Friday, 1 June 2007

सर्ग 71-80



Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल 
भाग दुसरा: अर्थ
सर्ग ७१ तोंडावरून परीक्षा


७०१
दुसन्याचे तोंड उघडण्यापूर्वीच त्याच्या मनातील जो जाणतो, तो या जगाचे भूषण होय.




७०२
दुसन्याच्या मनातील जो खात्रीपूर्वक ओळखतो तो जणू देवच आहे असे समज.


७०३
दुसन्यांच्या तोंडावरूनच त्यांच्या मनातील जे ओळखतात अशांना काहीही करून तू आपल्या सल्लागारमंडळात.




७०४
बोलता जे ओळखतात, अशांची चर्या इतरांप्रमाणेच दिसली तरी अशांचा एक विशिष् वर्गच असतो.


७०५
हृदयात काय चालले आहे ते एका दृष्टिक्षेपानेच जर डोळयाला ओळ्खता आले नाही तर ज्ञानेंद्रियातील वैशिष्ट्य कोठे उरले?


७०६
जवळच्या वस्तूचा रंग स्फटिक धारण करतो, त्याप्रमाणे मनाचा रंग मुद्रा धारण करीत असते.




७०७
मुद्रेहून सूक्ष्म नि संवेदनाक्षम असे दुसरे जगात काय आहे? हृदयातील सुखदुःख प्रथम चर्याच दर्शविते.


७०८
बोलल्याशिवाय तुझ्या अंतकरणातील गोष्टी जो जाणू शकतो, तो जर तुझा झाला तर त्याच्याकडे पाहूनच तुझे हेतू पूर्ण होत जातील.


७०९
डोळयांच्या लहरी जो जाणतो तो केवळ त्यांच्याकडे पाहूनच हृदयात प्रेम आहे की वैर आहे ते सांगेल.


७१०
स्वतःला पाताळयंत्री समजतात त्यांच्यामध्ये विशेष काही असेल तर त्यांचा डोळा.

सर्ग ७२ श्रोत्यांची वृत्ती ओळखणे




७११
बांघवहो, तुम्ही वक्तृत्वाचा अभ्यास केलेला आहे.; सदभिरुची काय तेही तुम्ही जाणता; श्रोतृवृंदाचे स्वरूप नीट ओळखा, त्यांना रुचेल नि पचेल असे भाषण करा.


७१२
वक्तृत्वकलाभिज्ञांनो, प्रथम श्रोत्यांची लहर नि मनोवृत्ती नीट ओळखून मगव काळजीपूर्वक विचार करून तुम्ही भाषण करीत जा.


७१३
सभेचा रागरंग बघता जो एकदम बोलू लागते, त्याला वक्तृत्वकलाकळत नाही; एकढेव नव्हे, तर त्याला काहीही कळत नाही.


७१४
शहाण्यांच्यानि पंडितांच्या सभेत शहाणपणाच्या नि पंडिताच्या गोष्टी कराव्या; परंतु मूर्खांच्या सभेत साधेपणाचा शुभ्र वेष धारण करावा.


७१५
वृद्धांच्या परिषदेत पुढाकार घ्याव्याच्या नाही, असे मनात ठरवायला फारच संयम लागते. हा गुण इतर सद्गुणांपेक्षा शतपटींनी शोभतो.


७१६
सुज्ञांसमोर जो अपशब्द बोलतो तो स्वतःचे नुकसान करतो. आपण धर्ममार्गापासून च्युत झालो असे मनात येऊन नंतर त्याला पस्तावावे लागेल.


७१७
गुणी विचक्षणांच्या सभेत विद्वानाची विद्या खूलून दिसते.


७१८
सुज्ञ जाणत्या लोकांना उत्तम सल्ला देणे म्हणजे जिवंत वृक्षांच्या मुळांना पाणी घालण्य़ाप्रमाणे आहे.




७१९
प्रतिष्ठित सुज्ञ लोकांनी आपले भाषण मोठया आवडीने ऐकावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी चुकूनही मूर्खांच्या सभेत भाषण करू नये.




७२०
जे लोक तुमचे उणे पाहण्यासाठी अधीर आहेत, अशांच्या समोर व्याख्यान देणे म्हणजे गाटारावर अमृतवर्षाव करण्याप्रमाणे आहे.

सर्ग ७३ सभेतील आत्मविश्वास


७२१
जे वद्तृत्वकलाभिज्ञ आहेत, जे रस जाणतात, सदभिरुची ओळखतात, ते आपले म्हणणे व्यवस्थि रीतीने कसे मांडावे ते जाणतात. सूज्ञांच्या सभेत त्या>ची कधी फ्जिती व्हायची नाही.


७२२
विद्वानांच्या सभेतही जो आपली निश्चित मते निर्भयपणे मांडतो, त्यांचे समर्थन करू शकतो, तो विद्वानांचा मुकुटमणी होय.


७२३
समरांगणात मृत्यूलाही आव्हान देणारे अनेक आढळतात; परंतु गांगरता सभेल तोंड देणारा दुर्मिल.


७२४
ज्यात तू तज्ज्ञ आहेस, जे तू आपलेस केले आहेस, ते ठामपणे विद्वानांसमोर मांड; परंतु ज्याचे तुला ज्ञान नाही, ज्यात तू पारंगत नाहीस, ते सारे त्यांच्यापासून शीक.


७२५
सभेत निर्भयपणे बोलता यावे म्हणून तर्कशास्त्र नि न्यायशास्त्र यांचा अभ्यास कर.


७२६
ज्या तरवारीत पाणी नाही, ती काय चाटायची आहे? पंडितांच्या सभेत घाबरणान्याला ग्रंथांचा काय फायदा?


७२७
षंढाच्या हातातील तरवारीप्रमाणे पंडितसभेत घाबरणान्यांचे ज्ञान होय.


७२८
विद्वानांच्या सभेत आपले म्हणणे जर त्यांच्या गळी उतरवता आले नाही तर आपले ज्ञान फोल होय.


७२९
विद्वानांच्या सभेत गलितधैर्य होणान्यांची विद्या केवढीही असली, तरी अडाण्यापेक्षाही त्यांची योग्यता कमी लेखली जाईल.


७३०
सभेत गांगरणारे आणि स्वतःचे विचार ज्यांना नीट विवरून सांगता येत नाहीत, ते जिवंत असले तरी मृतवतच होत.

सर्ग ७४ देश


७३१
जेथे नेहमी भरपूर पीक येते, जेये ऋषिमुनीचे माहेर आहे, भाग्यवान आणि संपन्न लोक जेथे नांदतात, तो देश थोर होय.




७३२
आपल्या सकलैकधर्मामुळे जो देश जनतेचे प्रेम ओढून घेतो, दुष्काळ नि दुर्भिक्ष यांपासून जो देश मुक् असतो, तो देश थोर होय.


७३३
कितीही ओझे पडले तरी जो देश सारे सहत करतो, आणि कर वगैरे व्यवस्थित देतो, तो देश थोर होय.


७३४
जेथे दुष्काल नाही, रोगराई नाही, शत्रूचे हल्ले जेथे होत नाहीत, तो देश थोर होय.




७३५
ज्या देशात आपसात झगडणारे पंथ नि जाती नाहीत, जेथे खुनी अराजक नाही, जेथे देशाचा नाश करणारे देशद्रोही नाहीत, तो देश थोर होय.




७३६
शत्रूमुळे ज्या देशाची धुळधाण होत नाही, आणि परचक्र आले तरीही ज्याच्या उत्पन्नात काही कमी होत नाही, तो देश सर्वश्रेष् होय.




७३७
नद्या, झरे, वेळेवर पाऊस, योग्य ठिकाणी डो डोंगरपर्वत, मजबूत तटबंदी, या गोष्टींची प्रत्येक देशास अत्यंत जरुरी असते.


७३८
संपत्ती, भरपूर पीक, सुखी प्रजा, रोगमुक्तता, परचक्रापासून सुरक्षितता, ही राज्याची वा कोणत्याही देशाची पाच भूषणे होत.


७३९
लोकांच्या श्रमाशिवायही जो देश विपुल देतो, तोच खरोखर देश; श्रम केल्यारवच जो देतो, प्याला देश म्हणणे योग्य नाही.




७४०
देशाला वरील सर्व गोष्टी अनुकूल असूनही जर राजसुख नसेल तर सारे व्यर्थ.

 
सर्ग ७५ दुर्ग, किल्लेकोट


७४१
संरक्षणाच्या चिंतेत असणान्या दुर्बल राजांना दुर्ग साहाय्य देतातच; परंतु प्रबळांनाही त्यांच्यापासून मदत होतो.


७४२
नद्या, समुद्र, वाळवंटे, पर्वत, घनदाट जंगले, ही निरनिराळया तन्हेची संरक्षक साधनेच आहेत.


७४३
किल्ल्यांच्या बाबतीत उंची, जाडी, भक्कमपणा आणि अभेद्यपणा या चार गोष्टी लक्षात घेतल्या जातात, असे शास्त्र सांगते.


७४४
ज्याला फार थोडया जागी धोका आहे, पाडाव करू पाहणान्यांना जो पुरन उरतो, तो खरोखर अजिंक्य दुर्ग होय.


७४५
अभेद्यता, आतील सैन्याला स्वसंरक्षणाची शक्यता, आत भरपूर धान्यसामग्री इतर सामान असणे, या गोष्टी किल्ल्याला आवश्यक आहेत.


७४६
ज्यात सर्व प्रकारची सामग्री आहे, ज्याच्या रक्षणासाठी राजनिष् लोक सिद्ध आहेत, जो चांगल्या तन्हेने तोंड देईल तोच खरोखर किल्ला होय.


७४७
वेढा घालून, हल्ला करून किंवा दगलबाजी करून जो घेणे शक्य नाही, तोच खरोखर अजिंक्य किल्ला.


७४८
शत्रू अर्थ करीत असताही आतील सैन्य ज्यामुळे शत्रूला पराभूत करते तो खरा किल्ला होय.


७४९
विविध तटबंदी नि मान्याच्या जागा, यांमुळे जो दुर्ग अभेद्य केला गेला आहे, शत्रू दूर आहे तोच त्याची धुळदाण उडवायला जो स्वतःच्या सैनिकांना समर्थ करतो त्यालाच किल्ला म्हणावे.


७५०
किल्ला कितीही अभेद्य नि बळकट असला तरी तेथील सैन्य जर दमदार नि शर्थाने लढणारे नसल तर काय उपयोग?

सर्ग ७६ द्रव्य मिळविणे




७५१
महत्व नसणान्यांना महत्व प्राप्त करून देणारे द्रव्यासारखे दुसरे कोणते साधन आहे?


७५२
दरिद्री माणसाचा सर्वत्र अपमान होतो; धनवानाला सर्वच या, बसा म्हणतात.




७५३
द्रव्य म्हणजे अचंचल दीप-ज्योती; ज्याच्याजवळ हे निष्कंप द्रव्यतेज आहे त्याला कोठेच अंधार नाही.




७५४
उत्तम व्यवहाराने जोडलेल्या धनाने पुण्य नि सुख प्राप् होतात.




७५५
ज्या द्रव्यार्जनात दया नि उपकार यांना थारा नाही, ते द्रव्यार्जन नको.




७५६
जप् केलेल्या मालामत्ता, बेवारशी मिळकती, जकाती, लढाईतील लूट, या सर्वांमुळे राजाचा खजिना समुद्र होत असतो.


७५७
प्रेमामुळेदया नि सहानुभूती जन्मतात; परंतु त्यांचे सर्वधन व्याहला लक्ष्मी ही धात्री हवी असते.


७५८
श्रीमंताने एखादे काम अंगावर घेणे म्हणजे टेकडीवरून हत्तींची झुंज पाहण्याप्रमणे आहे. (म्हणजे त्या मनुष्याला भीती नि चिंता नसते)


७५९
द्रव्य भरपूर मिळवावे. शत्रूचा अभिमान धुळीस मिळवायला यासारखे तीक्ष्ण शास्त्र नाही.


७६०
न्याय्य रीतीने धनार्जन करणान्याला धर्म आणि काम हे पुरुषार्थही सहज प्राप् होतील.

सर्ग ७७ सैन्य


७६१
राजाच्या मालकीच्या गोष्टींपैकी मुख्य गोष् म्हणजे शिस्तीत वाढलेले सुसज्ज सैन्य होय.


७६२
बिकट परिस्थितीत भयंकर हल्ले होत असताही जे खरे वीर असतात ते 'मारू किंवा मरू' या निश्चयाने उभे असतात.


७६३
उंदरांची प्रचंड सेना समुद्राप्रमाणे गदारोळ करीत आली तरी भुजंगाचा एक फूत्कर ऐकताच त्यांची गर्जना बंद पडेल.


७६४
ती खरी सेना, जिला पराजय माहीत नाही, फितुरी ठाऊक नाही, आणि पराक्रम जिची परंपरा आहे.


७६५
खवळलेला काळ प्रत्यक्ष समोर युद्धास आला असताही जे सैन्य शौर्याने तोंड देते, ते खरे सैन्य.


७६६
पराक्रम , स्वाभिमान, गोंधळातही झटपट निर्णय घेणे आणि परंपरागत शौर्य-धैर्याची प्रभा, या चार गोष्टी म्हणजे सैन्याचे चिलखत होय.


७६७
खरे लढाऊ सैन्य शत्रूसाठी टपलेले असते. शत्रू केव्हाही आला तरी त्याला तेव्हाच मातीत मिळवू, असा त्याला आत्मविश्वास असतो.


७६८
सैन्य जरी दमदार, काटक नि सहनशील असले तरी दारूगोळा नि इतर लष्करी साधनांच्या योगेच विजय प्राप् होत असतो.


७६९
जे संख्येने कमी नाही, वेळेवर पगार मिळत असल्यामुळे जे उपाशी नाही, जे द्वेषमत्सरद्रोहाने ग्रस् नाही, ते सैन्य नेहमी विजयीच होणार.


७७०
सैनिकू भरपूर आहेत; परंतु सेनानींची वाण असेल तर सैन्य कसे उभे करता येईल.

सर्ग ७८ आत्मनिरपेक्ष योद्धा


७७१
हे शत्रूने, रणांगणात माझ्य़ा स्वामीसमिर उभे राहू नका. ज्यांनी ज्यांनी आजपर्यत त्याला आव्हान केले, त्यांच्या शवांवर कबरी उभ्या राहिल्या.


७७२
नेम धरून सशाला बाणाने ठार मारण्यापेक्षा हत्तीवर भाला फेकून त्याला तो लगाला तरी त्यात अधिक शौर्य आहे.


७७३
निःशंकपणे शत्रूवर तुटून पडण्याला पराक्रम म्हणतात; परंतु पराभूताला उदारपणे क्षमणे नि वाचविणे यत मोठेपणा आहे. त्याने पराक्रमाला शोभा चढते.


७७४
त्या वीराने स्वतःचा भाला शत्रूच्या हत्तीवर फेकला; तो दुसरा भाला बघत होता, इतक्यात स्वतःच्या शरीरातच रुतलेला भाला त्याला दिसला, परमानंदाने तोच उपटून त्याने हातात घेतला.


७७५
आपल्यावर भाला फेकला जात अस्ता डोळा लवणे हे वीराला लाजिरवाणे नाही का?


७७६
रक्तस्रावी जखमा ज्या दिवशी वीराला स्वतःच्या शरीरावर दिसत नाहीत, तो दिवस त्याला व्यर्थ गोल्याप्रमाणे वाटतो.


७७७
त्रिभुवनव्यापी कीर्ती मिळावी म्हणून जे उत्सुक असतात, प्राणांची ज्यांना पर्व नसते, त्याला डाव्या पायातील तो तोडर पाहणे किती धन्यतेचे असते!


७७८
योद्धे युद्धात प्राणाची पर्वा करीत नाहीत. प्राण धोक्यात घालू नका, असे सेनानीने सांगितले तरीही ते निःशंकपणे शत्रूवर तुटून पडतात.


७७९
स्वीकृत कामी यश यावे म्हणून जे प्राणापर प्रयत् करतात, त्यांना कोण बरे नावे ठेवील?


७८०
ज्याला आपल्या मरणाने सेनानीच्या डोळयातून अश्रु आनता येतील, असे मरण यावे म्हणून भिक्षा मागितली तरी काय हरकत?

सर्ग ७९ मैत्री


७८१
मैत्रीहून दुर्मिळ जगात काय आहे? शत्रूच्या सर्व दुष् कारस्थानांपासून बचाव करणारे मैत्रीहून अधिक बळकट असे चिलखत कोठे मिळणार?


७८२
थोरांची मैत्री शुक्लेन्दुवत वर्धमान असते; मूर्खाची कृष्णपक्षातील चंद्राप्रमाणे असते.


७८३
थोरांची मैत्री थोर ग्रंथांच्या अध्ययनाप्रमाणे आहे; जितके अधिक अंतरंगत शिरावे, तितकी अधिकच शोभा नि गोडी.


७८४
मैत्री म्हणजे गप्पा नव्हे, केवळ हास्यविनोद नव्हे; तर आपण चुकीच्या मार्गाने जात असता ती कानौघाडणीही करते सावरते.


७८५
नेहमी भटणे एकमेकांच्या जवळ बसणे या वरपांगी गोष्टी; मैत्रीचे बंधन हृदयैक्यामुळे दृढ होत असते.


७८६
तोंडदेखल्या स्मित करणे म्हणजे मैत्री नव्हे; हृदयाला हसविणारी प्रीती जेथे असते तेथे मैत्री असते.


७८७
पापापासून परावृत्त करणारा, सन्मार्गकडे वळविणारा, विपत्तीत बाजू घेणारा, तो खरा मित्र.


७८८
वान्याने कमरेचे वस्त्र उडवले जात असता ते सावरण्यासाठी हात ज्याप्रमाणे झटकन धावतो, त्याप्रमाणे उघडया पडलेल्या मित्राच्या साहाय्यास धावतो तोच खरा मित्र.


७८९
मैत्रीचे खरे माहेर कोठे? जेथे दोन मने परस्परांची उन्नती व्हावी म्हणून शक्य त्या सर्व गोष्टींत सहकार्य करतात तेथे.


७९०
तो मजवर इतके प्रेम करतो, मी त्याच्यावर इतके प्रेम करतो, असे किती जरी म्हटले तरी जी मैत्री मोजली जाते तिच्यात काहीतरी कमी आहे.

सर्ग ८० मैत्रीसाठी योग्यायोग्य परीक्षा


७९१
प्रथम पारख केल्याशिवाय मैत्री करणे याच्यासारखा धोका नाही. कारण एकदा मैत्री जडली म्हणजे ज्याला हृदय म्हणून आहे, तो ती सोडणार नाही.


७९२
प्रथम परीक्षा केल्याशिवाय जो मित्र जोडतो तो स्वतःवर संकट ओढवून घेतो. अशा गोष्टीचा परिणाम अखेर प्राणनाशात होतो.


७९३
ज्याच्याशी मैत्री करावयाची असेल, त्याचे कुटुंब, त्याचे गुणावगुण, त्याचे आप्तेष्ट्मित्र, या सर्वांची नीट चौकशी करून मगच मैत्री जोडावी.


७९४
जो सत्कुलज आहे, जो निंदा, अपकीर्ती यांना भितो, अशाची मैत्री वाटेल ती किंमत देऊन जोडावी.


७९५
ज्यांना सन्मार्ग माहीत आहे, तू वाईट मार्गाने जाताच जे तुझी नीट कानौघाडणी करू शकतील, अशांनाच मित्र कर.


७९६
विपत्तीतही एक गुण आहे; मित्रांची प्रीती मेजण्याचे विपत्ती हे एक माप आहे.


७९७
मूर्खांच्या मैत्रीपासून मुक्तता हा सर्वांत मोठा फायदा आहे.


७९८
ज्या गोष्टीत अपयश आल्याने तुला फार वाईट वाटेल, त्यांना आरंभूच नको; विपत्तीत जे तुला टाकून जातील आशांची मैत्री नको.


७९९
आपत्काली दगा देणान्याच्या मैत्रीचा विचार मनात येताच मृत्युशय्येवरही हृदय करपून जाईल.


८००
पात्र व्यक्तींची मैत्री मोठया कसोशीने मिळव; अपात्रांची संगती, त्यांना काही देऊन का होईना, परंतु सोडून दे.

No comments:

Post a Comment