Friday, 1 June 2007

सर्ग 51-60

Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल 
भाग दुसरा: अर्थ
सर्ग ५१ ज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परीक्षा
५०१
मनुश्याची परीक्षा चार रीतींनी करावी: सत्यप्रीती, धनप्रीती. सुखप्रीती, आणि प्राणप्रीती. या चार कसोटया लावून मग विश्वास ठेवावा.
५०२
जो कुलज आहे, अपकीर्तीला जो भितो, जो निर्दोष आहे, तो मनुष्य तुला योग्य आहे.
५०३
हृदयाने पवित्र, विद्वत्तेने गाढे असे पुरुषही काही बाबतीत अनभिज्ञ असतात, असे परीक्षान्ती दिसून येते.
५०४
मनुष्यातील चांगुलपणा नि वाईटपणा, दोहेंचे वजन करून ज्याचे वजन जास्त भरेल तो त्या मनुष्याचा स्वभाव समजावा.
५०५
मनुष्याच्या वर्तनावरून तो मोठया मनाचा आहे की क्षुद्र मनाचा आहे ते दिसून येते.
५०६
ज्यांना आप्तेष् नाहीत त्यांच्याजवळ जपून वागावे. त्यांच्या मनात प्रेमाचा ओलावा नसतो. ते कमालीचे निष्ठुर असतात.
५०७
एखाद्या मूर्खावर केवल आपले प्रेम आहे म्हणून त्याला जर तू सलागार नेमशील तर तो तुला वाटेल तितके वेडेचार करायला लावील.
५०८
पारख केल्याशिवाय जो दुसन्यावर विश्वास ठेवतो, तो आपल्या भावी पिढयांसाठीही भरपूर त्रास संकटे निर्माण करून ठेवतो.
५०९
परीक्षा केल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नकोस. आणि परीक्षा केल्यावर त्यांच्या योग्यतेनुरूप त्यांना काम दे.
५१०
परीक्षा घेतल्याशिवाय माणसावर विश्वास ठेवणे, तसेच मोठया योग्यतेच्या माणसाविषयी संशय घेणे- दोहोंमुळे फार त्रास सोसावा लाग्तो.

सर्ग ५२ परीक्षा घेऊन कामावर नेमणे


५११
सत्काय, असत्काय, याचा विवेक करून जो सट्ट पसंत करतो, त्याला कामावर नेम.
५१२
राज्यातील साधन-सामग्रीचा नीट उपयोग करून राज्याची जो भरभरट करू शकेल, आणि आपत्तींचा जो परिहार करू शकेल, अशाला तू कारभारी कर.
५१३
दयाळू, बुद्धिमान, पकटन निर्णय घेणारा आणि निर्लोभ, अशाला आपल्या सेवेत घे.
५१४
सर्व कसोटींना उतरूनही मनुष्य ऐन वेळी बदलू शकतो, अशी पुष्कल उदाहरणे आहेत.
५१५
जो कर्मकुशल आहे, चिकाटीने कष्टपूर्वक जो काम करू शकेल, अशावर काम सोपव. केवल एखाद्यावर आपले प्रेम आहे म्हणून नको.
५१६
सेवकाची निवड करून मग योग्य ते काम त्याला दे. कोणतेही कार्य करायची योगुअ वेळ येईल तेव्हाच सेवकास ते करायला संग.
५१७
त्या त्या माणसाची पात्रता, शक्ती बधून मगच कोणत्याही कामाची जबाबदारी त्याच्यावर सोपवावी.
५१८
एखाद्या कामाला अमुक एक मनुष्य लायक आहे असे दिसल्यावर त्याचा दर्जा वाढव; ते काम त्याला ज्या योगे पार पाडता येईल, त्या सान्या सवलती त्याला दे.
५१९


कार्यकुशल सेवकाने आपण होऊन काही सवलती घेतल्या, थोडे स्वातंत्र्य घेतले, तर धन्याने लगेच त्याचा विपर्यास करू नये. धनी असे करील तर भाग्य त्याला सोडून जाईल.
५२०
राजाने प्रत्याही सर्व कामावर देखरेख ठेवावी. राज्यातील अधिकारी जोपर्यत चांगले आहेत, तोपर्यत धोका नाही.

सर्ग ५३ आप्तेष्टांना संतुष् ठेव
५२१
विपत्तीतही स्नेहसंबंध ठेवणे हे आपल्या रक्ताचे आप्तच करू शकतील.
५२२
ज्यांचे प्रेम जुगारी नाही असे प्रेमळ आप् तर त्याचे भाग्य नेहमी वाढवत जाईल.
५२३
जो मनुष्य आपल्याला आप्तांजवळ मिळूनमिसळून वागत नाही, त्यांचे प्रेम संपादू शकत नाही, तो बांध नसलेल्या तळयाप्रमाणे आहे. त्याचे भाग्य वाहून जाईल.
५२४
कुटुंबियांना, आप्तांना एकत्र आणणे, त्यांचे प्रेम संपादणे, हा संपत्तीचा हेतू नि उपयोग आगे.


५२५
मनुष्य उदार नि जिएचा गोड असेल तर सारे आप् त्याच्या भोवती गोळा होतील.
५२६
जो कुरकूर करता उदारपणाने देतो त्याच्यासारखा सखा नि आप् या जगात दुसरा कोण?
५२७
स्वार्थी बनून कावळासुद्धा आपला तुकडा आपल्या जातभाईपासून लपवून ठेवू इच्छीत नाही; तर प्रेमाने सर्वांसह खातो. समानशील लोकांपाशी भाग्य राहते.
५२८
आप् असले तरी त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुरूप राजाने त्यांना वागवावे. कारण आपणांस मिळालेल्या सवलती नि अधिकार दुसन्यांस मिळू नयेत असे काहींना वाटते.
५२९
रागावून सोडून गेलेल्या आप्ताला परत आणण्याचा सोपा उपाय आहे. ज्यामुळे स्नेहभाव दूर झाला होता ते कारण दूर करणे.
५३०
एकदा फुटून निधून गेलेला आप् परत आला तर त्याला जवळ करावे, परंतु जरा जपून त्याच्याजवळ वाफ़ावे.

सर्ग ५४ अखंड सावधानता


५३१
सुखासीन बनून सावधगिरी ठेवणे फार वाईट. अतिक्रोधाहूनही अशी बेसावधगिरी वाईट असते.
५३२
दारिद्रयामुळे आकलनशवती मरते, त्याप्रमाणे सुरक्षित्तेच्या खोटया कल्पनेने तुमचे वैभव नष् होतो.
५३३
जो दक्ष नाही त्याला भाग्य नाही. जगातील सर्व विचारवंतांनी हा निर्णय दिला आहे.
५३४
किल्लेकोट असून भ्याडाला काय उपयोग? जो दक्ष नि सावध नसतो, त्याला साधनांची विपुलता असूनही काय उपयोग?
५३५
जो आधीपासून दक्ष राहात नाही, तो संकट आल्यावर आपल्या निष्काळजीपणासाठी रडत बसेल.
५३६
सर्वांच्या बाबतीत नेहमी जागरुक असणे फार चांगले.
५३७
ज्यांचे मन सदैव सावधान नि दक्ष असते, त्याला या जगात अशक्य काही नाही.
५३८
विचारवंतांनी जे करायला सांगितले आहे ते राजाने परिश्रमपूर्वक नेहमी करावे. जर तो दुर्लक्ष करील तर सात जन्म पस्तावावे लागेल.
५३९
निश्चिंत असावे, कशाची काळजी करू नये, असे तुला वाटले तर बेफिकीर राहिल्यामुळे ज्यांचा सर्वनाश झाला, त्यांची उदाहरणे डोलयांसमोर आणीत जा.
५४०
मनुष्य ध्येयाला सदैव डोळयांसमोर ठेवील तर ते प्राप् करून घेणे त्याला खरोखर कठीण नाही.

 
सर्ग ५५ न्यायी राज्य
५४१
तुला चांगला न्याय द्यायचा आहे ना? तर नीट विचार कर, पंडितांचा सल्ला घे आणि निष्पक्षपातीप्रमाणे वाग.
५४२
जगाची जगण्यासाठी आकाशातील ढगांकडे दृष्टी असते. त्याप्रमाणे रक्षणासाठी लोकांचे डोले राजदंडाकडे असतात.
५४३
विद्येचा नि धर्माचा मुख्य आधार राजदंड होय.
५४४
जो राजा प्रेमाने प्रजापालन करतो, त्याला सोडून राज्यपद जाणार नाही.
५४५
जो राजा न्यायाने राजदंड हातात ठेवतो नि योग्य रीतीने राज्य चालवितो, त्याच्या राज्यात वेळेवर पाऊस पडेल.
५४६
राजाला भाला-तलवारीने विजय मिळत नसतो; निष्पक्षपाती न्याय त्याला विजय देतो.
५४७
राजा सर्व प्रजेचा पालक होय. कोणात्याही बाजूला झुकता तो जर निष्पक्षपाती राहील तर राजदंड त्याचा सांभाल करील.
५४८
जो राजा प्रजेला भेटू इच्छीत नाही, जो योग्य कारणमीमांसा कधी करीत नाही, तो वैरी नसताही नाश पावतो.
५४९
अन्तरबाह्य शत्रूंपासून प्रजेचा सांभाळ करणान्या राजाने दुष् लोकांचे, वाईट मार्गाने जाणान्यांचे जर शासन केले तर तो दोष नव्हे; त्याचे ते कर्तव्यच आहे.
५५०
दुष्टांना देहान्तशासन देणे हे धान्याच्या शेतातून निरुपयोगी गवत उपटून टाकण्याप्रमाणे आहे.

सर्ग ५६ छळ


५५१
जो राजा सर्वांना समतेने वागवीत नाही, प्रजेवर जुलूम करतो, तो खुनी माणसाहून वाईट.
५५२
सत्तेच्या जोरावर प्रजेजवळ वाटेल ते मागणे म्हणजे "उभा राहा, काय असेल ते दे." असे मागणान्या सरोडेखोराप्रमाणेच होय.
५५३
जो राजा रोज राज्यकारभाराची देखरेख करीत नाही, राज्यातील अव्यवस्था दूर करीत नाही, त्याचे प्रभुत्व प्रत्याही घसरत जात असते.
५५४
ज्या अविचारी राजाच्या राज्यात न्याय नाही, त्याचे राज्य लवकरच जाईल.
५५५
छळामुळे विव्हळणान्यांचे अश्रू राजाचे राज्य पार धुऊन नेतील.
५५६
न्यायाने राज्य चालविले तर कीर्ती पसरते; अन्यायाने चालविले तर यश कलंकित होते.
५५७
पाऊस पडला नाही तर जशी जनांची दशा होईल, तशी दुष् राजाच्या प्रजेची होत असते.
५५८
जुलमी राजाच्या राज्यात गरिबांपेक्षा श्रीमंतांचीच स्थिती अधिक दुःखद असते.
५५९
सत्याच्या नि न्यायाच्या पथापासून विचलित होणान्या राजाच्या राज्यात पाऊस पडणार नाही.
५६०
राजा न्यायाने राज्य करील तर गाईचे स्तन अटतील, ब्राह्मण विद्या विसरतील.

सर्ग ५७ दुःखावह गोष्टींपासून दूर राहणे.
५६१
गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे हे नीट पाहूनच त्याने पुन्हा गुन्हा करू नये म्हणून शिक्षा करावी, परंतु शिक्षा प्रमाणाबाहेर कधीही नसावी.
५६२
आपली सत्ता अबाधित राहावी असे ज्यांना वाटते त्यांनी जोराने दंडा उचलावा; परंतु घाव हलके घालावा.
५६३
जो राजा प्रजेची पायमल्ली करतो, हातात जणू यमदंड घेऊन बसतो, जो प्रजेला मृत्यूप्रमाणे वाटतो, त्याला कोणीही मित्र मिळणार नाही. त्याचा सत्यानाश होईल.


५६४
ज्या राजाचा दुष्टपणा उदाहरण म्हणून सांगितला जातो त्याचे दिवस लवकरच भरतील, त्याला राज्य गमवावे लागेल.
५६५
अनुदार, प्रजेला कधी भेटणारा, अशा राजाची संपत्ती पिशाच्च्याने राखलेल्या संपत्तीप्रमाणे आहे.
५६६
ज्या राजाला क्षमा माहीत नाही, जो नेहमी मर्मच्छेदी बोलतो, त्याचे भाग्य कितीही मोठे असले तरी लवकरच संपुष्टात येईल.
५६७
कठोर शब्द नि निष्ठुर शिक्षा लोखंडावरील गंजाप्रमाणे आहेत. त्या राजाचे राज्य लोखंडाप्रमाणे गंजून नष् होईल.
५६८
मंत्र्यांचा सल्ला जो घेत नाही, आणि आपले बेत फसले म्हणजे मात्र रागाने लाल होतो, त्याचे वैभव लयाला जाईल.
५६९
वेळ आहे तोच जो राजा डागडुजी करीत नाही,संरक्षण-साधनांकडे लक्ष देत नाही, तो युद्धाची वेळ येताव आपण आता पकडले जाऊ अशा भीतीने लटलटू लागतो नि तत्काल नाशास जातो.
५७०
ही धरणी कोणता भार सहन करू शकत नसेल तर तो दुष् राजांच्या जुलमाचा होय.

सर्ग ५८ विवेक
५७१
विवेक-देवतेचे स्वरूप किती रमणीय आहे! हे जग कोणामुळे नीट चालत असेल तर निच्यामुळे होय.
५७२
जीवनातील समाधान नि शांती, जीवनातील आनंद ने सौंदर्य विवेकामुळे असतात. ज्यांच्याजवळ विवेक नाही, धीर नाही, ते पृथ्वीला भार आहेत.
५७३
जे गीत रागदारीत बसवून गाता येत नाही, त्याचा काय उपयोग? ज्या डोळयांत प्रेमळपणा नाही त्यांचा काय उपयोग?
५७४
त्या त्या माणसाच्या योग्यतेनुरूप जे डोले प्रसन्नता नि शांती दाखवीत नाहीत, ते तोंडावर असून काय उपयोग?
५७५
प्रसन्नता हा डोळयांचा अलंकार आहे. ज्या डोळयांत माधुर्य नाही, ते डोळे नसून खाच होय.


५७६
ज्याचे डोळे दुसन्यांची पर्वा करीत नाहीत, दुसन्यांविषयी सद्भाव दाखवीत नाहीत, तो मनुष्य जमिनीत उभ्या असलेल्या झाडाप्रमाणे होय.
५७७
जे दुसन्यांविषयी तिळभरही पर्वा दाखवीत नाहीत्ते खरोखर आंधळे आहेत; दुसन्यांच्या दोषांकडेही जे प्रेमळपणे पाहतात तेच खरोखर डोळस होत.
५७८
आपल्या कर्तव्यापासून च्युत होता, दुसन्याविषयी जो सहानुभूती दाखवितो, तो या पृथ्वीचा स्वामी होईल.
५७९
अपराध्यावरही प्रेम करणे, त्याला क्षामा करणे, यातच मनाचा खरा मोठेपणा आहे.
५८०
ज्यांना मूर्तिमंत क्षमा व्हायचे आहे, ते डोळयांसमोर विष मिसळून दिले जात असताही विश्वासाने ते पिऊन टाकतील.

सर्ग ५९ हेरखाते


५८१
राजनीती आणि हेर हे राजाचे दोन डोळे. त्यांच्या साहाय्याने तो बघतो.
५८२
कोणाला कोणत्या वेळेस कोठे काय झाले ते वेळीच समजून घेणे राजाचे कर्तव्य आहे.
५८३
गुप्तचरांच्या साहाय्याने आजूबाजूच्या सर्व घडामोडी इत्यांभूतपणे जो राजा समजून घेत नाही, त्याला विजयी होता येणार नाही.
५८४
राज्यातील सर्व अधिकान्यांवर; एवढेच नव्हे, तर आप्तेष्टांवर तसेच शत्रूवरही राजाने हेर ठेवावे.
५८५
ज्याच्या चर्येवरून कोणाला कधी येणार नाही, जो कोणासमोर कधीही गेंधळून जात नाही, जो आपल्या गुप् गोष%टी कधीही प्रकट होऊ देत नाही, असा गुप्तचर होण्यास लायक असतो.
५८६
हेरांनी साधुसंन्याशांचा वेष घेऊन हिंडावे. संपूर्णपणे शोध करावा. त्यांनी काहीही झाले तरी गुप् गोष् फोडू नये.
५८७
दुसन्यांची गुपिते काढण्यात जो तरबेज आहे, जो घोटाळा करता बिनचूक माहिनी आणतो, अशा मनुष्यास गुप् कामावर नेमावे.
५८८
एका हेराने आणलेली वार्ता दुसन्या हेराने आणलेल्या वार्तेशी ताडून बघावी.
५८९
एका हेराला त्याच कामी योजिलेल्या दुसन्या हेराची वार्ता असता कामा नये. जेव्हा तीन हेरांची बातमी जुळेल तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवावा.
५९०
गुप् हेरांवरील अधिकान्यांना उघडपणे बक्षिसे देऊ नयेत. कारण अशाने आपणाच आपले गुपित प्रकट करतो.

सर्ग ६० उत्साह


५९१
जे उत्साहमूर्ती असतात तेच खरोखर श्रीमंत होत; निरुत्साही माणसाला स्वतःसही स्वतःचे असे म्हणता येणार नाही.
५९२
उत्साह हीच माणसाची खरी संपत्ती; दुसरी संपत्ती क्षणिक आहे.
५९३
ज्याच्याजवळ अदम्य उत्साहाचे प्रभावी साधन आहे, तो "हाय हाय! सर्वस्वी बुडालो!" असे कधीही म्हणणार नाही
५९४
कितीही श्रम पडले तरी जो कंटाळत नाही, त्याच्या घराचा शोध करीत लक्ष्मी आपण होऊन येते.
५९५
झाडाला येणान्या सुंदर फुलांवरून त्याला किती पाणी घातले याची कल्पना येते; तुमच्या श्रमांच्या प्रमाणात तुम्हांला भाग्य मिळेल.
५९६
तुझे सर्व हेतू उदात्त असोत. कारण मग जरी अपयश आले तरी तुझ्या नावाला काळिमा लागणार नाही.
५९७
धैर्यशील लोक पराभूत झाले तरी हातपाय गाळत नाहीत. गजराज बाणाविरुद्ध पाय अधिकच जाराने रोवतो.
५९८
रडक्या लोकांजवळ अनंत दातृत्याची कीर्ती कधी येऊ शकत नाही.
५९९
मोठा आकार नि अणकुचीदार सुळे असूनही उडी मारू पाहणान्या व्याघ्रास पाहून हत्तीचे हृदय खचते.
६००
अतूट उत्साह हेच खरे बळ होय. ज्यांच्याजवळ ते नाही ते मानव्देहधारी निर्जीव खुंट होत.

No comments:

Post a Comment