Friday, 1 June 2007

सर्ग 91-100Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल 
भाग दुसरा: अर्थ
सर्ग ९१ बाईलवेडे
९०१
बाईलवेडयांना मोठेपणास मुकावे लागते. मोठमोठया गोष्टी आपण करू, अशी ज्यांना महत्त्वकांक्षा असेल त्यांनी या मोहापासून दूर राहवे.


९०२
अती स्त्रैणाची विलासलालसा लोकांत उदाहरण न्हणून दाखविली जाईल लज्जेने त्याला मान खाली घालावी लागेल.


९०३
पत्नीसमोर लाळ घोटण्यान्याला थो रांमोठयांसमोर तोंड दाखवायला जागा नसते.
९०४
जो आपल्या पत्नीचा दास आहे, त्याला मोक्ष नाही. त्याची बुद्धी पै कीमतीची समजा.


९०५
जो आपल्या पत्नीलाही भितो, तो थोरांमोठयांची सेवा कशी करणार?


९०६
पत्नीच्या सुकुमार बाहुपाशांना भिऊन जे उभे राहतात, ते देवांप्रमाणे राहीले, वागले, तरी त्यांना कोणीही मान देणार नाही.
९०७
राज्यकारभारात जो बायकांचे बंड चालू देतो, त्याच्याहून विनयशील कुमारिका अशिक थोर नि श्रेष् आहे.


९०८
बायकोच्या मुठीत वागणारे आपल्या मित्रांच्या गरजा पुरवू शकणार नाहीत, कोणतेही चांगले काम करू शकणार नाहीत.


९०९
जे स्त्रियांच्या हाती सत्ता देऊन त्यांच्या तंत्राने वागतात, त्यांना धर्मार्थ नाहीतच; परंतु प्रेमाचाही खरा आनंद त्यांना लाभणार नाही.


९१०
मोठया गोष्टी मनात खेळविणारे, ज्यांच्यावर ईश्वरी कृपा असते, ते स्त्रैणपणाचा मूर्खपणा कधीही करणार नाहीत.

सर्ग ९२ वारांगना


९११
ज्या स्त्रिया प्रेमासाठी नव्हे, तर पैशासाठी म्हणून परपुरुषाची इच्छा करतात, त्यांच्या मोहक लीला दुःखाकडे नेतील.


९१२
वरपांगी प्रेम दाखवून स्वार्थावर ज्यांची दृष्टी असते, अशा स्त्रियांचे मार्ग नीट पाहा चार पावले दूर राहा.


९१३
प्रियकराला आलिंगन देताना वेश्या प्रेम दाखविते; परंतु प्रेतालाच आपण कवटाळीत आहोत असे ती मनात समजते.


९१४
निर्मल कर्मांची आवड असणारे वेश्येच्या स्पर्शाने स्वतःला अपवित्र करीत नसतात.


९१५
गाढी विद्वत्ता नि विवेक ज्याच्याजवळ आहे, असा पुरुष जिचे सौंदर्य सर्वांसाठी आहे अशा वेश्येच्या स्पर्शाने स्वतःला कलंक लावून घेणार नाही.


९१६
स्वहितदक्ष मनुष्य आपल्या सौंदर्याची विक्री करणान्या वेश्येच्या हाताला अपर्श करीत नाही.


९१७
फुलपाखरी वृत्तीचे उथळ लोकच शरीराने कवटाळणान्या, परंतु मन अन्यत्र असणान्या स्त्रियांच्या पाठोपाठ जातात.


९१८
धूर्त मायावी स्त्रियांची आलिंगने फसव्या अप्सरांच्या आलिंगनांप्रमाणे मूर्खांनाच मोहक वाटतात.


९१९
शृंगारसाज केलेल्या वेश्येचे मृदू बाहू म्हणजे नरकाची गार्ता; नीच लोकच या गर्तेत पडून सडतात.


९२०
दैवाची अवकृपा असणारे लोकच दोन मने असणान्या वेश्या, मद्य आणि द्यूत यांत आनंद मानतात.

सर्ग ९३ सुरापान


९२१
मद्यपी माणसाचे शत्रू त्याला कधीही भिणार नाहीत; मद्यपी मिळविलेली कीर्ती गमावील.


९२२
सुरापान करू नका; सज्जनांनी आपणांस मानावे असे वाटत असेल तर दारूपासून दूर राहा.


९२३
दारुडयाचे दर्शन जन्मदात्या मातेसही किळसवाणे वाटते; मग इतर सन्मान्य जनांस वाटेल यात काय आश्चर्य


९२४
दारूचे व्यासन ज्याला लागते, त्याला लज्जदेवी सोडून जाते.


९२५
स्वतःचे पैसे देऊन दारू पिणे आणि बुद्धिभ्रष् होऊन गटारात लोळणे, हा मूर्खपणाचा कळस होय.


९२६
नेहमी ताडी पिणारा नेहमी झोपी गोल्याप्रमाणे किंवा मृतवतच मानावा.


९२७
चोरून दारू पिऊन जे बेहोष होऊन पडतात, त्यांच्या व्यसनाचा लवकरच गवगवा होऊन फजिती होते.


९२८
दारुडयाने दारू म्हणजे काय ते मला मातीतही नाही, असे ढोंग तरी करू नये. कारण खोटे बोलण्याचे आणखी एक पाप ते करतात.


९२९
सुरामत्तजवळ जो बुद्धिवाद करू पाहतो, सुरापानाचे तोटे त्याला समजावू पाहतो, त्याचे ते करणे म्हणजे पाण्यात बुडालेल्याजवळ मशाल शोधन्याप्रमाणे आहे.


९३०
मद्याप्याची स्थिती तुम्ही शुद्धीवर असताना पाहाल तर दारू प्यायल्यावर आपली स्थिती कशी होईल, त्याचे चित्र डोळयांसमोर नाही का आणता येणार?

सर्ग ९४ द्यूत
९३१
तू जिंकणार असलास तरीही द्यूत खेलू नको. तुझे ते जिंकून घेणे माशाने जिळलेल्या गळाप्रमाणे आहे.


९३२
द्यूतासक् लोक एक मिळवतील तर शंभर गमावतील. या जगात स्वतःची भरभराट करून घ्यायला त्यांना कोठे वाव आहे?


९३३
पुनःपुन्हा सारे पणास लावाल तर सारे गमावाल.


९३४
द्यूताने जितक्या लवकर दारिद्र्य येते, तसे कशानेच येत नाही. द्यूताने नाव बद्दू होते आणि वाटेल ते घाणेरडे कृत्य करायलाही मनुष्य तयार होतो.


९३५
फासे खेळण्यातील आपल्या कौशल्याचा अभिमान बाळगणारे नि द्यूत्गृहाकडे जाणारे पुष्कळ झाले. परंतु रडला नाही, पस्तावला नाही, असा कोणीही त्यात दिसत नाही.


९३६
द्यूतासक्तीच्या रूपाने तुमचे दुर्दैवच येते नि ते तुम्हाला अंध करते शेवटी अन्नान्नदशा प्राप् होते.


९३७
जुगाराच्या अड्डयावर जाऊन तू आपला वेळ वाया दवडशील, तर लवकरच सारी संपत्ती संपुष्टात येईल, तुझा नावलौकिकही नष् होईल.


९३८
द्युतामुळे संपत्ती जाईल, प्रामाणिकपणाही नाहीसा होईल, तुझे हृदय कठोर होईल आणि तुझ्यावर दुःखसंकटे कोसळतील.


९३९
जो द्यूतरत आहे, त्याला यश, तेज, विद्या, वैभव- सारे सोडून जाईल. त्याला दुपारची भ्रान्त पडेल.


९४०
दुःखीकष्टी मनुष्य आशेने अधिकच जीवनासक् होतो, त्याप्रमाणे द्यूतात गमावणारा अधिकाधिक इरेस पडतो.

 
सर्ग ९५ औषधे


९४१
कफ, पित्त, वात यांत कोणाचेही आधिक्य होताच रोग होतो.


९४२
पहिले अन्न पचल्यावरच लर दुसरे खाल्ले, तर औषधाची जरूरच नाही.


९४३
बेताने खा; पहिले पचले असेल तरच खा; आयुष्यवर्धनाचा हा राजमार्ग होय.


९४४
सणसणून भूक लागेपर्यत वाट पाहा आणि मग प्रकृतीस मानवणारे अन्न बेताने घे.


९४५
प्रकृतीला मानवणारा आहार प्रमाणात घेशील, तर कधीच शारीरिक व्याधी होणार नाही.


९४६
पोट रिकामे असेल तेव्हाच खाणान्याला आरोग्य शोधीत येते; आणि अपचन असताही खच्चून खाणान्याला नाना रोग शोधीत येतात.


९४७
पचनशक्तीच्या बाहेर मूर्खपणाने आधाशासारखे खाणान्यास सतरा रोग जडतात.


९४८
रोग जडण्याचे कारण नि रोग हटण्याचे उपाय यांचा विचार कर; आणि नीट काळजी घेऊन रोग दूर करण्याच्या कामास लाग.


९४९
चिकित्सकाने रोग्याची एकंदर स्थिती, रोगचिकित्सा काळ ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा; आणि मग रोग्याला बरे करण्याच्या मार्गाला लागावे.


९५०
रोगी, वैद्य, औषधे नि औषधे देणारे, या चार गोष्टींवर रोग बरा होण्याचे, अवलंबून असते. या चारांचे पुन्हा चार विशिष् गुण आहेत.

सर्ग ९६ सत्कुल


९५१
जे कुलज असतात, त्यांच्याजवळ उपजतच सत्य, विनय हे गुण असतात.


९५२
कुलवान मनुष्य सद्वर्तन, सदभिरुची, चांगली रीतभात, प्रामाणिकपणा यांच्यापासून कधीही च्युत होत नाही.


९५३
हसतमुख, उदार हात, गोड वाणी नि नम्रता हे कुलवानाचे चार गुण आहेत.


९५४
कुलवान मनुष्य कोटी कोटी द्रव्य मिळत असेल, तरीही यशाला कलंक लावू देणार नाही.


९५५
जे कुलज आहेत ते दारिद्र्यातही औदार्य टाकणार नाहीत.


९५६
आपल्या कुळची थोर परंपरा, उत्तम चालरीत जो राखू इच्छितो, तो कधीही वाममार्गाचा अवलंब करणार नाही.


९५७
चंद्रावरील डाग स्पष् दिसतो; तद्वत मोठया घरण्यातील माणसाचा दोषही पटकन दॊळयांत भरतो.


९५८
थोर कुलात जन्मलेल्याच्या ठायी जर उद्धट वाणी दिसून आली, तर लोक त्याच्या कुलशीलाविषयी शंका घेतील.


९५९
अंकुरावरून भूमीची इच्छा तर विनयशील हो; स्वतःच्या कुलाचा मान राखायचा असेल तर सर्वांना सन्मानावयास आधी शीक.


९६०
जर सद्गुणाची पारख अएल तर विनयशील हो; स्वतःच्या कुलाचा मान राखायचा असेल तर सर्वांना सन्मानावयास आधी शीक.

सर्ग ९७ स्व-मान


९६१
प्राण गेला तरी मानहानी सहन करू नको.


९६२
आपल्यामागे आपले विशुद्ध नाव राहावे असे वाटत असेल, तर मोठेपणासाठी म्हणूनही खोटे कर्म करू नको.


९६३
वैभवाच्या काळी विनय अंगी असू दे, पडत्या काळात स्वाभिमानधनाला दृढ धरून ठेव.


९६४
ज्यांनी विशुद्ध नाव मिळविले, ते मुंडन केलेल्या डोक्यावरून फेकून दिलेल्या केसांप्रमाणे नीच आहेत.


९६५
पर्वतासमान धीरगंभीर असणारी माणसे अणूडतकेही दुष्कृत्य करतील तर क्षुद्राहून क्षुद्र ती दिसू लागतील.


९६६
तुमचा उपहास नि तिरस्कार करणान्या लोकांची खुशामत करून तेज चढत नसते; कीर्ती मिळत नसते. मग का बरे असे करावे?


९६७
आपला तिरस्कार करणान्यांचे तोंड पाहून जगण्यापेक्षा तत्काल मरणे बरे.


९६८
स्वाभिमान गमावून कातडी राखू पाहणान्यांना प्रस्न आहे: स्वाभिमानापेक्षा का कातडी मि;आची आहे?


९६९
अंगावरची लोकर जाताच कावरिमा प्राणी प्राणत्याग करतो; त्याप्रमाणे हळुवार हृदयाची काही माणसे आपला स्वाभिमान राखता येत नाही असे दिसताच जीवनाचा सोक्षमोक्ष करतात.


९७०
नाव गमावण्यापेक्षा मरणे बरे, असे म्हणणान्या मानधनांना जगा वंदील त्यांच्या यशोमंदिरात त्यांना पुजील.

सर्ग ९८ मोठेपणा


९७१
उदात कर्माची महत्वाकांक्षाअसणे म्हणजे मोठेपणा होय; मला त्या उदात्ताची जरूरी नाही, असे म्हणजे क्षुद्रता होय.


९७२
सारी माणसे एकाच पद्धतीने जन्मतात; परंतु जगतात निरनिराळया रीतीने त्यांची कीर्तीही वेगवेगळी होते.


९७३
मोठया कुलात जन्मून मन मोठे नसेल तर ते मोठे नव्हेन; क्षुद्र कुलात जन्मून मन क्षुद्र नसेल तर ते क्षुद्र नव्हेत.


९७४
स्त्रीच्या पातिव्रत्याप्रमाणे स्वतःशी सत्यनिष् असणान्यांनाच मोठेपणा मिळवता येतो.


९७५
अशक्य गोष्टी योग्य साधनांनी शक्य करणे, हा योजकत्वाचा आणि चिकाटीचा गुण मोठयांच्या ठिकाणी असतो.


९७६
क्षुद्र वृत्तीच्या लोकांना पूज्यांना पूज्य मानून त्यांची सदिच्छा नि कृपा मिळवावी असे कधीच वाटत नाही.


९७७
क्षुद्रांना सुदैवाने जर ऐश्वर्य प्राप् झाले तर त्यांच्या घमेंडीला सीमा उरत नाही.


९७८
मोठेपणा विजयी असतो; तेथे ढोंग नसते; क्षुद्र लोक आपले गुण जगासमोर मांडीत सुटतात.


९७९
जो मोठा आहे तो सर्वांजवळ नम्रतेने वागतो. क्षुद्र लोक उद्धटपणाचे आगर असतात.


९८०
मोठेपण्या दुसन्यांच्या दोषांवर पांघरूण घालतो; क्षुद्रता परनिंदेशिवाय कधी बोलतच नाही.

सर्ग ९९ पात्रता


९८१
स्वतःची पात्रता वाढावी असे ज्यांना वाटते, जे स्वकर्तव्य जाणतात त्यांना जे जे चांगले ते ते करावेसे वाटते.


९८२
पात्रता चारित्र्याच्या पावित्र्यात असते; इतर, गोष्टींनी पात्रता वाढत नसते.


९८३
विनय, प्रसन्न दयाळुत्व, दुसन्याचे दोष क्षमणे, सर्वांवर प्रेम आणि सत्यनिष्ठा हे थोर चारित्र्याच्या इमारतीचे पाच खांब आहेत.


९८४
साधूचा मोठा गुण म्हणजे अहिंसा; आणि ज्याची थोर योग्यता असते तो निंदेचे शब्द कधी बोलत नाही.


९८५
नम्रता हेच बलवंताचेही बळ; मोठयांचे शत्रूविरुद्ध हेच संरक्षक कवच असते.


९८६
योग्यता पशी पारखावी? आपल्याहून क्षुद्र असणान्यांचया ठिकाणी श्रेष्ठत्व दिसून आले तर तेही आनंदाने कबूल करणे म्हणजे पात्रता, म्हणजे योग्यता.


९८७
अपाय करणान्यावर उपकार करील, वाईट इच्छिणान्याचेही भले चिंतील, तर मग ठोरांचे थोरपण ते कोठे उरले?


९८८
शीलाची संपत्ती भरपूर असेल तर दारिद्र्य हे काही दूषण नाही.


९८९
आणीबाणीच्या प्रसंगीही जो सत्वच्युत होत नाही तोच थोर योग्यतेचा.


९९०
मोठी माणसाही मोठेपणापासून च्युत होऊ लागली तर पृथ्वीला मानवांचा भार करवणार नाही.

सर्ग १०० सभ्यता


९९१
जे मोकळया हातांनी सर्वांना जवळ घेतात, त्याच्याजवळ सभ्यता सहजच असते.


९९२
मानवाविषयीची सहानुभूती आणि कुलीनता यांच्यातून सभ्यता जन्माला येते.


९९३
बाहय चिन्हे मानवांना एक करू शकणार नाहीत; हृदयातील विनयशील सभ्य भावच सर्वांना जोडू शकेल.


९९४
न्यायी, सत्यनिष्, परोपकारी, सदाचारी, यांच्या चालीरीतीला जग श्रेष् मानते.


९९५
थट्टेतही उपहासात्मक नि अपमानात्मक शब्द उच्चाराल तरी दुसन्याचे हृदय दुखविले जाते. म्हणून कुलवान मनुष्य शत्रूजवळही सभ्यतेने वागतो.


९९६
चांगल्या चालीरीतींची माणसे जगात आहेत म्हणून जगाचे गाडे सुरळीत चालले आहे. ती नसती तर जगातील सारा सद्भाव, सारी प्रेममय माधुरी नष् झाली असती.


९९७
केवळ कुशाग्र असून काय उपयोगी? जर सभ्य चालरीत तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही केवळ ओंडकेच आहात.


९९८
असभ्यता मानवाला शोभत नाही. अन्यायी अशा वैन्यांजवळही असभ्यपणे वागणे बरे नव्हे.


९९९
ज्यांना हास्य माहीत नाही, त्यांना या विशाल सृष्टीत दिवसाही अंधारच आहे.


१०००
पोरकटाजवळ धन-दौलत म्हणजे घासलेल्या भांडयातील दुधाप्रमाणे होय.

No comments:

Post a Comment