Friday, 1 June 2007

सर्ग 21-30



Thirukkural in Marathi
कवी तिरुवल्लुवर कुरल
भाग पहिला: धर्म
 सर्ग २१: असत्कर्माची भीती


२०१
पापाची दुष्टांना भीती वाटत नाही; परंतु सज्जन त्याच्यापासून दूर राहतात.


२०२
पापासून पापच जन्मते; आगीपेक्षाही पापाचे भय वाटायला हवे.


२०३
शतूलाही अपाय करण्यात खरे शहणपण आहे असे म्हणतात.


२०४
नकळताही दुसन्याचे वाईट करू नकोस. मनात वाईट विचार खेळवणारा आणि दुष्ट बेत करणारा-ईश्वरीन्याय त्याचा नाश करील.


२०५
"मी दरिद्री आहे" असे म्हणून कधीही वाईट कामास प्रवृत्त होऊ नकोस. कारण त्यामुळे आणखीच खाली जाशील.


२०६
वाईट गोष्टींनी दुःखी होण्याची ज्याला इच्छा नाही, त्याने दुसन्यास कधी त्रास देऊ नये.


२०७
सर्व शत्रुच्या कचाटयातून निसटण्याचा मार्ग सापडेल; परंतु पापे कधी मरत नाहीत आणि ती हात धुऊन पाठीस लागतील तुमचा सत्यनाश करतील


२०८
आपली छाया ज्याप्रमाणे आपगांस कत्री सोडीत नाही, त्याप्रमाणे पापेही आपल्या सदैव पाठीशो असतात आणि धुलोस मिळतात.


२०९
मनुष्य स्वतःवर खरे प्रेम करीत असेल, तर त्याने पापांकडे कधीही वळू नये.


२१०
सन्मार्ग सोडून पाप करण्याच्या भरीस जो कधी पडत नाही, तो सर्व संकटांपासून सुरक्षित आहे असे समजा.

सर्ग २२: सेवा, परकार्यतत्परता


२११
थोर माणसे निरपेक्ष उपकार करीत असतात. मेघाच्या उपकाराची फेड हे जग कशाने बरे करील.


२१२
थोर लोक श्रम करून जे मिळवितात, ते दुसन्यांसाठीच असते.


२१३
मोठया मनाने दुसन्याची कलेली सेवा- तिच्याहून अधिक चांगली गोष्ट पृथ्वीवर नाही वा स्वर्गातही नाही.


२१४
योग्य काम हे जो जाणतो, तोच खरोखर जगतो; हे जाणणारा मृतसमानच समजावा.


२१५
काठोकाठ भरलेले गावामधील ते तळे पाहा; जगावर प्रेम करणान्या माणसाचे वैभव त्याप्रमाणे असते.


२१६
फल भाराने लवलेला एखादा वृक्ष गावाच्या मध्यभागी असावा. त्या वृक्षाप्रमाणे उदाराच्या हातातील संपत्तीचे असते


२१७
सर्वांना सुलभ आणि अओषधी गुणांनी युक्त अशी एखादी दिव्य वनस्पती असावी, तद्वत उदाराच्या हातातील संपत्ती ही होय.


२१८
सदसत जाणनारे जरी आपद्ग्रस्त असले, तरी दुसन्यास साहाय्य मनुष्याच्या मनात येतो


२१९
साहाय्य मागायला आलेल्पास ज्या वेळेस साहाय्य देता येत नाही असे दिसते, त्या वेळेसच आपणा बरीब आहे हा विचार उदार मनुष्याच्या मनात येतो.


२२०
परोपकार करण्यासाठी स्वतःला विकून गुलाम झालात तरी हरकत नाही. परोपकार करीत असताना विपत्ती आली स्पृहणीयक आहे.

सर्ग २३: भूतदया


२२१
दरिद्र्नारायणास देणे ही खरी भूतदया; इतर देणे कर्ज देण्याप्रमाणे आहे.


२२२
दुसन्यापासून स्वीकारल्यामुळे स्वर्ग मिळत असला तरी तो नको. आणि दात्याला जरी स्वर्गात मज्जाव झाला तरीही दान देणे हा थोर गुणाच समजावा.


२२३
"माझ्याजवळ नाही" असे हीनदीनपणे बोलता कुलवान मनुष्यच फक्त देत असतो.


२२४
याचकाच्या मुखावर समाधानाचे हास्य पाहिल्याशिवाय दात्याच्या हृदयाला खरा आनंद होत नाही.


२२५
स्वतःवर विजय मिळविणान्याचा सर्वत मोठा विजय म्हणजे भुकेवर विजय मिळविणे; परंतु हा विजयही तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण स्वतःला नाकारून दुसन्याची भूक आधी शांत करतो.


२२६
गरिबांच्या आतडयाना सतावणारी ही भूक- ही शान्त करणे हाच आपल्यावर पुढे वाईट दिवसांची पाली आली तर त्या वेळेस आधार असावा म्हणून ठेवलेली पुंजी होय असे श्रीमांताने समजावे.


२२७
जो मनुष्य सर्वांना दिल्यावर स्वत: खातो त्याला भुकेचा भयंकर रोग कधी शिवणार नाही.


२२८
दुसन्याला देता जे निर्दय, कृपण लिक स्वत:ची संपत्ती नुसती साचवून ठेवतात, त्यांनी देण्यातील आनंद कधी चाखून तरी पाहिला आहे का?


२२९
भिकास्न्याचा मोडक्यातोदक्या तुकडछापेक्षाही आपण एकटाव बसून खाणारा जो श्रीमंत, त्याच्या त्या साचीच अन्नाला कमी चव आहे.


२३०
मृत्यूहून दुःखदायक काय आहे? परंतु दुसरा मदत मागत असता ती कशी घ्यावी हे कळत नाही म्हणून आलेला मरणही गोड आहे.

सर्ग २४: यश


२३१
गरिबाला गे आणि नावलौकिक मिळव, आपले नाव उज्ज्वल करणे याहून दुसरा फायदा मोठा कोणता?


२३२
जे गरिबास देतात, त्यांचे गुणगान सर्वांच्या तोंडी असते.


२३३
या मर्त्यलोकी सारे काही काळाच्या उदरात गडप होते, परंतु ज्यांची कृती या मानजातीच्या इतिहासात अपूर्व आहे, अशा थोरामोठयांची कीर्ती कधीच मरत नसते.


२३४
ज्याने चिरंजीव विश्वव्यापी यश मिळविले त्याला आकाशातील देव साधुसंतांच्याही आधी जागा देतात.


२३५
ज्या त्यागाने यश वाढते ज्या मरणाने तेज चढते, तो त्याग आणि ते मरण या गोष्टी खरा शूरच करू शकतो; इतरांचे ते काम नाही.


२३६
जगात आल्यासारखे यश मिळव. जगात येऊन ज्यांनी कीर्ती मिळविली नाही, ते जन्मास आले नसते तरी फार बरे झाले असते.


२३७
जे स्वत: दोषमुक्त नाहीत ते स्वत:वर कधी दातोठ खातात का? स्वतःवर रागावतात का? जर नसतील तर ते निंदकांवर का संतापतात?


२३८
कीर्तिरूप अमरजीवन ज्यांनी मिळविले नाही, त्यांचा धिक्कार असो.


२३९
अपकीर्ती झालेल्यांच्या भाराने ही पृथ्वी किती वाकली आहे पाहा. धनधान्यासाठी विख्यात अशी ही वसुंधरा अशा दुष्टांमुळे हीन दशेस गेल्याशिवाय कशी राहील.


२४०
ज्यांचे जीवन निर्दोष आहे तेच खरोखर जगले; जे कीर्तीशिवाय जगले तेच खरोखर मेले.

सर्ग २५: दया


२४१
दयापूर्ण हृदय हीच खरी संपत्ती गरिबांतल्या गरिबाजवळही असू शकते.


२४२
सत्पथाने जा आणि दयाशील हो. दया हा एक मोक्षाचा मार्ग असे सर्व धर्मांतून, सर्व पंथांतून सांगितलेले आहे.


२४३
दयामय हृदयाच्या लोकांना अंधकारमय लोकी जावे लागणार नाही.


२४४
प्राणिमात्रावर जो दया करतो, प्रेम करतो, त्याच्या पाठीला जीवाला गांगरवून टाकणारी ती कर्मफले लागत नाहीत. तो मुक्त होतो.


२४५
दयार्द्र मनुष्याला कधी त्रास नसतो. वायुवेष्टित ही विशाल पृथ्वी या गोष्टीची साक्ष देत आहे.


२४६
जो निर्दय आहे आणि असत्याचरणी आहे, तो पूर्वजन्मातील स्वतःला भोगावे लागलेले विसरला- दयेचा धडा विसरला- असे शहाणे म्हणतात.


२४७
ज्याचे हृदय दया करू शकत नाही, त्याला परलोकी सुख नाही; ज्याप्रमाणो द्रव्यहीनास या लोकी सुख नाही.


२४८
द्रव्याने दरिद्री असणान्यांची एक दिवस भरभराट होण्याची शक्यता आहे; परंतु ज्यांच्याजवल दयेचा तुटवडा आहे, त्यांच्या भाग्याचा दिवस कधीच येणार नाही.


२४९
संशयग्रस्त नि गोंधळात पडलेल्या माणसास सत्य सापडणे ज्याप्रमाणे कठीण, त्याप्रमाणे कठोर माणसाच्या हातून सत्कर्म होणे कठीण.


२५०
गरिबावर जुलूम करावा असा मोह जेव्हा तुला पडेल, त्या वेळेला आपल्याहून प्रबल असणारांसमोर आपण कसे थतथ रत होतो ते आठव.

सर्ग २६: मांसाशन नको.


२५१
स्वतःची चरबी वाढावी म्हणून दुसन्या प्राण्यांचे जो मांस खातो; त्याला दया कशी बरे कधी वाटेल?


२५२
उध्यळयांच्या हातात कधी पैसा दिसणार नाही आणि मांसाशन करणान्याच्या हृदयात दयेचा लेशही आढळणार नाही.


२५३
सशस्त्र शिपायांच्या हृदयांत ज्याप्रमाणे दया नसते, त्याप्रमाणे मांसाशन करणान्याच्या हृदयात सद्भाव नसतो.


२५४
प्राण्यांची हिंसा करणे म्हणजे खरोखर हृदयाचा निष्ठुरपणा आहे; आणि त्यांचे मांस खाणे म्गणजे तर फारच अन्याय वाटतो.


२५५
मांसाशन वर्ज्य करणे म्हणजे खरोखर जगणे. मांसाशन करशील तर नरकाच्या दरीत तुला कायमचे खितपत पडावे लागेल.


२५६
जगाला मांसाशन नकोच असेल, तर ते विकायला तरी कोण आणील?


२५७
दुसन्या प्राण्यांच्या वेदनांची कल्पना जर मानवाला यथार्थपणे आली, त्र तो कधीही मांसाशन करू इच्छिणार नाही.


२५८
या मायामय, अज्ञानमय संसाराची बंधने सोडून जे मुक्त झाले, ते हत्या करून कधीही मांसाशन करणार नाहीत.


२५९
हजारो यज्ञा करण्यापेक्षा प्राण्यांची हिंसा करणे आणि मांस खाणे श्रेष्ठ आहे.


२६०
जो कोणाची हिंसा करीत नाही मांसाशन   करीत नाही, त्याला सारे जग हात जोडून वंदन करते.

सर्ग २७: तप


२६१
सारे सहन करणे आणि कोणाही प्राण्याची हिंसा करणे, यात सारे तप साठवलेले आहे.


२६२
पूर्वजन्मी ज्यांनी तप केले असेल, तेच या जन्मीही त्यां मार्गाने जाऊ शकतील, इतरांना ते जमणार नाही.


२६३
तपोधनांची चिंता वाहण्यास दुसरे लोक हवेत; म्हणून तर काहींनी तपश्चर्य सिडून दिली नसेल ना?


२६४
तुझ्यावर प्रेम कर्णान्यांचा जर तुला उत्कर्ष करावयाचा असेल आणि तुझ्या शत्रूंचा जर तुला नाश करावयचा असेल, तर ते सामर्थ्य तपाने मिळेल हे ध्यानात धर.


२६५
तपोबलाने तुमच्या इच्छा पूर्ण होतात; म्हणून या जगात लोक तपश्चर्यचा प्रयत्न करतात.


२६६
तप करणारेच स्वतःचे हित साधतात; बाकीचे वासनांच्या जाळयात जुरफटून शेवटी विनाशाप्रत जातात.


२६७
अग्नी जितका प्रखर, तितके त्यात घातलेल्या सोन्याचे तेज अधिक; त्याप्रमाणे ज्या मानाने हाल कष्ट अधिक त्या मानाने तपाचे तेज अधिक.


२६८
संयमी मनुष्याची सारे पूजा करतात.


२६९
तपाने बळ मिळविणारे मृत्यूवर विजय मिळविण्यात यशस्वी होतात.


२७०
या जगात तप आचरणान्यांची संख्या फार थोडी असते; करणारेच पुष्कळ. म्हणून जगात गरजू लोकांची संख्याही पुष्कळ.

सर्ग २८: दंभ


२७१
ढेंगी माणसाचे ढोंग पाहून शरीरातील पंचमहाभूतांची तत्तवे हसू लगतात.


२७२
अंतःकरणातील अशुद्धता नि मलीनता मनाला जर माहीत असेल तर वरपांगी गंभीर आविर्भावाचा काय बरे उपयोग?


२७३
मनावर ताबा मिळविता खोटया तपश्चर्येचा नि वैराग्याचा आव आणणारा वाघाचे कातडे पांघरून चरणान्या गायीप्रमाणे आहे.


२७४
साधूपणाच्या आवरणाखाली जो पापे करतो, तो झुडपात लपून पाखरांना फसवणान्या पारध्याप्रंआणे आहे.


२७५
ढोंगी मनुष्य पावित्र्याचा आव आणतो नि म्हणतो, "मी माझ मनोविकार जिंकले आहेत." परंतु शेवटी त्याला दुःख करीत बसण्याची पाळी येईल आणि "अरेरे! काय मी केले?"असे म्हणत रडत बसावे लागेल.


२७६
मनातून त्याग करता, त्यागाचे सोंग आणून जगाला जो फसवितो, त्याच्याहूनही अधिक दुष्ट असा लफंग्या आढळणार नाही.


२७७
गुंजेची एक बाजू काळी असते, दुसरी पांढरी असते; त्याप्रमाणे बाहेरून चांगले परंतु अंतर्यामी वाईट असे दांभिक लोक असतात.


२७८
असे किती तरी असतात की जे पवित्र तीर्थस्नाने करतात, पवित्र म्हणून मिरवतात; परंतु आत वाईट असतात.


२७९
बाण सरळ दिसतो; परंतु त्याला रक्ताची तहान असते; वीणा वक्र असली तरी मधुर संगीत पसवरते. म्हणून बाहय रागरंगावरून परीक्षा करता कृतीवरून करावी.


२८०
ज्या गोष्टी जगात वाईट मानल्या जातात, त्यांचा केलास म्हणजे पुरे. मग डोक्याचे मुंडन असो वा नसो.

सर्ग २९: कपटराहित्य


२८१
आपला अपमान होऊ नये, तिरस्कार केला जाऊ नये, अशी ज्याला इच्छा असेल, त्याना कपटाचा विचार मनात येऊ नये म्हणून दक्ष रहावे.


२८२
शोजान्याला लुबाडीन असे मनात म्हणणेसुद्धा पाप आहे.


२८३
कपटाने मिळविलेली संपत्ती आज भरभराटताना दिसली, तरी उध्या मातीचत जायची.


२८४
लुटण्याच्या इच्छेने परिणामी अपरंपार दुःख प्राप्त होईल.


२८५
दुसन्याच्या धनाच्या अपहरणाची जो इच्छा करतो, दुसरा असावध असता त्याच्यावर झडप घालायला जो बघतो, त्याला चांगुल्पणा, दया माहीत नसतात. प्रेम त्याच्या हृदयापासून दूर असते.


२८६
दुसन्याची लूटमार करू पाहणान्या माणसाला खरे मूल्यमापन करता येत नसते. सत्यधर्माचे आचरण तो कोठून करणार?


२८७
संसारतील सर्व वस्तूंची ज्याने पारख केली, आहे, त्याची किंमत ओळखून ज्याने आपले हृदय खंबीर आहे, मती दृढ केली आहे, तो शोजान्याला फसवण्यावी चूक कधीही करणार नाही.


२८८
ज्याप्रमाणे चोराच्या मनात कपट असते, त्याप्रमाणे जगातील वस्तूंचे खरे स्वरूप समजणान्यांच्या हृदयात धर्म असतो.


२८९
नेहमी मनात कपट खेळवणारा सन्मार्गाचा त्याग करून शेवटी नाशाप्रत जाईल.


२९०
जो दुसन्यास फसवतो, तो स्वतःच्या शरीराचाही स्वामी नसतो. परंतुजो सद्धर्मानेनि न्यायाने वागतो, स्वर्गाचा स्वामी होतो.

सर्ग ३०: सत्य


२९१
सत्य म्हणजे काय? जा बोलण्याला दुष्टपणाचा थोडा देखील वास नाही, ते खरे सत्य बोलणे.


२९२
असत्यातून सत्नि मंगल यांची निर्मिती होणार असले, तर ते सत्यच होय.


२९३
जे तुला असत्य म्हणून माहीत आहे, ते सत्य म्हणून कधी मानू नको.


२९४
ज्याच्या हृदयात असत्याचा लवले शही नाही, तो सर्वांच्या हृदयाचा सम्राट होतो.


२९५
ज्याचे हृदय सत्यावर अधिष्ठित आहे, तो गरिबांना दान देणान्यांहूनही अधिक मोठा आहे; तो खरा तपस्वी.


२९६
असत्याशी ओळखही नसणे याहून माणसाची अधिक कीर्ती दुसरी नाही, याहून अधिक मोळाचा अलंकार नाही.


२९७
मनुष्य कधीही खोटे बोलला नसेल, तर आणखी इतर सद्गुणांची काय जरूरी?


२९८
फण्याने बाहेरची शुद्धी; हृदयाची शुद्धी सत्याने सिद्ध होते.


२९९
जे खरे महात्मे आहेत, ते सत्याच्या प्रकाशालाच प्रकाश मान तात; इतर प्रकाशांना ते मानीत नाहीत.


३००
या जगात मी पुष्कळ वस्तू पाहिल्या; परंतु सत्याहून थोर दुसरी वस्तू पाहिली नाही.

No comments:

Post a Comment