवमाणूस होईल.
३८९
ज्या राजाजवळ कटू बोलणेही शांतपणे ऐकून घेण्याचा गुण आहे, त्याच्या छत्रछायेच्या पाठोपाठ सारी प्रजा येईल, सारी प्रजा त्याच्या पाठीशी उभी राहील.
३९०
जो राजा उदार आहे, जो मनाचा मोठा आहे, जो प्रसन्न दिसतो, न्यायी असतो, जो प्रजेचे नीट पालन करतो, तो राजकुलदीपक होय. तो खरा राजमणी.

सर्ग ४० विद्या


३९१
संपाद्य विद्या सात यत्नपूर्वक संपूर्णपणे संपादावी.
३९२
मनुष्याचे खरे डोळे दोन : अंकज्ञान नि अक्षरज्ञान. (गणित नि लेखन)
३९३
जे विद्यावंत आहेत, तेच खरे डोळस; इतरांच्या तोंडावर दोन खाचा फक् आहेत.
३९४
विद्वानांचा मेळावा म्हणजे आनंदाची पर्वणी, ती खरी दिवाळी, तो खरा दसरा, पुन्हा वियुक् होताना त्यांची हृदये किती कष्टी होतात; उदासीन होतात?
३९५
याचक धनिकासमोर धुळीत वाकतो, त्याप्रमाणे गुरूसमोर बाकावे लागले तरी तॊ विद्या मिळवीत असतोस. जे विद्या मिळवू इच्छीत नाहीत ते खरे नीच जातीचे.
३९६
ज्ञान हे वाळूतील झन्याप्रमाणे आहे; जितके खोल खणाल तितके अधिकच स्वच्छ नि उत्कृष् पानी.
३९७
विद्वानाला सर्वत्र स्वदेशच आहे; हे विश् त्याचे घर बनते. असे आहे तरीही मनुष्य मरेपर्यत ज्ञानार्जनाच्या बाबतीत उदासीन का बरे राहतो?
३९८
या जन्मी मिळविलेल्या विद्येने तुम्हांला सात जन्मभर श्रेष्ठता लाभेल.
३९९
ज्या ज्ञानाने मला आनंद होतो, ते ऐकून इतरांनाही होईल हे विद्वान मनुष्य जाणतो; आणि म्हणून तो ज्ञानावर अधिकच प्रेम करू लागतो.
४००
खरा अन्याय नि निर्दोष असा ठेवा जर कोणता असेल तर तो ज्ञानाचा होय; त्याच्यापुढे बाकी सारी संपत्ती तुच्छ आहे.

सर्ग ४१ शिकण्याच्या बाबतीत काळजी घेणे


४०१
भरपूर ज्ञान असल्याशिवाय सिंहासनावर बसणे म्ह्णजे पटाशिवाय सोंगटया खेळण्याप्रमाणे आहे.
४०२
ज्ञानाशिवायसभेत वक्ता म्हणुन मिरविण्याची इच्छा करणे हे करूप स्त्रीने सर्वांकडून वाहवा मिळविण्याची इच्छा करण्याप्रमाणे आहे.
४०३
विद्वानांसमोर मौन धरणारा मूर्ख असला तरी पंडित मानला जाईल.
४०४
अनधीत मनुष्य कितीही हुशार असला तरी प्रज्ञावंत लोक त्याच्या मताला मान देत नाहीत.
४०५
अध्ययनाची उपेक्षा करून आपणा हुशार शहाणे आहोत अशी कल्पना कर्य़्न जो बसतो, त्याने सभेत तोण्ड उघडताच त्याची फजिती होते.
४०६
अधययनहीन मनुष्य पीक देणान्या पडित वावराप्रमाणे आहे. हा केवळ जिवंत आहे एवढेच त्याच्याविषयी बोलतील.
४०७
ज्याची बुद्धी सूक्ष्म नि महान वस्तूत शिरू शकत नाही, तो बाहेरून कितीही सुंदर असला तरी ते त्याचे सौन्दर्य मातीच्या मूर्तीच्या सौन्दर्या प्रमाणे आहे.
४०८
विद्वान मनुष्य दरिद्रो असतो हो गोष् खरी; परंतु मूर्खांच्या हाती द्रव्य असणे ही गोष् फारच वाईट.
४०९
हीन कुळात जन्मूनही ज्यानेज्ञान मिळविले, अशाला जसा मानसन्मान मिळेल तसा मोठया कुळात जन्मून परंतु अडाणी असणान्याला मिळणार नाही.
४१०
पशूहून मनुष्य जितका श्रेष्, तितका मूर्खाहून विद्वान श्रेष्.

सर्ग ४२. शहाण्यांची शिकवण ऐकणे


४११
कानांनी आपण जे एकतो ते सर्वश्रेष् धन होय.
४१२
ज्या वेळेस कानांना खाद्य नसेल त्या वेळेसच पोटाला खाद्य मिळेल. (ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मिळत असता पोटाकडे कोण लक्ष देईल?
४१३
ज्यांनी बहुश्रुतत्व संपादिले, अपार ज्ञानामृत सेविले, ते जणू पृथ्वीवरचे देव आहेत.
४१४
तुमच्याजवळ विद्या नसली तरी निदान कानांनी ऐका; ज्या वेळेस अडचणी '' पसरून येतील, त्या वेळेस कानांवर पडलेले कामास येईल. (ते श्रवणज्ञान खांबाप्रमाणे आधार देईल)
४१५
धर्मवान लोकांचा उपदेश भक्कम काठीप्रमाणे आहे. हा उपदेश ऐकणारा कधी धसरणार नाही, काठीप्रमाणे धसरण्यापासून वाचवील.
४१६
थोडेसे जरी चंगले ऐकायला मिळाले तरी ते ऐकावे. त्या थोडयाशा शब्दांनीही तुला थोडी श्रेष्ठता नि प्रतिष्ठा लाभेल.
४१७
ज्याने भरपूर मनन केले आहे, पुष्कळ श्रवण केले आहे, तो चुकूनही वायफल बोलत नाही.
४१८
ज्या कानांना श्रवणाचा अभ्यास नाही, थोरांची शिकवण ज्यांनी कधी ऐकली नाही, ते कान ऐकणारे असले तरी बहिरेच समजावे.
४१९
प्रज्ञावंतांचे सूक्ष्म नि अर्थगंभीर संवाद ज्यांनी कधी ऐकले नाहीत, त्यांच्याजवळ नम्र वाणी कोठून येणार?
४२०
जे कानांची चव जाणता फक् जिभेची चव जाणतात, ते काय कामाचे?

सर्ग ४३ समजून घेणे


४२१
अकस्मात येणान्या सर्व भयांपासून संरक्षण करणारे (चिलखत) कवच म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाचा किल्ला शत्रूला कधीही जिंकता येणार नाही.
४२२
तुमच्याजवळ व्यावस्थित ज्ञान असले, सारे नीट पद्धतशीरपणे समजून घेण्याची बुद्धी असली म्हणजे तुमची इंद्रिये वारेमाप भटकणार नाहीत. ती पापापासून दूर राहून मंगलाकडेच वळतील.
४२३
कोणत्य्यही माणसाच्या उद्गारांतील सत्यासत्याचा निवाडा करता येणे म्हणजे खरे शहाणपण.
४२४
ज्याचे बोलणे समजते आणि दुसन्याच्या बोलण्यातील सूक्ष्म नि गर्भितार्थ ज्याला समजतात, तोच खरोखरचा शहणा.
४२५
शहाणा मनुष्य सर्वांना आकर्षितो, सर्वांना वेध लावतो; त्याचा स्वभाव नेहमी शांत असतो; तो संकुचित नसतो, अघळपघळही नसतो. सारे प्रमाणात.
४२६
जगाच्या रीतीभातींप्रमाणे आपली चालचलणूक ठेवणे यात शहाणपणाचा भाग आहे.
४२७
शहाणा विचारी मनुष्य पुठे काय होणार ते ओळखतो; मूर्खाला पुढे काही दिसत नाही.
४२८
संकटात, धोक्यात एकदम उडी घेणे म्हणजे मूर्खपणा आहे; भीती वाटण्यासारख्या वस्तूविषयी भीती वाटणे, सावध असणे, यात शहणापणाच आहे.
४२९
दूरदृष्टीचा मनुष्य योणान्या प्रत्येक प्रसंगासाठी सज्ज असतो.
४३०
ज्याच्याजवळ विवेकबुद्धी आहे, त्याच्याजवळ सरे काही आहे; मूर्खाजवळ सारे असून नसल्यासारखेच.

सर्ग ४४ दोषांचे निर्मूलन करा


४३१
जो मनुष्य औद्धत्य, क्रोध नि क्षुद्रता या दोषांपासून दूर असतो; त्याच्याजवळ एक प्रकारची प्रतिष्ठा, श्रेष्ठता तुम्हांला दिसेल. त्याचे वैभव त्यामुळे शोभून दिसते.
४३२
कार्पण्य, फाजील आत्मविश्वास आणि अमर्याद अनंगरंग हे राजाचे तीन मोठे दोष होत.
४३३
स्वतःच्या कीर्तीला डोळयांत तेल घालून जे जपतात, ते स्वतःच्या लहानशा दोषालाही पर्वतासमान लेखतात.
४३४
कोणत्याही प्रकारचे दुर्बलत्व अंगी नसावे म्हणून जप; कारण त्यामुळे शेवटी नाश होतो. सर्वांत मोठाशत्रू म्हणजे दुर्बलत्व.
४३५
अकस्मात येणान्या संकटासाठी ज्याची तयारी नसते, त्याचा, अग्नीने गवताची गंजी गळून जाते त्याप्रमाणे, सर्वनाश होईल.
४३६
राजाने प्रथम आपले दोष दूर करावे नि मग दुसन्याचे दाखवावे. असे करील तर त्याच्यावर दुःकसंकटे कशी येतील.
४३७
खर्चायला पाहिजे तेथेही खर्च करणान्या कृपणाची धनदौलत शेवटी धुळीस मिळते.
४३८
मूठ कधीही सैल करणारा कंजूषपणा हा एक स्वतंत्र दुर्गुण आहे. त्याची इतर दुर्गुणांत गणना करून चालणार नाही.
४३९
कधीही कशाने फुशारून जाऊ नको, शेफारून जाऊ नको. ज्यामुळे तुझे भले होणार नाही, असे धाडस करण्याच्या भानगडीत पडू नको.
४४०
ज्या गोष्टींमध्ये तुझ्या हृदयाचा परमानंद आहे, त्या गोष्टीसुद्धा तू जर दुसन्यास कळू दिल्या नाहीस, त्यांना सांगितल्या नाहीस, तर शत्रूंनी कितीही कारस्थाने केली तरी त्यांना तुझे काहीही वाकडे करता येणार नाही.

सर्ग ४५. सज्जनांची मैत्री


४४१
सदाचाराच्या मार्गाने जाता जाता जे बुद्ध झाले, त्यांना मान दे, त्यांचा स्नेह जोड.
४४२
तुझ्यावर आलेली संकटे जो दूर करू शकेल आणि येणान्या आघातांपासून जो तुला वाचवू शकेल, अशाला धुंडाळून मोठया उत्सुकतेने त्याची मैत्री जोड.
४४३
खन्या योग्यतेच्या माणसांची निष्ठा जर तुला मिळू शकली तर अत्यंत दुर्मिळ असा एक ठेवा तुला मिळाला.
४४४
तुझ्याहून मोठया योग्यतेचे जर तुझे मित्र झाले तर ज्याच्यापुढे इतर सारी सामर्थ्ये फिकी पडतील असे थोर सामर्थ्य तू मिळविलेस असे म्हणता येईल.
४४५
मंत्री म्हणजे राजाचे डोले. सरासार विचार करून मोठया शहणपणाने त्याने ते निवडावे.
४४६
खन्या थोर पुरुषांचा संगतीत जो असतो, त्याच्यासमोर त्याचे शत्रू हतप्रभ होतात.
४४७
जे आपणांस शिकवू शकतील, आपले कान उपटण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशांची मैत्री ज्याने जोडली, त्याचा नाश कोण करू शकेल?
४४८
आपल्याहून जे श्रेष् आहेत, जे आपणांस चार हिताचे शब्द सांगू शकतील, अशांची मैत्री जो राजा जोडीत नाही, त्याचा शत्रू नसेल तरीही नाश होईल.
४४९
भांडवलाशिवाय नफा नाही, त्याप्रमाणे शहणांचा ज्याला खंबीर आधार नाही, त्याचे आसन स्थिर नाही.
४५०
एकदम अनेक शत्रू उत्पन्न करणे अविचार होय; परंतु भल्याभल्या माणसांचा स्नेह गमावून बसणे हा दसपट अविचार होय.

सर्ग ४६. नीच संगत नको


४५१
थोर लोक नीचांच्या संगतीस भितात; परंतु हलक्या मनाचे लिक त्य्यांच्यात इतके मिसळतात की जणू एका कुटुंबातील होतात.
४५२
पाणी ज्या जमिनीवरूण वाहते तिचा रंगरूप घेते. त्याप्रमाणेच मन ज्या संगतीत रमते तसे होते.
४५३
मनुष्याची बुद्धी, त्याचे विचार त्याचा मनात असतात. परंतु त्याचा नावलौकिक तो जी संगत धरतो तिच्यावर अवलंबून असतो.
४५४
मनुश्याचा स्वभाव त्याच्या मनोवृत्तीत आहे असे दिसते; परण्तु ज्या मंडळींत तो उठतो-बसतो तेथे त्याच्या स्वभावाचे खरे माहेर असते.
४५५
मनाची शुद्धता नि कृतीची निर्मलता पवित्र संगतीवर अवलंबून असतात.
४५६
ज्यंची मने विशुद्ध, त्याची संततीही विशुद्ध असते. ज्यांनी भल्यांची संगती धरली, त्यांची सर्वतोपरी भरभराट झाली.
४५७
शुद्ध हृदय हा मनुष्याचा अमोल ठेवा होय; सत्संगतीमुळे कीर्ती मिळते, मोठेपणा मिळतो.
४५८
शहाणे लोक स्वतः सर्वगुणसंपन्न असले तरी थोरांची संगत धरतात. कारण थोरांची संगती म्हणजे सामर्थ्याचा साठा असे ते मानतात.
४५९
सद्गुण तुम्हाला स्वर्ग देतात; सत्संगती मनुष्यास सत्पथावर स्थिर करते.
४६०
सत्संगतीहून दुसरा मोठा मित्र नाही. वाईट संगतीमुळे जितकी संकटे येतात तितकी कशानेच येत नाहीत.

सर्ग ४७ करण्यापूर्वी विचार.


४६१
कोणतेही काम शुरू करण्यापूर्वी भांडवल किती लागेल, नफा किती होईल, तोटा किती होईल, याचा विचार कर.
४६२
योग्यतेचे म्हणून ज्यांना निवडले अशांशी विचारविनिमय करूनच जो राजा कोणत्याही कार्यास उद्युक् होतो, त्याला या जगात अशक्य असे काहीच नाही.
४६३
अमुक केले तर भरपूर फायदा होईल असे वाटते. मनुष्य भुकतो; परंतु फायदा तर राहोच, भांडवलही जाते. विचारवंत लोक अशी कार्ये कधी अंगावर घेत नाहीत.
४६४
दुसन्यांनी आपला उपहास करू नये असे ज्यांना वाटते, त्यांनी विचार केल्याशिवाय कोणत्याही कार्यास प्रवृत्त होऊ नये.
४६५
युद्धास उद्यक्त होण्यापूर्वी बारीकसारीक गोष्टीचाही विचार नि तरतूद जर तुम्ही केलेली नसेल, तर आपण होऊन तुम्ही स्वतःच्या शत्रूस अजिंक्य करता.
४६६
करण्यासारख्या गोष्टी करशील तर नाश होईल; करण्यासारख्या करशील तरीही नाश होईल.
४६७
पूर्ण विचार केल्यावाचून काहीही नवकी करू नको; आधी कामाला आरंभ करून मागून मी विचार करीन असे जो मनात म्हणतो, तो मूर्ख होय.
४६८
योग्य मार्गाने जो कार्यास प्रवृत्त होत नाही, त्याच्या मदतीस कितीही धवून आले तरी उपयोग नसतो.
४६९
आपण जे करतो ते दुसन्यांना कितपत मानवेल, त्याला ते कितपत पात्र आहेत, याचा विचार करता जरी भले केलेत तरी ते चूक असण्याचा संभव असतो.
४७०
जे काही करायचे ठरवशील ते अनिंद्य असे असो. स्वतःलान शोभणारे कर्म करायला जो प्रवृत्त होतो, तुआचा जग उपहास करते.

सर्ग ४८. सामर्थ्याचा अंदाज


४७१
कोणत्याही कार्यास होण्यापूर्वी त्यातील अड्चणी, शत्रूचे नि स्वतःचे बलाबल, शत्रूच्या नि आपल्या मित्रांचे बल, या सर्वांचा नीट विचार करायला हवा.
४७२
जो राजा स्वतःची शक्ती जाणतो, स्वतःच्या सैन्याचे बळ जाणतो, माहीत हव्यात अशा सर्व गोष्टी ज्याला माहीत असतात, आपल्या शक्तीपलीकडील गोष्टीस आणि माहीत नाही अशा कामास जो हात घालीत नाही, त्याला कधी अपयश येणार नाही.
४७३
सूडबुद्धीमुळे, रक्ताच्या तहानेमुळे, स्वतःच्या शक्तीची अवास्तव कल्पना करून जे साहसास प्रवृत्त झाले नि शेवटी मारेल गेले, अशांची किती तरी उदाहरणे दाखविता येतील.
४७४
स्वतःच्या सामर्थ्याची ज्यांना नीट कल्पना नसते, शांतिमय जीचनाची ज्यांना जाणीव नाही, जे अहंमन्य असतात, त्यांचा नाश होतो.
४७५
मोराची पिसे झाली म्हणून तू जर ती वाटेल तितकी गाडीत भरशील तर त्यमुळेही गाडीच्या चाकाचा कणा मोडेल (एकेकटा शत्रू तादृश धोक्याचा वाटला तरी अनेक शत्रू जर एकदम निर्माण झाले, तर राजाचा अंत निश्चित.
४७६
जे झाडाच्या शेंडयाला पोचल्यावरही आणखी वर चढू पाहतात, त्यांचा नाश होतो, ते जीचनास मुकतात.
४७७
आपली संपत्ती किती आहे ते लक्षात घेऊन देणग्या देत जा; आपले द्रव्यबल नीट राखून व्यय करावा.
४७८
पाण्याची नळी बारीक असली तरी हरकत नाही; तोटी मोठी ठेवू नको म्हणजे झाले! (सर्व शक्ती संपुष्टात आल्यावरही आणखी नवीन साहस करू पाहणान्यांना ही धोक्याची सूचना आहे.
४७९
आपल्या शक्तीचा जो विचार करीत नाही, प्रमाणात जो राहात नाही, तो जरी वै भवात दिसला तरी त्याचा नाश होईल. त्याचा मागमूसही राहणार नाही.
४८०
जो आपल्या द्रव्याची नीट गणना करीत नाही, वाटेल तशी जो उधळपट्टी करतो, त्याचे लवकरच सारे संपुष्टात येईल.

सर्ग ४९ योग्य संधी ओळखणे


४८१
ज्या राजाला आपले स्जत्रू जिंकून ध्यायचे आहेत, त्याने संघांचे महत्व नीट ओळ्खले पाहिजे. दिवस असतो तेव्हाच कावळा घुबडावर विजय मिळवितो.
४८२
काळाच्या मागे राहता बरोबर राहा. म्हणजे भाग्यदेवतेशी तुझा दृढ संभंध राहील.
४८३
योग्य साधने योजून नि योग्य वेळ ओळखून जर मनुष्य कार्यप्रवृत्त होईल तर त्याला अशक्य काय आहे?
४८४
तुझे हेतू योग्य असतील नि वेळही योग्य असेल, तर सारी पृथ्वी तू जिंकून घेशील.
४८५
जे विजिगीषू आहेत ते योग्य संधीची वाट पाहत असतात. ते गोंधळणार नाहीत, घडबड घाई कराणार नाहीत.
४८६
जोराचा तडाखा देण्यापूर्व शेळी जरा मागे येते. सामर्थ्यवान मनुष्य निष्क्रिय दिसला तरी त्याचे निष्क्रियत्व या तन्हेचे असते.
४८७
शहाणा मनुष्य त्याच वेळेस आपला क्रोध दाखवीत नाही. तो त्याला मनात ठेवून योग्य संधीची वाट पाहात बसतो.
४८८
तुझे शत्रू तुझ्यापेक्षा बलवान असतील तेव्हा त्यांच्यासमोर नमते घे; परंतु त्यांची शक्ती कमी होत आहे असे दिसताच जर त्यांच्यावर निर्धाराने हल्ला चढवशील तर त्यांचा उच्छेद करशील.
४८९
कधी येणारी संधीही गमावलीस तरी रडत बसू नकोस. अशक्याही पुन्हा मिळवीन अशा निर्धाराने कामाला लाग.
४९०
वेळ प्रतिकूल असेल त्या वेळेस करकोच्याप्रमाणे निष्क्रियतेचे ढोंग कर; परंतु योग्य वेळ येताव (भरतीची वेळ येताव) झपाटयाने प्रहार कर (करकोच्याच्या चोचीच्या वेगाने घाव घाल)

सर्ग ५० स्थानपरीक्षा


४९१
युद्धाच्या जागेची नीट पाहणी केल्याशिवाय युद्धाची पाळी अणू नकोस.
४९२
सुरक्षित, नीत मान्याची जागा असेल तर सामर्थ्यसंपन्नांचाही फार फायदा होतो.
४९३
युद्धभूमीचे नीट निरीक्षण करून कुशलतेने नि सावधानपूर्वक हालचाल केली तर दुर्बलसुद्धा प्रबलांसमोर टिकाव धरतील; एवढेच नाही, तर त्यांच्यावर विजय मिळवू शकतील.
४९४
नीट पाहणी करून दुर्गम अशा स्थळी जर ठाण मांडून राहाल तर शत्रूचे सारे बेत फसतील.
४९५
खोल पाण्यात सुसरीचे बळ; ती बाहेर येईल तर शत्रूचे खेळणे होईल.
४९६
कितीही भक्कम चाकांचा असला तरी रथ समुद्राच्या पाण्यावरून धडधड जाणार नाही; आणि समुद्रावरून झरझर जाणारे गलबत जमिनीवरून चालणार नाही.
४९७
जो आधीपासून त्यार आहे, आणि योग्य वेळ येताच तडाखा द्यायची जो वाट पाहात आहे, त्याला स्वतःच्या धैर्याची जोड असली म्हणजे पुरे; अशा राजाला दुसन्या दोस्तांची जरूर नाही.
४९८
राजाने जर योग्य असे रणक्षेत्र निवडले तर थोडे सैन्य असूनही तो प्रबळ शत्रूचे सारे खटाटोप व्यर्थ दवडील.
४९९
शत्रू जोपर्यत स्वतःच्या जागेत आहे तोपर्यत, मग त्याची ती जागा नीट सुरक्षित जरी नसली किंवा तेथे इतर सोयी जरी नसल्या, तरी त्याचा पराभव करणे कठीण जाते.
५००
हजारो भालाइतांना पाहूनही जो गजराज जराही डोला लववीत नाही, तोच दलदलीत फसल्यावर कोल्हायांकडून पराभूत केला जातो.

No comments:

Post a Comment