Friday, 1 June 2007

सर्ग 31-38



Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल



भाग पहिला: धर्म
सर्ग ३१ क्रोधराहित्य


३०१
मारण्याची शवती असून जो मारीत नाही, त्याच्या ठायी क्षमावृत्ती आहे असे समजावे. दुर्बलाने क्षमा केली काय, केली काय, त्याला महत्व नाही.


३०२
प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसले तरीही रागावणे चांगले नव्हेआणि शक्ति असून संतापणे याच्याहून वाईट दुसरे काहीच नाहीं.


३०३
अपराध करणारा कोणीही असो, त्याच्यावर रागावू नको. कारण क्रोधापासून अनेक दुष्परिणाम जन्माला येतात.


३०४
क्रोधाने हास्य मरते, उत्साह नष्ट होतो, आनंद मावळतो.


३०५
जर तुला स्वत:चे कल्याण हवे असेल तर क्रोधापासून दूर राहा. तू दूर राहशील तर तो तुझ्याकडे येऊन तुझा नाश करील.


३०६
क्रोध ज्याच्या ज्याच्या जवळ येईल, त्याच्या त्याच्या नाश करील. क्रोधाचे संवर्धन करणान्याच्या कुळाचा संहार होईल.


३०७
क्रोधाला अमूल्य ठेव्याप्रमाणे जो जवळ जतन करून ठेवतो, त्याची स्थिती जमिनीवर हात आपटणान्याच्या स्थितीसारखी होतो.


३०८
त्या माणसाच्या हाताला इजा झाल्याशिवाय राहात नाही, त्याप्रमाणे क्रोध जवळ ठेवणान्याच्या नाश झाल्पाशिवाय राहणार नाही.


३०९
तुझ्या बाबतीत झालेले शेकडो अन्याय अनंत अग्निज्वालांप्रमाणे जरी तुला जाळीत असले तरीही तू रागावशील तर फार चांगले.


३१०
जो क्रोधवश होतो, तो मृत्युवश होय. परंतु ज्याने क्रोधाचा त्याग केला तो संत होय.

सर्ग ३२ अहिंसा (अपाय करणे)


३११
ज्याच्ये मन विशुद्ध आहे, त्याला मोठे राज्यपद मिळाले तरी तो दुसन्याला अपाय करणार नाही.


३१२
ज्याचे हृदय निर्मल नि पवित्र आहे, तो अपकार करणान्यांवरही प्रतुअपकार करणार नाही, दुसरे द्वेष्वश झाले तरी तो होणार नाही.


३१३
करणाशिवाय जरी कोणी तुला इजा केली, तरी प्रत्यपकार करू नको. कारण तसे करशील तर अपरिहार्य अशा आपत्ती मात्र तू आपल्यावर ओढवून घेशील.


३१४
अपकार करणान्याचे, अपाय करणान्याचे शासन तुम्ही त्याच्यावर उपकार करून करावे नि त्याला मनात लाजवावे.


३१५
दुसन्याचे दुःख ते आपलेच दुःख, असे वाटून दुसन्यास दुःख देण्यापासून जो परावृत्त होत नाही, त्याची बुद्धी काय कामाची?


३१६
मनुष्याला स्वत: एखाद्या दुःखाचा कटू अनुभव आला असेल, तर तेच दुःख दुसन्याला देण्याची त्याने खबरदारी घ्यावी.


३१७
कधीही कोणाला थोडीसुद्धा पीडा देणे, ही खरोखरच फार मोठी गोष्ट आहे.


३१८
ज्याला स्वतःच दुःखाचा अनुभव आला, तो आपण होऊन दुसन्यास कसे बरे दुःख देईल.


३१९
जर सकाळी तुम्ही शेजान्याला दुख्विले, तर तिसरे प्रहरीच तुमच्यावर आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही.


३२०
अपाय नि दुष्कृत्ये करणान्यावर त्याची सारी पापे येऊन आदळतात. ज्यांना दुष्परिणामांपासून नि अपायांपासून दूर राहण्याची इच्छा असते, ते पापांपासून नेहमी दूर राहतात.

सर्ग ३३ अहिंसा ( मारणे)


३२१
अहिंसा सर्वात्तम सद्गुण आहे; हिंसेसंगे सारी पापे येतात.


३२२
भुकेलेल्यास जवळची भाकर दे नि हिंसेपासून दूर राहा, ह्या सर्व धर्मोपदेश्कांच्या दोन मुख्य आज्ञा आहेत.


३२३
सद्गुणांचा राजा म्हणजे अहिंसा; त्याच्या खालोखाल सत्य.


३२४
सन्मार्ग कोणता? आगदी लहान जीवासही कसे वाचवावे असा विचार ज्या मार्गाने गेल्यामुळे मनात येतो तो सन्मार्ग, तो श्रेष् मार्ग.


३२५
संसारातील त्रिविध तपांच्या भीतीने अनेक संसार-निवृत्त होतात. परंतु अशांमध्ये तोच खरोखर श्रेष्, जो प्रणिमात्रांचे प्राण पवित्र नि पूज्य मानतो.


३२६
अहिंसाव्रताचा निश्चय करणान्यावर सर्वभक्षक काळही वक्रवृष्टी करू इच्छित नाही.


३२७
प्राण सर्वांना प्रिय आहे. स्वतःचा प्राण वाचविण्यासाठीही कोणाचा प्राण घेऊ नकोस.


३२८
यज्ञामुळे नानाविध सुखे मिळतात असे म्हणतात. परण्तु हिंसा करून मिळणारी सुखे सज्जनाला, पवित्र हृदयाच्या मनुष्याला विष्ठेसमान त्याज्य नि तिरस्करणीय वाटतात.


३२९
हिंसेवर जगणान्यांना विचारवंत पिशिताशन करणारे असे म्हणतात


३३०
तो पाहा भणंग भिकारी. त्याच्या सर्वागाला व्रणे पडली आहेत, रक्त-पूं वाहात आहेत; पौर्वजन्मी त्याने रक्तपात्केले होते असे विचारवंत ज्ञानी पुरुष म्हणतात.

 सर्ग ३४ संसाराची असारता


३३१
क्षणभंगुराला शाश्वत मानणे, यापरता दुसरा मूर्खपणा कोणता? या मोहांधतेपेक्षा दुसरे मोठे अज्ञान ते कोणते?


३३२
गावात तमाशा बघायला लोकांचे थवेच्या थवे क्षणात जमतात; परंतु थोडया वेळाने ते सारे परत जातात. त्याप्रमाणे वैभव येते नि ओसरतेही.


३३३
संपत्ती बुडबुडयाप्रमाणे आहे. तू संपत्तिमान झालास तर चिर-कल्याण-कारी गोष्टी करायला वेळ लावू नकोस.


३३४
काळ अगदी निरुपद्रवी दिसतो; परंतु मानवी जीवनाला अखंड कर्वतणारी कर्वत म्हणजे तो हा काळ.


३३५
जिभेची जो बोबडी वळली नाही नि घशात घुरुघुरू सुरूझाले नाही; तोच सत्कृत्ये करण्याची त्वरा कर.


३३६
तो काल होता नि आज नाहीं. अशी स्थिती आहे. या जगातील आश्चर्यांतील आश्चर्य ते हेच.


३३७
दुसन्या क्षणाचीही आपणांस शाश्वती नसते; परंतु आपण किती दूरचा विचार करीत बसतो !


३३८
अंडे फोडून पाखरू बाहेर पडते, त्याप्रमाणे आत्मा नि शरीर यांचे प्रेम आहे.


३३९
मृत्यू निद्रेप्रमाणे आहे; जीवन निद्रोत्तर जागृतीप्रमाणे आहे.


३४०
या क्षुद्र शरीरात वस्ती करण्याची आत्म का बरे इच्छा करतो? त्याचे शाश्वत असे दुसरे घर नाही का?

 सर्ग ३५ त्याग


३४१
मनुष्य ज्या वस्तूचा त्याग करतो, त्या वस्तूपासून होणान्या दुःखापासून तो स्वतःला मुक् करून घेतो.


३४२
आनंद हवा असेल तर निःसंग हो. सर्वसंगपरित्याग केल्यावर तुला अपार आनंद मिळेल.


३४३
पंचेंद्रियांचा चुराडा कर; ज्या ज्या वस्तूंत तुला सुख वाटते, त्या सर्वांचा संपूर्णपणे संग सोड.


३४४
निःसंग असणे हेच व्रती मनुष्याचे खरे व्रत होय. एकाही वस्तूचा पुन्हा संग्रह कराल तर पुन्हा पूर्वीच्या जाळयात अडकाल.


३४५
जन्म-मरणाचे फेरे चुकविण्याची ज्याला इच्छा असते त्याला हे शरीरही ओझे वाटते, बंधनरूप वाटते; मग इतर वस्तूंचे त्याला केवढे ओझे वाटत असेल त्याची कल्पना करा.


३४६
मी नि माझे म्हणजे दुसरेकाही नसून केवळ अहंकार होय, मिथ्याभिमान होय; यातून मुक् होतोतो देवलोकाहून श्रेष् अशा लोकी जातो.


३४७
आसक्ती सोडणान्याला चिंता चिकटून बसेल, दुख त्याला घेरील. ती त्याला कधी सोडणार नाहीत.


३४८
निःसंग झाले ते मोक्षाच्या मार्गाला लागले; परंतु आसक् जाळयात पडले.


३४९
आसक्ती सुटताच जन्म-मरण सुटते; आसक्ताला या असार संसारत खितपत पडावे लागेल.


३५०
ज्याने आसक्ती जिंकली, त्याची आसक्ती धर; निःसंग झाला, त्याची संगती धर; तुझे पाश तुटावे म्हणूण अशंशी भक्तिप्रमाचे बंध जोड.

सर्ग ३६ सत्याचा साक्षात्कार


३५१
सारभूत वस्तू सोडून असाराचा स्वीकार करणे म्हणजे केवढा मोह! त्यामुळे जीव पुनःपुन्हा या दुःखमय संसारात पडतो.


३५२
जो मोहनिर्मुक् झाला, त्याची दृष्टी निर्मल झाली. अज्ञानांधकार त्याला घेरीत नाही; आनंद त्याच्याजवल येतो.


३५३
ज्याचे संधय फिटले, ज्याला सत्याचा साक्षात्कार झाला, त्याला पृथ्वीहून स्वर्ग जवळ असतो.


३५४
मनुष्यजन्म मिळूनही जर सत्याचा साक्षात्कार  करूण घेणार नसाल, तर कोणते हित साधलेत?


३५५
कोणतीही वस्तू असो; तिच्यासंबंधी सारासार विवेक करणे यालाच प्रज्ञत्व म्हणतात, शहाणपण म्हणतात.


३५६
खोल विचात करून ज्याने सत्याची अनुभूती घेतलीतो अशा मार्गाने जाईल की जेणेकरून जन्म-मरणाची यातायात पुनश् पाठीस लगणार नाही.


३५७
सत्याचे चिंतन करून ज्यांनी ते मिळविले त्यांना 'पुनरपि जननं; पुनरपि मरणं' चा विचार करायला नको.


३५८
जन्म-मरणाच्या फेन्यात पडण्याचा मूर्खपणा होऊ नये म्हणूण सत्याच्या नि पूर्णाच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो, तोच खरा प्रज्ञावंत.


३५९
स्वोद्धाराचे मार्ग ज्याला वर्णपणे अवगत आहेत, जो सर्व प्रकारची आसक्ती जिंकून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्या पापांची फळे तो भोगीत असतो, ती प्रारब्धप्राप् कर्मेही सोडून जातात; त्यांच्यापासून तो मुक् होतो.


३६०
काम, क्रोध, मोह ज्याने जिंकले, त्याच्या सर्व दुःकांचो निवृत्तो जालो.

सर्ग ३७ वासनाक्षय


३६१
वासनांच्या बीजामुळे जीवाला जन्म-मरणाचे पीक लाभत असते.


३६२
जर तुला कशाची तळमळ लागवी असे वाटत असेल तर जन्म-मरणा-पासून मुक् होण्याची लागू दे.


३६३
वासनाक्षयासारखी दुसरी संपत्ती इहलोकीनाही; स्वर्गतही या ठेव्याहून अधिक मौल्यवान ठेवा तुला आठळणार नाही.


३६४
शुद्धता म्हणजे काय? शुद्धता म्हणजे वासनांवर विजय मिळविणे. पूर्ण सत्याची तळमळ लागली, तरच वासनाबंध तोडना येतात.


३६५
ज्यांनी वासना जिंकली, त्यांनाच मुक् पुरुष असे म्हणता येईल; दुसरे मुक्तवत दिसले तरी ते बद्धच असतात.


३६६
तुला धर्म प्रिय असेल तर वासनांपासून पळून जा. कारण वासना म्हणजे निराशा, वासना म्हणजे जाळे.


३६७
संपूर्णपणे निरिच्छ व्हाल, तर म्हणाल त्या मार्गाने मोक्ष मिळेल.


३६८
ज्याला वासना नाही, त्याला दुःख नाही; पयंतु ज्याला सान्या वतूंचा सोस, त्याच्यावर दुःखांपाठीमागून दुःखे कोसळतात.


३६९
वासना म्हणजे सर्वांत मोठी आपत्ती, ज्याने वासनांना जिंकले, त्याला या जगातच शाश्वत आनंद लाभेल.


३७०
वासना कधी तृप्त होत नाहीत. ज्या क्षणी मनुष्य वासनांना झडझडून फेकून देतो, त्याच क्षणी त्याला परिपूर्णतेचीप्राप्ती होते.

सर्ग ३८ नियती


३७१
दैवाची कृपा व्यायची असली म्हणजे मनुष्याला निश्चय-बुद्धीही येते; परंतु दैव सोडून जाणार असेल तर आलस्य येऊन मीठी मारते.


३७२
दुर्दैवाचा फेरा येणे म्हणजे मनुष्याची मनःशक्तीमंद होणे, बुद्धिमंद होणे; परंतु दैवाची कृपा व्हायची असेल तर बुद्धीचाही विकास होऊ लागतो.


३७३
दैवच तुम्हांला ओढीत नेऊ लागले, तर सर्वांच्या दोळयांवर जणू पटल येते; मग तुमची विद्या, तुमची बुद्धी, यांचा काही उपयोग नसतो.


३७४
जगाचे परस्परविरोधीअसे दोन भाग पडतात. यशस्वी जीवन आणि साधुता या दोन भिन्न गोष्टी आहेत.


३७५
जेव्हा काळ तुझ्या विरुद्धच असेल, तेव्हा चांगल्या गोष्टीही वाईट होतील; परंतु वेळ बदलताच वाईटाचेही चांगले होईल.


३७६
तू कितीही काळजी घेतलीस तरी दैवाच्या मनात जे तुला द्यावयाचे आहे, ते तू नको नको म्हटलेस तरी तुझ्याजवळून जाणार नाही.


३७७
दैव सर्वशासक आहे. त्याच्या आज्ञेवाचून तुला तुझ्या अगणित संपत्तीचा उपभोग घेता येणार नाही.


३७८
या जगात रंजले गांजलेले शेवटी वैराग्याकडे मन वळवतात; परंतु जी दुःखे त्यांच्या निशिबी आहेत, त्यांच्या भोगासाठी दैव त्यांचा पाठपुरावा करते, त्यांना अडवून ठेवते.


३७९
चांगले झाले असता जे उडया मारतात, तेव वाईट झाले असता का रडू लागतात? का दुःखीकष्टी होतात?


३८०
नियतीहून, दैवाहून बलवान असे काय आहे? प्राणी आपणांस खाऊ पाहणान्या दैवावर विजय मिळविण्याचे बेत करीत असतो; परंतु दैव त्याला आधीच बांधून खाली खेचते.

No comments:

Post a Comment